ETV Bharat / state

विधानसभेच्या तयारीला लागा; नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक पार पडली. यावेळी पवार यांनी राज्यभरात राष्ट्रवादीला आलेल्या अपयशाची माहिती घेतली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील अपयश पूर्णपणे विसरून कार्यकर्त्यांनी आता विधानसभेसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले.

विधानसभेच्या तयारीला लागा; नव्या चेहऱयांना संधी मिळेल, शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश
author img

By

Published : Jun 1, 2019, 8:33 PM IST

Updated : Jun 1, 2019, 11:22 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पूर्णपणे विसरून जा आणि राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत करा, असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिले.

विधानसभेच्या तयारीला लागा; नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक पार पडली. यावेळी पवार यांनी राज्यभरात राष्ट्रवादीला आलेल्या अपयशाची माहिती घेतली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील अपयश पूर्णपणे विसरून कार्यकर्त्यांनी आता विधानसभेसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले. यावेळी विधानसभेला पक्षाकडून तरुण आणि महिलांना अधिकाधिक संधी द्यायची असून त्यासाठीचे उमेदवार आणि कार्यकर्ते यांना संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आजही जनमानसात संशयाचं व चिंतेचे असे वेगळे वातावरण आहे. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेत सावध राहायला हवे असे आवाहनही शरद पवार यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीत तरुण चेहर्‍याना संधी दिली जाणार आहे. आज ४० लोकं आहेत. ४० जणांचा संच आहे. एकजुटीने काम करुया. आपले अस्तित्व, आपले घर आपण आबाधीत राखले असल्याचेही सांगत पवारांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

मोदींवर निशाणा -

सत्तेत आलेले लोक विधानसभा निवडणुकीत धार्मिक उन्माद किती करतील माहित नाही. हा धार्मिक उन्माद आवरायचा असेल तर सेक्युलर लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. समाजात धार्मिक उन्माद कसा वाढेल याचा प्रयत्न पंतप्रधानांनी प्रचारात केला. प्रचाराची दिशा त्यांनी बदलण्याचे काम केले. देशात बेरोजगारी हा महत्वाचा प्रश्न होता. आज देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. शेती व शेतीव्यवसायातील अपयश असेल किंवा शेतकरी आत्महत्या असतील महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्याचे चित्र होते. ते मतदानातून व्यक्त होईल, अशी अपेक्षा होती. परंतु मोदींनी सर्वांचा आढावा घेवून प्रचाराचे सुत्र दुसरीकडे वळवले. लोकांच्या भावनेला आवाहन करुन प्रखर राष्ट्रवाद वाढवला असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

देशाचे होत असलेले ऐक्य लक्षात घेता हे सरकार जाईल असे वाटले होते. परंतु पंतप्रधानांनी केलेली आक्रमक भाषणे तरुण पिढीसमोर गेली. त्यामुळे वेगळे चित्र निर्माण झाले. आपण शेतकरी, शेती, ऐक्य याचे विचार मांडत होतो परंतु त्यांनी वेगळे विचार मांडले. त्यामुळे त्यांना यावेळी जास्त जागा मिळाल्या असेही शरद पवार म्हणाले.

निवडणूक यंत्रणेबाबत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रभाव आजच्या पंतप्रधानांपेक्षा जास्त होता, तरी त्यांचा पराभव झाला. त्यावेळी कुणी मशीनवर शंका घेतली नाही. राजीव गांधी यांचाही पराभव झाला. त्यावेळी कुणी शंका घेतली नाही. परंतु आजच का शंका बळावली आहे. या मशीनबाबत आम्ही न्यायालयात गेलो. आता निकाल लागला तो पराभव मान्य केला, परंतु म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये, असेही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी मोदी सरकारने कशापध्दतीने यंत्रणा वापरली किंवा कशापध्दतीने आता आपल्याला काम करायला हवे याबाबत माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत कसा प्रचार आणि काम करायचे याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

