सातारा - दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे झालेल्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्क्यांनी विजय झाला. या विजयानंतर अश्विनी जगताप यांचे माहेर असलेल्या कराड तालुक्यातील सुपने गावात अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. माहेरच्या लोकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. सुपने गावची कन्या आमदार झाल्याबद्दल ग्रामस्थांनी अश्विनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Breaking News : अश्विनी जगताप यांच्या माहेरात झळकले अभिनंदनाचे बॅनर, सुपने गावात फटाक्यांची आतषबाजी - चिंचवड पोटनिवडणूक निकाल
21:11 March 02
अश्विनी जगताप यांच्या माहेरात झळकले अभिनंदनाचे बॅनर, सुपने गावात फटाक्यांची आतषबाजी
19:52 March 02
आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेत काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती
मुंबई - आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेत काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आली.
19:21 March 02
कसब्यातील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर केसरी वाड्यात, टिळक कुटुंबीयांची घेतली भेट
पुणे - महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर केसरी वाड्यात गेले. केसरी वाड्यात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. तसेच टिळक कुटुंबाची भेट घेतली.
19:04 March 02
रवींद्र धंगेकर यांच्या विजयी जल्लोषात परदेशी महिलाही सहभागी
पुणे - कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयी जल्लोषात परदेशी महिलाही सहभागी झाली होती. या महिलेचा डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
18:47 March 02
महिलेचे खासगी फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्याला अटक
ठाणे - एका महिलेचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून बदनामी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ठाणे शहरातील एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर महिलेचे बनावट खाते तयार केले आणि त्यावर तिचे बालपणीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, अशी माहिती मीरा भाईंदर-वसई विरार (MBVV) पोलिसांच्या सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांनी दिली.
18:39 March 02
शिक्षिकेकडून लाच घेताना महिला मुख्याध्यापिकेसह सहशिक्षक रंगेहाथ अटक
सातारा - शाळेच्या वार्षिक तपासणीत चांगला शेरा मिळावा, म्हणून तपासणीसांना देण्यासाठी तसेच तपासणीसांवर केलेल्या खर्चापोटी सहशिक्षिकेकडून १८७५ रूपयांची लाच घेताना महिला मुख्याध्यापिका आणि सहशिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. उंब्रज (ता. कराड) येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला पोळ, सहशिक्षक बापू सूर्यवंशी, अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
18:31 March 02
नवलखा यांना जामीन नाकारणारा विशेष कोर्टाचा आदेश हायकोर्टाने केला रद्द; पुन्हा सुनावणीचे दिले आदेश
मुंबई - एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना जामीन नाकारणारा विशेष न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. विशेष न्यायाधीशांना त्यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी करण्याचे निर्देश दिले. तसेच विशेष न्यायाधीशांना 4 आठवड्यांच्या आत नवीन सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नवलखा यांनी 5 सप्टेंबर 2022 च्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कायद्यांतर्गत गुणवत्तेनुसार जामीन नाकारण्याच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
18:21 March 02
भाजपचा बालेकिल्ला कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकीचा विजय - पृथ्वीराज चव्हाण
सातारा - कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
18:18 March 02
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप विजयी
पुणे - चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप 36770 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यामुळे पुण्यात समिश्र निकाल लागला असे म्हणावे लागेल.
17:17 March 02
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना विजयी आघाडी, विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी
चिंचवड - विधानसभा निवडणूक आकडेवारी
जगताप - 1,28,216
काटे - 93,890
कलाटे - 42,139
34 व्या फेरीनंतर 34,326 मतांनी जगताप आघाडीवर
16:42 March 02
चिंचवडविधानसभेत अश्विनी जगताप यांच्या लीडमध्ये सतत वाढ
पिंपरी चिंचवड - ३१ फेरी
- अश्विनी जगताप - ४६६५ भाजप १,९६० लीड - एकूण लीड - २५,४४०
- नाना काटे - २७०५ एनसी
- राहूल कलाटे - ८७१ अपक्ष
16:08 March 02
