सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संपूर्ण भारतात आणि परदेशात सर्वोच्च स्तरावरील Z+ सुरक्षा कवच प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. भारताच्या हद्दीत किंवा परदेशात सर्वोच्च स्तरावरील Z+ सुरक्षा कवच प्रदान करण्याचा संपूर्ण खर्च त्यांना करावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Breaking News : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना Z प्लस सुरक्षा द्या - SC
22:33 February 28
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना Z प्लस सुरक्षा द्या - SC
22:08 February 28
EOW ने कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी केली अटक
मुंबई : राजीव नंदकुमार साळुंके आणि बाळा रामचंद्र कदम यांना EOW ने कथित कोविड सेंटर घोटाळ्यात अटक केली आहे. आरोपी राजीव नंदकुमार साळुंके याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
21:51 February 28
एमपीएससीचा निकाल जाहीर; राज्यात प्रमोद चौघुले प्रथम
पुणे:- सन 2021 साली घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेच निकाल हा नुकताच जाहीर झाला आहे.यात प्रमोद चौघुले याने प्रथम क्रमांक तर शुभम पाटील याने दुसरं क्रमांक पटकावला आहे.निकाल लागताच विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष यावेळी साजरा केला.
21:07 February 28
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
1. राजेंद्र भोसले, IAS (2008), या आधी अहमदनगरचे जिल्हाधिकारी, आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. 2. दिपा मुधोळ मुंडे, IAS (2011) या आधी औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासक, आता बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. 3. राधाविनोद शर्मा, IAS (2011) या आधी बीडचे जिल्हाधिकारी, आता औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती. 4 सिद्धार्थ सालीमथ, IAS (2011) अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. 5 निधी चौधरी, IAS (2012) या आधी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी, आता मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती.
20:52 February 28
अमिताभ, धर्मेंद्र यांच्यासह मुकेश अंबानी यांचे बंगले बॉम्बने उडवणार, अज्ञात कॉलरचा नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन
मुंबई : मुंबईतील प्रतिष्ठित लोकांच्या घरी बॉम्बस्फोट करणार असल्याचा फोन नागपूर पोलीस नियंत्रणाला अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलरने दावा केला की, उद्योजक मुकेश अंबानी यांचा बंगला अँटिलिया येथे स्फोट होणार आहे.
20:00 February 28
मुंबईत विमानतळावर 2.58 किलो कोकेन जप्त
मुंबई - मुंबईत विमानतळावर 2.58 किलो कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारा त्याची किंमत 25 कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर ते ज्याला देण्यासाठी आणले होते, त्यालाही अटक करण्यात आली आहे. प्रवाशाच्या सामानाची सखोल झडती घेतल्याने त्या प्रवाशाने त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये 12 साबण बारमध्ये लपवून ठेवलेले होते. त्यामध्ये हे कोकेन लपवले होते.
19:00 February 28
सिसोदिया यांचा राजीनामा मात्र नवा उपमुख्यमंत्री नाही, कैलाश गहलोत यांना खाती देणार
दिल्लीचे राजीनामा दिलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची खाती दिल्ली कॅबिनेट मंत्री कैलाश गहलोत आणि राजकुमार आनंद यांना दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या कोणत्याही नवीन मंत्र्याचा शपथविधी होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
18:52 February 28
बेंगळुरूत अतिक्रमण हटवताना दर्ग्याचा काही भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू
बेंगळुरू - एव्हेन्यू रोड, मार्केट सर्कलजवळ प्रशासनाकडून पाडण्याच्या कामात दर्ग्याचा काही भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. तेथे दोन कामगार काम करत होते. ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे, डीसीबी लक्ष्मण बी. निंबर्गी यांनी सांगितले.
18:44 February 28
लातूरमध्ये PM-SHRI योजनेअंतर्गत 252 शाळा विकसित करणार
लातूर - उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएम-श्री) योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लातूरमधील २५२ जिल्हा परिषद शाळा विकसित केल्या जातील, असे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याने सांगितले. यासंदर्भातील अधिकाऱ्यांनी 349 शाळांची माहिती गोळा केली होती. त्यापैकी 252 शाळांची जिल्हा नोडल समितीने निवड केल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग) वंदना फुटाणे यांनी सांगितले.
18:33 February 28
पालघरमध्ये वाहन चोरीप्रकरणी तिघांना अटक
पालघर - जिल्ह्यात 5.8 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या चोरीच्या वाहनांसह तिघांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. जिल्ह्यातील विविध भागात दुचाकी चोरीच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी खबरदारी घेतली होती, असे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले. त्यानंतर केलेल्या कारवाईत ही अटक करण्यात आली.