Intro:विधानसभेच्या कामाला लागा - शरदपवारांनी दिले कार्यकर्त्यांना आदेश Body: विधानसभेच्या कामाला लागा - शरदपवारांनी दिले कार्यकर्त्यांना आदेश

(बैठकीचे व्हीज्वल मोजोवर पाठवले, ते वापरावेत)

मुंबई, ता. :

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पूर्णपणे विसरून जाऊन राज्यात येत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर कॉकस करत यासाठीच्या कामाला लागा असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले.
लोकसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठक पार पडली. यावेळी पवार यांनी राज्यभरात राष्ट्रवादीला अपयशाची माहिती घेत कार्यकर्त्यांनी आता सर्व विसरून विधानसभेसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले.यावेळी विधानसभेला पक्षाकडून तरुण आणि महिलांना अधिकाधिक संधी द्यायची असून त्यासाठीचे उमेदवार आणि कार्यकर्ते यांना संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

आजही जनमानसात संशयाचं व चिंतेचे असे वेगळे वातावरण आहे. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेत सावध राहायला हवे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
तरुण चेहर्‍याना संधी दिली जाणार आहे. आज ४० लोकं आहेत. ४० जणांचा संच आहे. एकजुटीने काम करुया. आपलं अस्तित्व, आपलं घर आपण आबादीत राखलं आहे असेही शरद पवार म्हणाले.
सत्तेत आलेले लोक विधानसभा निवडणुकीत धार्मिक उन्माद किती करतील माहित नाही. करतीलही. हा धार्मिक उन्माद आवरायचा असेल तर सेक्युलर लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले.समाजात उन्माद कसा वाढेल असा प्रयत्न पंतप्रधानांनी प्रचारात वापरला. प्रचाराची दिशा त्यांनी बदलण्याचे काम केले. देशात बेरोजगारी हा महत्वाचा प्रश्न होता. आज देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. शेती व शेतीव्यवसायातील अपयश असेल किंवा शेतकरी आत्महत्या असतील महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्याचे चित्र होते. ते मतदानातून व्यक्त होईल अशी अपेक्षा होती. परंतु मोदी यांनी सर्वांचा आढावा घेवून प्रचाराचे सुत्र दुसरीकडे वळवले. लोकांच्या भावनेला आवाहन करुन प्रखर राष्ट्रवाद वाढवला असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

देशाचे होत असलेले ऐक्य लक्षात घेता हे सरकार जाईल असं वाटलं होतं. परंतु पंतप्रधान यांनी केलेली आक्रमक भाषणे तरुण पिढीसमोर गेली. त्यामुळे वेगळे चित्र निर्माण झाले.आपण मांडले शेतकरी, शेती, ऐक्य याचे विचार मांडत होतो परंतु त्यांनी वेगळे विचार मांडले त्यामुळे त्यांना यावेळी जास्त जागा मिळाल्या असेही शरद पवार म्हणाले.

निवडणुक यंत्रणेबाबत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला.अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रभाव आजच्या पंतप्रधानापेक्षा जास्त होता तरी त्यांचा पराभव झाला. त्यावेळी कुणी मशीनवर शंका घेतली नाही. राजीव गांधी यांचाही पराभव झाला. त्यावेळी कुणी शंका घेतली नाही. परंतु आजच का शंका बळावली आहे. या मशीनबाबत आम्ही कोर्टात गेलो. आता निकाल लागला तो पराभव मान्य केला परंतु म्हातारी मेल्याचे दु:ख नाही परंतु काळ सोकावतो कामा नये असेही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी मोदी सरकारने कशापध्दतीने यंत्रणा वापरली किंवा कशापध्दतीने आता आपल्याला काम करायला हवे याबाबत माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत कसा प्रचार आणि काम करायचे याचे मार्गदर्शन केले.

Conclusion:विधानसभेच्या कामाला लागा - शरदपवारांनी दिले कार्यकर्त्यांना आदेश
Last Updated : Jun 1, 2019, 11:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.