10 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी नराधमाला अटक
पालघर - एका 45 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. तलासरी तालुक्यातील ही मुलगी बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शाळेत गेली. परंतु ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला. तर मृतदेह गुजरातमध्ये टाकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
16:01 March 02
अश्विनी जगताप यांची आघाडी तिसाव्या फेरीतही कायम
पिंपरी चिंचवड - ३० फेरी
- अश्विनी जगताप - ३५६९ भाजप ३९ लीड - एकूण लीड - २३,४८०
- नाना काटे - १३७९ एनसी
- राहूल कलाटे - ३५३० अपक्ष
15:51 March 02
चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप विजयाच्या उंबरठ्यावर, 29 फेरीअखेर २३,४३१ मतांची आघाडी
पुणे - चिंचवड विधानसभा मतदारसंघात २९ फेरीअखेर अश्विनी जगताप - ३४०६ भाजप २२४ लीड - एकूण लीड - २३,४३१. तर नाना काटे - ११६४ एनसीपी आणि राहूल कलाटे - ३१८२ अपक्ष अशी मते मिळाली आहेत.
15:31 March 02
संजय राऊत यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवर आता 15 मार्चला सुनावणी
मुंबई - खा. संजय राऊत यांच्या जामिनाला आव्हान देणारी ईडीची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे.
15:20 March 02
आव्हाड यांनी जनतेसमोर माफी मागायला हवी - सातपुते यांची मागणी
मुंबई - जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात वेळोवेळी हिंदू-देवी देवतांचा अवमान होईल असा उल्लेख केला. त्यामुळे मी विरोध केला असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले. चाकरी या शब्दाला विरोध केला. मला शरद पवार यांनी आरक्षण दिले नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले असे आपण म्हणालो. जितेंद्र आव्हाड यांनी माझा अपमान केला. त्यांनी मला हीन वृत्तीने माझ्याकडे हातवारे करून भाषण केले असा आरोपही सातपुते यांनी केला. त्यांनी जनतेसमोर माफी मागायला हवी अशी मागणी सातपुते यांनी केली.
15:16 March 02
बाळूमामांच्या भाविकांच्या कारला अपघात, महिलेसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार
सातारा - बाळूमामांच्या मेंढरांचे दर्शन घेऊन पुण्याकडे परत निघालेल्या भाविकांच्या कारला खंडाळा हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातात महिलेसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले. मृत आणि जखमी हे पुणे आणि अकोला येथील रहिवासी आहेत. भाविकांच्या कारने रस्त्याकडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. सातार्यातील पारगाव खंडाळा येथे बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृत आणि जखमी हे पुणे आणि अकोला येथील रहिवासी आहेत.
14:44 March 02
सातपुते-आव्हाड यांच्यातील खडाजंगीवरुन विधानसभा दहा मिनिटांसाठी तहकूब
मुंबई - जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमदार आहात नाहीतर चाकरी केली असती असे उद्गार काढल्याने सभागृहात दोन्ही बाजूच्या सदस्यांनी केला गदारोळ केला. मला आरक्षण आंबेडकरांनी दिले आहे शरद पवारांनी नाही असे सातपुते यांनी म्हणताच विरोधक आक्रमक झाले.
14:08 March 02
विरोधी पक्ष नाही तर देशद्रोही कोण, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे - उद्धव ठाकरे
मुंबई - मुख्यमंत्री कोणत्या देशद्रोहींच्याबरोबर चहापान करणार होते. हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी असे सांगितले आहे की ते विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणाले नाहीत. तर मग ते देशद्रोही नेमके कुणाला म्हणाले हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जर त्यांचे कुणा देशद्रोह्यांबरोबर चहापान ठरले होते, तर त्याचे नियोजन कुणी केले होते. देशद्रोह्यांना मुख्यमंत्र्यांसोबत चहापानाला कुणी बोलावले होते. ते जनतेला समजले पाहिजे असाही टोला ठाकरे यांनी लगावला.
13:57 March 02
कसब्यातील मतदार मोठ्या भ्रमातून बाहेर, देशातीलही येतील - उद्धव ठाकरे
मुंबई - कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाष्य केले. ते म्हणाले की जर कसबा मतदार संघातील मतदार मोठ्या भ्रमातून बाहेर पडत असतील, तर देशातील मतदान का पडणार नाहीत असे उद्धव ठाकरे म्हणाले.
13:53 March 02
निवडणूक आयोगासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अत्यंत स्वागतार्ह - उद्धव ठाकरे
मुंबई - निवडणूक आयोगासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अत्यंत स्वागतार्ह आहे असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. या निर्णयावरुन निवडणूक आयोगात बेबंदशाही चालणार नाही हे न्यायालयाने स्पष्ट केल्याचे दिसते. ही बाब महत्वाची असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
13:49 March 02
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल

विरोधकांना म्हटले होते देशद्रोही
13:18 March 02
नवाब मालिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेत
- नवाब मालिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली..
- तो दाऊदचा माणूस होता
- दाऊदची बहीण हसीना पारकर सोबत त्यांचे व्यवहार
- देशद्रोह्याला पाठीशी घालणं आम्हाला अमान्य
13:00 March 02
ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली
नवी दिल्ली - ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. आज शिंदे गटाचे वकील नीरज कौल तसेच राज्यपालांची बाजू सॉलिसिटर जनरल साळवे यांनी मांडली. तसेच इंटव्हिनर म्हणून जनतेच्या बाजूने सरोदे वकीलही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सुनावणीत सहभागी झाले होते. आजच युक्तीवाद पूर्ण करण्यासंदर्भात कोर्टाची भूमिका होती. मात्र आज पुन्हा युक्तीवाद अपूर्ण राहिला. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी मंगळवारी घेण्यात येणार आहे.
12:42 March 02
विधानसभा सदस्य अपात्रतेची टांगती तलवार असली तरे ते कर्तव्य पार पाडू शकतात - साळवे
नवी दिल्ली - अनेकदा विविध कारणाने विधानसभा सदस्यांंवर अपात्रतेची टांगती तलवार असते. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात खटले सुरू असले तरी त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यांना सदस्य म्हणून कर्तव्ये पार पाडता येतात. त्यामुळे या खटल्यात सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना ते मतदान करु शकत नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे आसा युक्तवाद साळवे यांनी केला.
12:37 March 02
अंजली दामानिया गुन्हे प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना दणका, 3 आठवड्यात केस निकाली काढण्याचे आदेश
मुंबई - अंजली दामानिया यांनी मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने 19 एफआयआर दाखल असलेल्या गुंडाने अंजली दमानिया यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पोलिसांना सक्त निर्देश दिले आहेत. मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन हे प्रकरण 3 आठवड्याच्या आत निकाली काढा असे उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना सुनावले आहे.
12:21 March 02
एकच व्यक्ती दोन आघाड्यात उपमुख्यमंत्री होते, या राजकारणात कोर्टाने पडू नये - सॉलिसिटर जनरल साळवे
नवी दिल्ली - राजकारणात अनेक गोष्टी होत असतात. एखादी व्यक्ती एका आघाडीत आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते. तीच व्यक्ती काही दिवसातच दुसऱ्या आघआडीतही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते. हे झालेले आपण पाहिले आहे. त्यामुळे या राजकारणात कोर्टाने जाण्याची गरज नाही. मात्र राज्यपालांनी वस्तुस्थिती पाहता त्यांच्यापुढे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे बहुमत चाचणी घेणे. जे काही आहे ते विधानसभेच्यापटलावर स्पष्ट होईल.
12:17 March 02
सॉलिसिटर जनल साळवे यांचा युक्तीवाद सुरू, सिब्बल यांच्या एकूणच युक्तीवादावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात सॉलिसिटर जनरल साळवी यांचा युक्तीवाद सुरू झाला आहे. साळवी यांनी सुरवातीलाच सांगितले की सिब्बल यांनी मांडलेला युक्तीवाद हा जर-तरवर आधारित होता. त्यामुळे त्याचा कितपत विचार करायचा हे कोर्टाला ठरवावे लागेल.
12:12 March 02
छनग भुजबळ आणि थोरात यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे - फडणवीस
मुंबई - छनग भुजबळ आणि थोरात यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नाफेडच्या वतीने एफटीओ मार्केटमधून खरेदी सुरू आहे. महास्वराज्य, वृथाशक्ती आणि महा किसान वृद्धी या कंपन्यांकडून कांदा खरेदी सुरू आहे, ही माहिती फडणवीस यांनी दिली. दहा ठिकाणाहून खरेदी सुरू केली आहे, असे ते म्हणाले. १८७४३ क्विंटल कांदा खरेदी केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. नेमकी काय आणि किती मदत करणार याची घोषणा लवकर करू असेही फडणवीस यांनी सांगितले. पुन्हा एकदा सभागृहासमोर येऊन स्वतंत्र निवेदन सादर करणार आहेत.
12:04 March 02
विधानसभेत कांद्याच्या प्रश्नावरुन विरोधकांनी उठवले रान
मुंबई - विधानसभेत कांद्याच्या प्रश्नावरुन विरोधकांनी रान उठवले आहे. नाफेडने कांद्याची खरेदी सुरू केलेली नाही. नाफेडने बाजारात जाऊन खरेदी सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी केली. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्यामागे अनुदान देण्यात यावे. नाफेडने बाजारात जाऊन बोली लावायला पाहिजे, असेही ते म्हणाले. तर कांद्याचे उत्पादन नाशिक नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे, असे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यांनी आणखी एक गोष्ट निदर्शनास आणल की, आपण नेमलेल्या समितीत ना शेतकरी प्रतिनिधी आहे ना व्यापारी प्रतिनिधी आहे. त्यामुळे या समितीला काही अर्थ नाही. तसेच नेमकी कुठे खरेदी सुरू झाली आहे हे समजत नाही.
12:00 March 02
भाजपला बालेकिल्ल्यात धक्का, महाविकास आघाडीचे धंगेकर कसब्यातून विजयी
पुणे - कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर निवडून आले आहेत. ते 11हजारच्यावर मतांनी निवडून आले. त्यांच्या विजयाने भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.
11:54 March 02
हिंडेनबर्ग अहवालावर सुप्रीम कोर्टाने केली 6 सदस्यीय समिती स्थापन
नवी दिल्ली - अदानी समूहाच्या कंपन्यांवरील हिंडेनबर्ग संशोधन अहवालातून उद्भवलेल्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने तज्ञ समितीची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती ए एम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची ही समिती असेल. दोन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल.
11:48 March 02
कसबापेठेत महाविकास आघाडी विजयाच्या उंबरठ्यावर, कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुणे - कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार धंगेकर रवींद्र हेमराज आघाडीवर असल्याच्या अधिकृत EC ट्रेंडनुसार महाविकास आघाडी (MVA) कार्यकर्त्यांनी पुण्यात आनंदोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली आहे. आता फक्त विजयाच्या घोषणेची औपचारिकता राहिली असल्याचे कार्यकर्ते म्हणाले.
11:33 March 02
कसब्यात पंधराव्या फेरीत रवींद्र धंगेकर ७ हजार मतांनी आघाडीवर