18:28 February 28
गडचिरोलीच्या जंगलात नवजात हत्तीच्या पिलाचा मृत्यू
गडचिरोली - जंगलात एका नवजात हत्तीचे पिलू मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती वन अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. कमलापूर हत्ती कॅम्पजवळील जंगलात मंगला नावाच्या 32 वर्षीय हत्तीणीने सोमवारी पिलाला जन्म दिला होता. मात्र या पिलाचा मृत्यू झाल्याची माहिती सिरोंचाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी दिली.
18:26 February 28
हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल
ठाणे - एका २८ वर्षीय पतीसह त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांवर पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलिसांनी दिली.
18:23 February 28
नागपूर शहरात मोटारसायकलची ट्रकला धडक, एकाचा मृत्यू
नागपूर - शहरातील सर्व्हिस रोडवर थांबलेल्या कंटेनर ट्रकवर मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने एका गोदामातील कामगाराचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोपावरून ट्रकचालकाला अटक करण्यात आली.
17:16 February 28
सर्वोच्च न्यायालयाकडून सिसोदिया यांना दिलासा नाही, उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला
नवी दिल्ली - दिल्ली दारू घोटाळ्यात अटकेत असलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. मंगळवारी सकाळी सिसोदिया यांनी सीबीआयच्या अटकेला आणि पाच दिवसांच्या कोठडीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
17:13 February 28
मदरशात अल्पवयीन विद्यार्थाला अमानुषपणे मारहाण
ठाणे - मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थाने केवळ पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून मदरशातील मौलवी शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे त्या अल्पवयीन विद्यार्थाला ७० सेकंदात ७० काठीचे फटके मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तीन महिन्यानंतर निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध कालमानुसार मौलवी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहाद भगत नुरी वय ३२ असे गुन्हा दाखल झालेल्या मौलवी शिक्षकाचे नाव असून तो फरार झाला आहे.
16:47 February 28
गौतम नवलखा सरकारचे एजंट असल्याचा माोवाद्यांना होता संशय - नवलखा यांच्या वकिलांचा दावा
मुंबई - गौतम नवलखा सरकारी एजंट असा माओवाद्यांचा संशय होता. त्यांचा माओवादी पक्षासोबत संबंध नाही, असा दावा गौतम नवलखा यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
16:35 February 28
सावत्र आईसोबत अन्याय करणाऱ्या मुलांना संपत्तीत वाटा नाही - हायकोर्ट
मुंबई - मुलांना बापाच्या संपत्तीत वाटा मिळणार नाही, कारण सावत्र आईसोबत त्यांनी अन्याय केला असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
16:30 February 28
सरकारला जनतेने नाकारले आहे, विधानपरिषद निकालावरुन ते स्पष्ट दिसते - अजित पवार
मुंबई - विद्यमान सरकारने दिवे लावले असते तर त्यांचा नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत सरकारच्या उमदवारांना लोकांनी नाकारले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या उमेदवारांना लोकांनी आस्मान दाखवले आहे. त्यामुळे आम्ही हे केले, आम्ही ते केले असे सांगणाऱ्या सरकारने खरेच काही केले असते तर त्यांच्या उमेदवारांचा पराभव झालाच नसता असा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
15:55 February 28
सुप्रीम कोर्टातील ठाकरे-शिंदे संघर्षाच्या खटल्याची आजची सुनावणी संपली, उद्या पुढील सुनावणी
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टातील ठाकरे-शिंदे संघर्षाच्या खटल्याची आजची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. आता उद्या यासंदर्भातील सुनावणी होईल. शिंदे गटाचे वकील कौल आणि जेठमलानी उद्या कोर्टात आपली बाजू मांडतील.
15:46 February 28
मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त केल्याने विनयभंग होत नाही - मुंबई हायकोर्ट
मुंबई - मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त केल्याने विनयभंग होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. एका रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्याकडे प्रेम व्यक्त केले. या प्रकरणी रिक्षाचालकाला जामिन मंजूर करताना कोर्टाने ही बाब स्पष्ट केली.
15:14 February 28
फ्लोअर टेस्ट ही एक औपचारिकता राहिली असती असे म्हणणे अयोग्य - कौल
नवी दिल्ली - अल्पमतात आल्याचे दिसून आल्यास संबंधित मुख्यमंत्र्यांना फ्लोर टेस्टला सामोरे जाण्यास सांगणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी माघार घेत राजीनामा दिला. त्याविरुद्ध एकच युक्तिवाद केला जात आहे की फ्लोअर टेस्ट ही फक्त औपचारिकता राहिली असती. हे योग्य नाही.
