ETV Bharat / state

Marathi Bhasha Bhavan : मराठी भाषाभवनाचे काम २ वर्षांत पूर्ण होईल - उदय सामंत - Marathi Language Bhavan

चर्नीरोड तसेच नवी मुंबईमधील ऐरोली येथे पुढील २ वर्षांत मराठी भाषाभवनाचे ( Marathi Language Bhavan ) काम पूर्ण होईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant Industries Minister ) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Uday Samant Industries Minister
Uday Samant Industries Minister
author img

By

Published : Nov 24, 2022, 10:25 PM IST

मुंबई - चर्नीरोड येथील मराठी भाषाभवन ( Marathi Bhasha Bhavan ) नवी मुंबईमधील ऐरोली येथे मराठी भाषा उपकेंद्र यांच्या इमारतींची मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर ( Marathi Language Minister Deepak Kesarkar ) यांच्या हस्ते पायाभरणी येत्या महिनाभरात होईल. पुढील २ वर्षांत मराठी भाषाभवनाचे ( Marathi Language Bhavan ) काम पूर्ण होईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant Industries Minister ) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठी भाषाभवनाचे काम २ वर्षांत पूर्ण - उदय सामंत

मराठी भाषा भवनासाठी सरकारकडून १२६ कोटी - मराठी भाषा भवनाचे काम रखडल्याचा विरोधकांकडून सातत्याने आरोप सुरू आहे. शिंदे सरकारच्यावतीने मंत्री उदय सामंत यांनी या आरोपांला प्रत्युत्तर दिले. मराठी भाषा भवनासाठी सरकारकडून १२६ कोटी रुपये, तर उपकेंद्रासाठी २६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून या दोन्ही इमारतींचे काम केले जाणार आहे. मराठी भाषाभवनाचा प्रकल्प हा महाराष्ट्राची अस्मिता जपणारा विषय आहे. भाषाभवनासाठी १२ कोटी रुपये उद्योग विभागाकडे आले आहेत. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेवर टीका - नवी मुंबई येथे उपकेंद्राच्या जागेची आज पाहणी केली. येथील प्रकल्पाचा आढावा घेतला. उपकेंद्राच्या जागेवर ८५० झाडे लावण्यात येणार आहे. तसेच या उपकेंद्रासाठी १० कोटी रुपयांचा निधी उद्योग विभागाकडे देण्यात आले आहे. येत्या ८ दिवसांत येथे पायाभरणी केली जाईल, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. भाषा भवनाचे काम रखडल्याचा आरोप करणाऱ्यांनी कशासाठी आणि का घाई केली.? आता त्या वादात जाणार नसल्याचे सांगत मराठी भाषा भवनाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही सामंत यांनी निशाणा साधला.

अभिजात भाषेचा दर्जा लवकरच - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा २ हजार वर्षे पूर्वीची असावी लागते. मराठी भाषा २ हजार ३०० वर्षापूर्वीची आहे. याविषयीची कागदपत्रे महाराष्ट्र सरकारकडून केंद्रशासनाला सादर करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभिजात भाषेसाठी पंतप्रधानांची भेट घेण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

मंदिरात जाऊन नतमस्तक होणे, ही अंधश्रद्धा नाही - मंदिरामध्ये जाऊन देवाच्या पाया पडणे रूचत नसेल, तर ही धर्माची चेष्टा आहे. देवाच्या पुढे नतमस्तक होण्यात वावगे काय आहे ? जे सकाळी पत्रकार परिषद घेतात, ते सायंकाळी देवळात जाऊन नमस्कार करतात. देवळात जाऊन नमस्कार करण्यात चुकीचे काय आहे ? आम्ही देवळात गेलो की, अंधश्रद्धा आणि अन्यांची श्रद्धा असे आहे का ? अनेकजण देवळात जातात. देवळात जाऊन नतमस्तक होण्याचे अवडंबन करण्यात काही अर्थ नाही, असे या वेळी उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे कामाश्रीदेवीच्या मंदिरात जाण्याविषयी विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टिकेवर सामंत यांनी हल्लाबोल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.