10:59 March 02
कसब्यात बाराव्या फेरीतही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर

10:58 March 02
चिंचवडमधून दहाव्या फेरीअखेर भाजपच्या आश्विनी जगताप ७४०० मतांनी आघाडीवर

10:38 March 02
कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजप पुढे.. धंगेकरांना ४२२७ तर जगतापांना पाच हजारांचे लीड

10:28 March 02
भाजपला जोरदार झटका.. नवव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर ४५०६ मतांनी आघाडीवर
कसब्यात भाजपला जोरदार झटका.. नवव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर ४५०६ मतांनी आघाडीवर
10:14 March 02
आठव्या फेरीत रवींद्र धंगेकरांना ३५०० हजार मतांची आघाडी
कसब्यात आठव्या फेरीत रवींद्र धंगेकरांना ३५०० हजार मतांची आघाडी...
10:04 March 02
पुण्यातील भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची जोरदार मुसंडी..
पुण्यातील भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची जोरदार मुसंडी दिसून आली आहे. आठव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरांचा लीड घसरला, असला तरी भाजपचे उमेदवार रासने पिछाडीवर आहेत.
09:55 March 02
सातव्या फेरीत रवींद्र धंगेकरांना २७१७ मतांची आघाडी..
कसब्यात सातव्या फेरीत रवींद्र धंगेकरांना २७१७ मतांची आघाडी..
09:40 March 02
पाचव्या फेरीत रवींद्र धंगेकर आघाडीवर
पाचव्या फेरीत रवींद्र धंगेकर ३ हजार मतांनी आघाडीवर
09:39 March 02
चिंचवडमध्ये चौथ्या फेरीत आश्विनी जगताप ६०० मतांनी आघाडीवर