14:54 February 28
आमदार-मंत्र्यांनीच ठाकरे यांच्यावर अविश्वास दाखवला, राज्यपालांनाही त्यांनी हेच सांगितले - कौल
नवी दिल्ली - तुम्ही शिवसेना आहात की नाही हे तपासणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आमदारांनी समर्थन काढले, त्यानंतर बहुमत चाचणी यासंदर्भात गरजेची होती. कारण ठाकरे यांच्यांवर विश्वास नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले होते. राज्यापालांच्याकडे ज्यावेळी हे आमदार गेले, त्यानंतरच राज्यपालांनी बहुमत चाचणीची परवानगी दिली. त्यामुळे राज्यपालांचे निर्णय योग्यच होते असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील कौल यांनी केला आहे.
14:45 February 28
सरकार शाबूत राखणे हे राज्यपालांचे कर्तव्य, तेच त्यांनी केले - शिंदे गटाचे वकिल कौल
नवी दिल्ली - जेव्हा एखादा मुख्यमंत्री विश्वासमताला सामोरा जात नाही. तेव्हा त्याच्याकडे बहुमत नाही हे स्पष्ट होते. अशावेळी राज्यपालांना जर खात्री असेल की इतर निर्वाचित सदस्य सरकार बनवू शकतात. त्यामुळे राज्यपालांचे कर्तव्य आहे की, त्यांनी सरकार शाबूत राखणे. पण सर्वच पर्याय संपले असतील, तर राज्यपाल राष्ट्रपतींना सांगून सरकार बरखास्तीची शिफारस करु शकतात. असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील कौल करत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी ज्या परिस्थितीत निर्णय घेतला ते योग्य असल्याचा यु्क्तीवाद ते करत आहेत.
14:42 February 28
बिल गेट्स यांची रिझर्व बँकेला भेट, शक्तीकांत दास यांच्याशी चर्चा
मुंबई - मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आज रिझर्व बँकेला भेट दिली. यावेळी त्यांनी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी व्यापक चर्चा केली.
14:29 February 28
परिस्थितीजन्य वस्तुस्थितीचा विचार करता बहुमत घेणे योग्य - कौल
नवी दिल्ली - अनेक आमदारांनी मंत्रिपद सोडले होते. मंत्र्यांनाही सरकारमध्ये विश्वास नाही असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला होता. विधिमंडळ पक्षाच्या मोठ्या वर्गाचा सरकारला पाठिंबा नव्हता. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास राज्यपालांनी सांगणे यात काहीही अयोग्य नाही असे कौल यांनी स्पष्ट केले.
14:25 February 28
सरकार बहुमतात आहे की नाही हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य - शिंदे गटाचे वकील कौल
नवी दिल्ली - सरकार बहुमतात आहे की नाही हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य आहे. त्यासाठी बहुमत चाचणी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. खासकरुन तेव्हा हे जास्त गरजेचे असते जेव्हा विरोधक असे राज्यपालांना सांगतात की सरकार अल्पमतात आहे.
14:20 February 28
सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वकीलांचा युक्तीवाद सुरू, सर्व काही कायद्याला धरुन झाल्याचे वकिलांचे मत
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून युक्तीवादाची सुरुवात झाली आहे. संबंधित परिस्थितीत राज्यपालांचे निर्णय योग्य की अयोग्य, तसेच सभागृहात निर्णय कधी घेतला जातो. त्यासाठी काय प्रक्रिया असते यासंदर्भात शिंदे गटाचा युक्तीवाद वकील करत आहेत.
12:55 February 28
ठाकरे-शिंदे गटाच्या खटल्यातील युक्तीवाद गुरुवारपर्यंत पूर्ण करण्यासाठी सरन्यायाधीशांचे प्रयत्न
नवी दिल्ली - कोर्टातील सुनावणी दुपारी 2 वाजेपर्यंत लंच ब्रेकसाठी थांबवण्यात आली आहे. त्यानंतर शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडणार आहेत. यासंदर्भातील सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करण्याचा मानस सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी आज आणि उद्या दोन दिवसात युक्तीवाद पूर्ण करण्याच्या सूचना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्यासह इतरांना दिल्या. गुरुवारपर्यंत सॉलिसिटर जनरलसह सर्वांचा युक्तीवाद पूर्ण करण्याचा सुप्रीम कोर्टाचा प्रयत्न असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.
