ETV Bharat / state

Cycling Championships : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आता भारतात - ऑलिम्पिकमध्ये सायकल रेसिंग

लहानपणी सायकल वापरली आणि सायकलची शर्यत ( Bicycle race  ) लावली नाही, असामाणूस सापडला नाही असे होणार नाही. भारतात सायकल हा खेळ म्हणून तुलनेने फारसा प्रसिद्ध नाही. मात्र युरोप आणि अमेरिकेत सायकल शर्यतींना ( Bicycle race ) विशेष महत्त्व आहे. एवढंच काय तर ऑलिम्पिक खेळांमध्येही त्याचा फार पूर्वीच समावेश करण्यात आलेला ( Bicycle racing at the Olympics ) आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा ( World International Cycling Championships ) भारतात होणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यांत या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 24, 2022, 10:07 PM IST

मुंबई - लहानपणी सायकल वापरली आणि सायकलची शर्यत ( Bicycle race ) लावली नाही, असामाणूस सापडला नाही असे होणार नाही. भारतात सायकल हा खेळ म्हणून तुलनेने फारसा प्रसिद्ध नाही. मात्र युरोप आणि अमेरिकेत सायकल शर्यतींना ( Bicycle race ) विशेष महत्त्व आहे. एवढंच काय तर ऑलिम्पिक खेळांमध्येही त्याचा फार पूर्वीच समावेश करण्यात आलेला ( Bicycle racing at the Olympics ) आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा ( World International Cycling Championships ) भारतात होणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यांत या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. भारताच्या राजधानी दिल्लीपासून विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात स्पर्धेचा शेवट होईल. स्पर्धेसाठी नामांकन अर्जासाठी लवकरच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आता भारतात

दिल्ली टू पुणे अशी सायकलिंग शर्यत - डोंगर-दऱ्यांमध्ये सायकलिंग करणे हा एक साहसी व रोमहर्षक असा क्रीडाप्रकार आहे. जगभरात अशा स्पर्धा वर्षभर खेळवल्या जातात आणि त्या अत्यंत लोकप्रिय आहेत. ‘टूर दी फ्रान्स’, ‘टूर ऑफ द ड्रॅगन’ म्हणजेच ‘भूतान डेथ रेस’ ही जगातील आणखी एक अत्यंत अवघड अशी सायकल स्पर्धा आहे. तर जगातील सर्वात प्रदीर्घ अंतराची सायकल स्पर्धा म्हणजे ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ होय. अमेरिकेत कॅलिफोर्निया येथील ओशियन पीएर येथून सुरू होणारी ही स्पर्धा अ‍ॅनापोलिस, मेरीलँड (इस्ट कोस्ट) येथील सिटी डॉक येथे संपते. अमेरिकेतील 12 राज्ये आणि 88 काऊंटी पार करत जवळपास 4800 किलोमीटरचा हा पल्ला अवघ्या 12 दिवसांमध्ये पार करायचा असतो. टूर डी फ्रान्स या स्वरुपाचा पहिला कार्यक्रम भारतात दिल्ली टू पुणे अशी सायकलिंग शर्यत आयोजित केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धक येणार - सध्या भारतात अशी कोणतीही क्रीडा स्पर्धा होत नाही. आशियातील सर्वात मोठी वार्षिक सायकलिंग इव्हेंट राबवण्याचा निर्णय हिंदयान या संस्थेने केला. ही स्पर्धा अद्भूतपूर्व असणार आहे. स्पर्धेचे पहिले वर्ष असल्याने 100 ऐवजी 80 स्पर्धकांसाठी असेल. प्रतिदिन सुमारे 250 किलोमीटरचा टप्पा सायकलने पार करावा लागेल. दिल्लीपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा शेवट पुण्यात होईल, असे आयोजक विष्णूदास चापके यांनी सांगितले. यापुढे दरवर्षी स्पर्धा राबवण्याचा विचार आहे. भारतीय उपखंडातील सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असेल. आंतरराष्ट्रीय सायकलपटूंना या स्पर्धेसाठी आमंत्रित केले आहे. भारताचा वैविध्यपूर्ण, समृद्ध वारसा आणि संस्कृती अनुभवण्याची संधी यामुळे मिळणार आहे. शिवाय, सायकलिंगच्या शौकिनांना कमाईचे साधन उपलब्ध होईल. www.hindayan.in या वेबसाइटवर हिंदयानसाठी नोंदणी करता येणार आहे. भारतातील ज्या भागातून स्पर्धा होणार आहे, त्या ठिकाणच्या स्पर्धकांसाठी देखील स्पर्धेचा आनंद घेता यावा, यासाठी नियोजन आखल्याचे चापके यांनी सांगितले.

हिंदयान नाव असे पडले - हिंदयान हे नाव दोन शब्द संस्कृतमधून आले आहेत. हिंद म्हणजे सिंधू नदीपासून महासागरापर्यंतची जमीन आणि अयान म्हणजे मोहीम. या दोन शब्दांना एकत्रिक करत हिंदयान ना देण्यात आले. नवी दिल्लीपासून शर्यत सुरू होईल आणि आग्रा, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई आणि पुण्यात 19 फेब्रुवारी 2023 रोजी संपेल. या मार्गात सायकल स्वारांना हुमायून मकबरा, कुतुबमिनार, लाल किल्ला यांची भव्यता आणि सौंदर्य अनुभवता येईल. ताजमहाल, आग्रा किल्ला, फत्तेपूर सिक्री, जयपूर शहरात, जंतर मंतर, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, चंपानेर-पावागढ़ पुरातत्व उद्यान, राणी-की-वाव, एलिफंटा लेणी, सीएसएमटी, मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको समूह असे हेरिटेज परिसर अनुभवता येणार आहे.

असा असेल स्पर्धेचा वेळापत्रक

फेब्रुवारी 5: दिल्ली ते आग्रा 221 किमी
फेब्रुवारी 6 : विश्रांती
फेब्रुवारी 7 : आग्रा ते जयपूर 240 किमी

फेब्रुवारी 8 : विश्रांती
फेब्रुवारी 9 : जयपूर ते भीलवाडा
फेब्रुवारी 10 : भिलवाडा ते उदयपूर

फेब्रुवारी 11 : विश्रांती
फेब्रुवारी 12 : उदयपूर ते अहमदाबाद
फेब्रुवारी 13 : विश्रांती

फेब्रुवारी 14 : अहमदाबाद ते सुरत
फेब्रुवारी 15 : विश्रांती
फेब्रुवारी 16 : सुरत ते बोरिवली 260 किमी

फेब्रुवारी 17 : विश्रांती
फेब्रुवारी 18 : बोरिवली ते मुंबई
फेब्रुवारी 19 : मुंबई ते पुणे 180 किमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.