ETV Bharat / state

Breaking News : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी अविनाश जाधव आक्रमक - राजकारण ब्रेकिंग न्यूज

MAHARASHTRA BREAKING CRIME POLITICAL BUDGET SESSION LIVE UPDATES TODAY
देश, विदेश आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
author img

By

Published : Mar 4, 2023, 6:54 AM IST

Updated : Mar 4, 2023, 9:31 PM IST

21:29 March 04

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी अविनाश जाधव आक्रमक

अविनाश जाधव यांनी ठाण्यात केली मारहाणीची तयारी

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघे ठाण्यातील रहिवासी

19:59 March 04

लातूरमध्ये मोटारसायकलच्या वेगवेगळ्या अपघातात 6 ठार

लातूर - जिल्ह्यात मोटारसायकलच्या दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. एका घटनेत पिकअप टेम्पोतून नेत असलेल्या नऊ मेंढ्यांचाही मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री लातूर तहसीलमध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टेम्पो ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने चार जण जागीच ठार झाले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. जावळा गावाजवळ हा अपघात झाला.

19:33 March 04

मुंबईत भांडण सोडवणे एकाला पडले महागात, भांडणाऱ्या दोघांनी केला खून

मुंबई - सायनमध्ये शनिवारी एका 56 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा यात हकनाक बळी गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पंजाबी कॉलनीमध्ये ही घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. किरकोळ कारणावरुन दोघे भांडत होते. त्यांची भांडणे सोडवण्याचा तिसऱ्याने प्रयत्न केला. तर त्यालाच दोघांनी भोकसले.

18:51 March 04

ठाणे रेल्वेस्टेशनवर महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी 2 मोबाईल चोरांच्या आवळल्या मुसक्या

ठाणे - महिला सुरक्षा कर्मचार्‍यांच्या पथकाने ठाणे स्थानकावर उपनगरीय रेल्वे प्रवाशाचा मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी दोन जणांना पकडले आहे. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली. शुक्रवारी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवेश करत असताना राकेश धोतले (२१) आणि प्रेम ढवळे (२०) या दोघांना मोबाईल चोरी प्रकरणी अटक केल्याचे आज सांगण्यात आले.

17:13 March 04

जिल्हा नियोजन समितीचा निधी पडून केवळ २५ टक्के निधी झाला खर्च

मुंबई - राज्याचा सर्वांगीण विकासाकरिता राखीव असलेल्या जिल्हा नियोजन समितीचा निधीतून केवळ २५ टक्के रक्कम आतापर्यंत खर्च झाली आहे. राज्यातील सत्ताबदल आणि सत्तासंघर्षाच्या वादात उर्वरित निधी पडून आहे. राज्यातील विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे.​ शिल्लक निधीचा अनावश्यक कामांवर राज्य शासनाने खर्च करु नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ​

16:31 March 04

धारवाडमधील उद्योगपती रमेश बोंगेरी यांच्या घरातून तीन कोटी रुपये जप्त

हुबळी - धारवाड सीसीबी पोलिसांनी साई गार्डन परिसरातील उद्योगपती रमेश बोंगेरी यांच्या घरातून तीन कोटी रुपये जप्त केले. पुढील तपासासाठी हे प्रकरण आयकर विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. केंद्रीय गुन्हे शाखेने ही माहिती दिली.

16:28 March 04

मित्राला मारहाण करणाऱ्या टेम्पो चालकाचा खून; एक आरोपी अटक दुसरा फरार

ठाणे : तीन मित्र दारू पीत बसले होते. त्या ठिकाणी येऊन मुलीची बॅग चोरल्याच्या संशयातून तिघापैकी एकाला टेम्पो चालकाने मारहाण केली होती. त्यानंतर मारहाणीचा बदला घेण्यासाठी दोघा मित्रांनी मिळून त्या टेम्पो चालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यात कोनगावातील गावदेवी मंदिराच्या पुढे असलेल्या कचरा कुंडीजवळ घडली आहे.

16:13 March 04

चंद्रपूर जिल्ह्यात हायवेवर 'जगातील पहिला' बांबू क्रॅश बॅरियर बसवला - गडकरी

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावर 200 मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरिअर बसवण्यात आला आहे. अशा प्रकारचा हा जगातील पहिला प्रयोग आहे, असे ते म्हणाले. हा क्रॅश बॅरियर स्टीलला एक योग्य पर्याय आहे, तसेच पर्यावरणपूरकही आहे.

16:08 March 04

आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ठाणे - महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक महापालिका आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस भागवत यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

15:19 March 04

सिसोदिया यांना दिलासा नाहीच, 6 मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत वाढ

दिल्ली - उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय कोठडीत 6 मार्चपर्यंत वाढ केली आहे. आप आमदार सौरभ भारद्वाज यांनी यावर उद्विग्नता व्यक्त केली आहे. सीबीआयचा पुरावा आणि सत्याशी काहीही संबंध नाही. ते फक्त केंद्र सरकारचे म्हणणे ऐकत आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया मनीष सिसोदिया यांना त्रास देण्यासाठीच सुरू आहे, असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

14:45 March 04

सरकार नरमले, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुन्या पेन्शनबाबत बैठक - उपमुख्यमंत्री

मुंबई - जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात आधी आक्रमक विरोधी भूमिका घेणाऱ्या सरकारला जनरेट्यापुढे नमते घ्यावे लागत असल्याचे दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेबाबत बैठक घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

14:27 March 04

आरएसएस प्रकरणी राहुल गांधींवरील खटल्याची सुनावणी १ एप्रिलला

ठाणे : खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची पुढील १ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितले.

14:20 March 04

ठाणे ते मुलुंड नवीन रेल्वे स्थानक निर्मितीने प्रवाशांना फायदा होईल - मुख्यमंत्री

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाणे मेंटल हॉस्पिटलच्या जमिनीचा काही भाग रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्यावरील स्थगिती उठवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, नवीन सुविधेमुळे रेल्वे स्टेशनच्या बांधकामात घट होईल. ठाणे आणि मुलुंड स्थानकांवरील प्रवाशांचा भार त्यामुळे कमी होईल.

13:42 March 04

अभिनेत्री तुनिषा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शिझान खानला जामिन मंजूर

मुंबई - अभिनेत्री तुनिषा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शिझान खान याला अखेर न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणी शिझानने तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा मुख्या आरोप आहे. तसेच लव्ह जिहादचाही या प्रकरणी संबंध असल्याची चर्चा आहे.

12:39 March 04

आम्हाला माहिती आहे कोणी केलाय हल्ला - संदीप देशपांडे

संदीप देशपांडे पत्रकार परिषद मुद्दे -

माझा जबाब पोलिसांना दिला आहे

जेव्हा आरोपी पकडले जातील गोष्टी बाहेर येतील तेव्हा यावर सविस्तर बोलेन

मला जे वाटते ते मी पोलिसांना सांगितले आहे

मला मारहाण करताना जे ऐकू आले आहे तेसुद्धा सांगितले आहे

ते आता सांगणे योग्य नाही. त्यामुळे वेळ आल्यावर नक्की बोलेन

मी नेहमीप्रमाणे वॉकला गेलो होतो

त्यावेळी ५ नंबरचा गेट आहे तिथे माझ्यावर हल्ला झाला

मला वाटले बॉल लागला पण मागे वळून पाहिले तर एकजण माझ्या डोक्यावर हल्ला करणार होते

तेवढ्यात मी हाताने आडवले आमचात झटापट झाली

तेवढ्यात लोकसुद्धा मध्ये आले जास्त लोक आल्यामुळे ते पळून गेले

पोलीस तपास करत आहेत

पोलिसांना चौकशी करु देत आम्हाला माहिती आहे कोणी केलाय हल्ला

आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे

भांडुप कनेक्शन आता बाहेर आले आहे

पोलिस तपास करतायत

मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून तब्येतीची विचारपूस केली

त्यांनी मला २ पोलीस सुरक्षेसाठी दिले आहेत

पण त्यांना माझी नम्र विनंती आहे की सरकारने सुरक्षा काढून घ्यावी

आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही

12:28 March 04

सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर दुपारी 2 वाजता सुनावणी

नवी दिल्ली - दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज दुपारी 2 वाजता होणार आहे. विशेष सीबीआय कोर्टात ही सुनावण होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमिवर कोर्ट परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

12:18 March 04

कांद्याचे दर घसरल्याने सुपा चौकात रास्ता रोको शेतकरी आक्रोश आंदोलन

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर-पुणे महामार्गावर सुपा चौकात रास्ता रोको आंदोलनाल करण्यात आले. कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांची उपस्थिती या आंदोलनात असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित आहेत. सरकारच्या कांदा धोरणाचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येत आहे. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात येत आहे.

11:58 March 04

जुन्या पेंशनयोजनेसाठी कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महामोर्चा

कोल्हापूर - जुनी पेंशन लागू करा या मागणीसाठी कोल्हापुरात महामोर्चाचे आयोजन. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन. मोर्चाला हजारोंच्या संख्येने सरकारी कर्मचारी उपस्थित. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे आयोजन.

11:20 March 04

मनीष सिसोदियांचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

दिल्ली | 'आप'चे मनीष सिसोदिया यांनी आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात जामीन अर्ज दाखल केला. उद्या, ४ मार्च रोजी सुनावणी होऊ शकते. मनीष सिसोदिया सध्या सीबीआय कोठडीत आहेत. नुकतीच सीबीआयने अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक केली होती.

10:38 March 04

कसब्याच्या निकालातून सत्ताधाऱ्यांनी धडा घ्यावा: संजय राऊत

  • कसब्याच्या जनतेनं धनशक्ती लाथाडली
  • मविआ एकत्र राहिल्यास राज्यात कसब्यासारखा निकाल
  • कोणत्याही नागरिकांवर हल्ला होऊ नये, गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं

10:31 March 04

भाजप आमदाराला लाच घेताना पकडले.. काँग्रेसचे आंदोलन सुरु

बेंगळुरू | लाच घेताना पकडले गेलेले भाजप आमदार मादल विरुपाक्ष यांना अटक करण्याची मागणी करत कर्नाटकमध्ये भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केले.

10:30 March 04

तामिळनाडूत स्थानिक आणि परप्रांतीय कामगारांमध्ये संघर्ष नसल्याचा दावा

तामिळनाडू | स्थलांतरित कामगार आणि स्थानिक कामगार यांच्यात कोणताही संघर्ष नाही आणि अशी माहिती प्रसारित करणे खोटी आहे आणि वास्तविक स्थिती उघड करणारी नाही: कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्री आणि सदर्न इंडिया मिल्स असोसिएशन

10:29 March 04

भारतीय सैनिकांनी लडाखमध्ये घेतला आईस हॉकी सामन्यात सहभाग

लडाख सेक्टरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानांनी डीबीओ सेक्टरमध्ये झालेल्या आइस हॉकी सामन्यात भाग घेतला: भारतीय लष्कराचे अधिकारी

10:25 March 04

स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने देशातील पायाभूत सुविधांवर आवश्यक तितका भर दिला गेला नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

यंदाच्या अर्थसंकल्पामुळे पायाभूत सुविधा क्षेत्राला नवी वाढीची ऊर्जा मिळणार आहे. देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत पायाभूत सुविधांचा विकास हा नेहमीच महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे: 'पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक' या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी.

आज राष्ट्रीय महामार्गांचे सरासरी वार्षिक बांधकाम 2014 पूर्वीच्या तुलनेत जवळपास 2 पटीने झाले आहे. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर, आधुनिक पायाभूत सुविधांवर आवश्यक तेवढा भर दिला गेला नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक' या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये

09:07 March 04

१२ वी पेपरफुटी प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

१२ वी पेपरफुटी प्रकरणात सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

09:06 March 04

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात दोन जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात दोन जण पोलिसांच्या ताब्यात.. गुन्हे शाखेची कारवाई

07:06 March 04

अमेरिकेकडून युक्रेनसाठी ४०० दशलक्ष डॉलर्सचे लष्करी मदत पॅकेज जाहीर

युनायटेड स्टेट्सने युक्रेनसाठी $400 दशलक्ष किमतीचे नवीन लष्करी मदत पॅकेज जाहीर केले ज्यामध्ये रणगाडे आणि चिलखती वाहने हलविण्यासाठी रणनीतिक पुलांचा समावेश आहे, रॉयटर्सच्या अहवालात

06:49 March 04

अनुष्का शर्मा, विराट कोहलीने घेतले उज्जैनच्या बाबा महाकालचे दर्शन

मध्य प्रदेश: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली.

06:40 March 04

MAHARASHTRA BREAKING CRIME POLITICAL BUDGET SESSION LIVE UPDATES TODAY

देश, विदेश आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स, जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा

Last Updated : Mar 4, 2023, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.