09:31 March 02
कसब्यात चौथ्या फेरीत रवींद्र धंगेकरांची १६६७ मतांची आघाडी

09:25 March 02
कसब्यात तिसऱ्या फेरीत धंगेकरांना मोठा झटका, मोठे लीड तुटले
पहिल्या फेरीत ३ हजार मतांनी आघाडीवर असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना तिसऱ्या फेरीत मोठा झटका बसला आहे. त्यांचं लीड कमी झालं असून, अवघे ६७७ मतांचा फरक राहिला आहे. भाजप उमेदवार रासने यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे.
09:23 March 02
कसब्यात अभिजित बिचूकलेंना ४ मतं, आनंद दवेंना अवघी १२ मतं

09:01 March 02
दुसऱ्याफेरीत धंगेकरांच्या आघाडीला लागला ब्रेक.. दीड हजारांनी लीड तुटले
कसब्यात दुसऱ्या फेरीत धंगेकरांच्या आघाडीला लागला ब्रेक.. दीड हजारांनी लीड तुटले
08:59 March 02
कसब्यात रविंद्र धंगेकर 2200 मतांनी पुढे.. चिंचवडमध्ये जगताप ९०० मतांनी आघाडीवर

08:56 March 02
चिंचवडमध्ये राष्ट्रवादी- भाजपात 'कांटे की टक्कर'.. कसब्यात भाजपचे रासने मागे

08:49 March 02
त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्ष स्पष्ट बहुमताच्या दिशेने
- त्रिपुरात भाजप प्राथमिक कलानुसार स्पष्ट बहुमताच्या दिशेने
- त्रिपुराच्या ६० पैकी ४० जागांवर आघाडी
- नागालँडमध्ये ६० पैकी ३६ जागांवर आघाडी
08:25 March 02
त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजप आघाडीवर
त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजप आघाडीवर
08:08 March 02
चिंचवडमध्ये पहिल्या फेरीत जगताप आघाडीवर
चिंचवडमध्ये पहिल्या फेरीत जगताप आघाडीवर
08:04 March 02
त्रिपुरामध्ये भाजप १४ जागांवर आघाडीवर
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप १४ तर टीएमपी ३ जागांवर आघाडीवर
08:02 March 02
मतमोजणीला सुरुवात.. पोस्टल मतांची मोजणी सुरु

07:37 March 02
निकालाचे कल हाती येण्यास सुरुवात.. एका जागेवर 'या' पक्षाची आघाडी
नागालँडमध्ये ६० जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत असून, मतमोजणीत निकालाचे कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार एका जागेवर भाजपचा मित्रपक्ष एनडीपीपीने आघाडी घेतली आहे.
06:57 March 02
सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात.. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
कोहिमा, नागालँड | सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा तैनात
06:40 March 02
कसब्यात कोण..? धंगेकर की रासने..?, चिंचवडमध्ये जगताप बाजी मारणार की काटे बाजी उलटविणार..?

06:23 March 02
अमेरिकेतही टिक टॉकवर बंदी येण्याची शक्यता
यूएस हाऊस पॅनेलने टिकटोकवर बंदी घालण्यासाठी जो बिडेनला अधिकार देणारे विधेयक मंजूर केले, रॉयटर्सच्या अहवालात
06:22 March 02
अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप
अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला
06:21 March 02
जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) महासंचालक भारत भेटीवर
दिल्ली | Ngozi Okonjo-Iweala, जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) महासंचालक G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत.
06:21 March 02
इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री रेत्नो मार्सुडी भारतात
दिल्ली | G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री रेत्नो मार्सुडी भारतात आले.
06:20 March 02
सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान भारतात दाखल
दिल्ली: सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान जी-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत.
06:19 March 02
चिनी परराष्ट्रमंत्र्यांचे भारत दौऱ्यावर आगमन
दिल्ली: G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग भारतात आले आहेत
06:16 March 02
WORLD INDIA MAHARASHTRA CRIME POLITICS POLLS BYPOLLS RESULT BREAKING NEWS LIVE UPDATES TODAY
देश, विदेश आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स, जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा