ETV Bharat / state

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, बेस्ट करणार कंत्राटदारावर कारवाई - Work stoppage movement of contract employees

बेस्टकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर एसी बसेस चालवल्या जात आहेत. एकीकडे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत असताना कंत्राटदारांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार, बोनस आदी सुविधा दिल्या जात नसल्याने शनिवार ते सोमवार तीन दिवस आंदोलन करण्यात आले. याचा फटका थेट प्रवाशांना बसला आहे. यामुळे कंत्राटामधील अटी व शर्तीचा भंग केल्याने कंत्राटदारावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बेस्ट बस
बेस्ट बस
author img

By

Published : Oct 25, 2022, 4:04 PM IST

मुंबई - बेस्टकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर एसी बसेस चालवल्या जात आहेत. एकीकडे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत असताना कंत्राटदारांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार, बोनस आदी सुविधा दिल्या जात नसल्याने शनिवार ते सोमवार तीन दिवस आंदोलन करण्यात आले. याचा फटका थेट प्रवाशांना बसला आहे. यामुळे कंत्राटामधील अटी व शर्तीचा भंग केल्याने कंत्राटदारावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन दिवस आंदोलन - बेस्ट कडून कंत्राटी पद्धतीने एसी बसेस चालवल्या जात आहेत. या बस वर नियुक्त केलेल्या कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराकडून समान वेतन, बोनस आणि अन्य आवश्यक कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. १७ हजार पगार देण्याचे सांगून केवळ १२ हजार पगार दिला जात आहे. तसेच वाहतुकीचे कंत्राट अन्य संस्थांना दिले तरी सध्याच्या कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित केले जावे, बेस्टमधील कंत्राटी कामगारांना कामयस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीपूर्वी बोनस दिला जावा, अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, पगारवाढ, जॉयनिंग लेटर या मागण्या करण्यात आल्या आहेत.

आंदोलन केल्याने याचा फटका - या मागण्यांसाठी शनिवारी सांताक्रुझ डेपो येथे मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. रविवारी सांताक्रुझ, धारावी, प्रतिक्षा नगर, मजास डेपो मधील सुमारे हजारहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. रविवारी कंत्राटदाराने ७५०० रुपये बोनस देण्याचे मान्य केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. काल सोमवारी मरोळ आणि दिंडोशी डेपोमध्ये असलेल्या हंसा कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. ऐन दिवाळीचा सण सुरु झाल्यावर हे आंदोलन केल्याने याचा फटका प्रवाशांना बसला.

कंत्राटदारावर होणार कारवाई - बेस्ट उपक्रमाने कंत्राटदाराकडून एसी बसेस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. त्यासाठी बेस्ट आणि कंत्राटदार यांच्यात करार झाला आहे. बेस्ट कंत्राटदाराला प्रति किलोमीटर प्रमाणे रक्कम देत आहे. कंत्राटदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये पगार आणि बोनसचा वाद आहे. यामुळे मातेश्वरी आणि हंसा ट्रान्सपोर्टच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. या वेळेत कंत्राटदाराच्या बस बंद असताना प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बेस्टने आपल्या ड्रायव्हरना सांगून रस्त्यावर बसेस उतरवल्या. गेल्या तीन दिवसात कंत्राटदाराच्या बसेस रस्त्यावर आल्या नसल्याने करारामधील अति व शर्थी यांचा भंग झाला आहे. यामुळे कंत्राटदारावर कारवाई केली जाईल अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.