12:40 February 28
व्हीप ठरवण्याचा संसदीय कामकाजाशी काहीही संबंध नाही - ठाकरे गटाचा दावा
नवी दिल्ली - व्हीप ठरवण्याचा संसदीय कामकाजाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट मत ठाकरे गटाचे वकील कामत यांनी कोर्टापुढे सांगितले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे साधे अनियमिततेचे प्रकरण नाही तर हे घटनात्मक प्रकरण आहे असाही दावा वकील कामत यांनी केला. कामत हे दहाव्या परिशिष्टाच्या अनुषंगाने सभागृहात काय-काय अनियमितता झाल्या आहेत, यासंदर्भातील युक्तीवाद करत आहेत.
12:21 February 28
विधिमंडळात अपात्रतेचा निर्णय झाल्याशिवाय राज्यपाल निर्णय घेऊ शकत नाहीत - सिंघवी
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही निरीक्षणे मांडली, तसेच प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये जोपर्यंत राज्यपालांना किती आमदार अपात्र आहेत ते समजत नाही तोपर्यंत ते काही करू शकत नाहीत. तसेच सभापतींद्वारे अपात्रतेचा निर्णय घेतल्यानंतर राज्यपालांना किती आमदार कुणाकडे ते आकड्यांमधील स्पष्टतेमधून समजू शकते, असेही ते म्हणाले. तर ही गोष्ट राज्यपाल करु शकत नाहीत असे सिंघवी यांनी स्पष्ट केले. पक्ष आणि पक्षाचे नेते यामध्ये फरक केला पाहिजे असा युक्तवाद यावेळी सिंघवी यांनी केला. राज्यपालांनी फक्त निवडून आलेल्या नेत्यांचा विचार करुन चालत नाही असेही सिंघवी यांनी सरन्यायाधीशांनी मांडलेल्या निरीक्षणावर उत्तर दिले.
11:54 February 28
सिंघवी यांच्या जोरदार युक्तीवादानंतर सरन्यायाधीशांसह इतर न्यायमूर्तींची आपसात चर्चा सुरू
नवी दिल्ली - सिंघवी यांच्या युक्तीवादावर सध्या सरन्यायाधीशांसह इतर न्यायमूर्ती आपसात चर्चा करत आहेत. सिंघवी यांनी घटनात्मक बाबी तसेच पक्षांतर बंदी संदर्भातील तरतुदींचा पाढाच कोर्टापुढे वाचला. त्यानंतर कोर्टात न्यायमूर्तींची आपसात चर्चा सुरू आहे.
11:49 February 28
राज्यपालांच्या विरोधात अवमाननेची नोटीस काढा- सिंघवी यांची मागणी
नवी दिल्ली - ठाकरे गटाचे वकील डॉ. अभिषेक मनू सिंघवी यांनी तत्कालीन राज्यपालांच्या निर्णयावर अनेक आक्षेप नोंदवले आहेत. राज्यपालांनी त्यावेळी ठाकरे सरकार पाडण्याच्या अनुषंगाने घटनात्मक तरतुदी बाजूला ठेवून निर्णय घेतल्याचा आरोप सिंघवी यांनी कोर्टासमोर केला. त्यासाठी त्यांनी काही घटनात्मक बाबींचा पुरावाही दाखवून दिला. कोर्टाने काही निर्देश देऊनही त्यांनी मनमानी केली असा थेट आरोप करुन त्यांच्यावर कोर्टाच्या अनादराची नोटीस काढावी अशीही मागणी सिंघवी यांनी केली.
11:40 February 28
सर्वोच्च न्यायालय निर्णय घेऊ शकते - सिंघवी यांचा सुप्रीम कोर्टात युक्तीवाद
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात 27 जून रोजीची परिस्थिती येते त्यामुळे हे न्यायालय निर्णय देण्यास सक्षम आहे असा युक्तीवाद ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात येत आहे. हे प्रकरण असे आहे की जिथे फक्त सर्वोच्च न्यायालयच निर्णय घेऊ शकते. हे प्रकरण इतर कोणाकडेही सोपवू नये असेही सिंघवी यांनी स्पष्ट केले. आताच योग्य निर्णय घेतला नाही तर आपल्या घटनात्मक राजकारणावर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतील असेही सिंघवी म्हणाले. सर्वच गोष्टी तुमच्या न्यायिक क्षेत्रामध्ये येत आहेत. त्यामुळे योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी सिंघवी लावून धरत आहेत.
11:21 February 28
सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

11:20 February 28
गौतम नवलखा यांचा माओवादी पक्षाशी संबंध नाही: वकिलांचा दावा
भीमा कोरेगाव | गौतम नवलखा यांचा माओवादी पक्षाशी संबंध नाही, उलट त्यांना 'सरकारी एजंट' असल्याचा संशय आहे: वकील मुंबई उच्च न्यायालयाला सांगतात
10:50 February 28
एकनाथ शिंदेंनी पक्षद्रोह केलाय, त्यांना अपात्र ठरवणं कायद्यानं बंधनकारक
नागपूर:- एकनाथ शिंदे गटाने पक्ष द्रोह केला असल्याने त्यांना अपात्र ठरवणं कायद्याने बंधनकारक असल्याचं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत. शिंदे गटाने पक्ष सोडून जाताना कुठला गट किव्हा पक्ष निर्माण केला नव्हता तर त्यांनी भाजपचे सरकार असलेल्या राज्यात आश्रय घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या 40 आमदारांची मत ग्राह्य धरली. विधानसभेत आम्ही एकूण 124 जागा लढवल्या होत्या. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले त्या मतांचं बाप कोण हा विचार निवडणूक आयोगाने का केला नाही असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचल्याचा आरोप केला आहे.
केंद्रीय यंत्रणा बिकाऊ:- निवडणूक आयोग, सीबीआय, ईड हे विकाऊ संस्था आहे. सरन्यायाधीश निवृत्त झाल्याच्या महिन्याभरातचं खासदार राज्यपाल होतात असा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे.
10:34 February 28
दिल्ली अबकारी कर घोटाळा.. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची सर्वोच्च न्यायालयात धाव
दिल्ली अबकारी धोरण प्रकरण | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या अटकेला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली, त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आज एससीमध्ये केली जाण्याची शक्यता आहे.
10:05 February 28
ठाकरे गटाच्या नेत्यांना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळतोय: संजय राऊत
सत्तासंघर्ष नाही, चोरांविरुद्ध आमची लढाई
ठाकरे गटाच्या नेत्यांना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळतोय
जनता शिवसेनेच्या पाठीशी
तुमच्या पक्षात साधू-संत बसले आहेत का? संजय राऊतांच्या भाजपला सवाल
सरकार टिकवण्यासाठी दोन हजार कोटींचा खर्च
09:53 February 28
जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहिद

09:45 February 28
खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकल रेल्वेचे दोन डबे घसरले, वाहतूक विस्कळीत
मुंबई : खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकल रेल्वेचे दोन डबे घसरले, वाहतूक विस्कळीत
08:46 February 28
आयआयटी मुंबईमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना
मुंबई: आयआयटी मुंबईमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना
07:22 February 28
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी.. शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, शिंदे गटाचे वकील आज युक्तिवाद करणार आहेत.
07:18 February 28
गुजरातच्या वलसाड येथील कंपनीत भीषण स्फोट.. २ कामगार ठार, २ जखमी
वलसाड, गुजरात | काल रात्री अकराच्या सुमारास सारीगाम GIDC येथील एका कंपनीत झालेल्या स्फोटात २ ठार तर २ जखमी झाले. स्फोटाचे कारण समजलेले नाही. बचाव कार्य तात्पुरते थांबवण्यात आले असून, सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही: एसपी, वलसाड
07:14 February 28
बुलढाण्यात मिलिटरी स्कुलमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केले अनैसर्गिक कृत्य.. गुन्हा दाखल
बुलढाणा: राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका शिक्षकाविरुद्ध अनैसर्गिक कृत्याची तक्रार केली होती. आम्ही शिक्षक धर्मेंद्र उत्तम हिवाळे यांच्यावर पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे: प्रल्हाद काटकर, शहर निरीक्षक, बुलढाणा, महाराष्ट्र
06:35 February 28
भारत, अफगाणिस्तान, ताजिकिस्तानला भूकंपाचे झटके
नवी दिल्ली: भारत, अफगाणिस्तान, ताजिकिस्तानला भूकंपाचे झटके बसले आहेत. ताजिकिस्तानला ४.३, अफगाणिस्तानला ४.१ तर भारतातील मणिपूर राज्यात ३.४ रिश्टर स्केलचे धक्के मध्यरात्री जाणवले आहेत.
06:24 February 28
WORLD INDIA MAHARASHTRA CRIME POLITICS BREAKING NEWS LIVE UPDATES TODAY
देश, विदेश आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा