ETV Bharat / state

मुलाना लांबवून अंगावरील सोने लुटणाऱ्या महिलेस अटक - mumbai

देवनार येथून पळवून आणलेल्या एका चिमुरडीने दाखविलेल्या धाडसाने आणि समयसूचकतेने आरोपी महिलेला अटक तर झालीच. त्याचबरोबर, चिमुरडीसह तिची मावस बहिणही सुखरूप घरी परतली.

mumbai
मुलीसोबत तिचे आई-वडील
author img

By

Published : Dec 30, 2019, 5:13 AM IST

मुंबई- मुलांना पळवून नेवून त्यांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगारास गजाआड करण्यात देवनार पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलेने देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 मुलींना आणि घाटकोपरमधून 4 मुलांना पळवून नेवून त्यांचा अंगावरील दागिने चोरले होते. संजना देविदास बारिया, असे या आरोपी महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी माहिती देताना अपहरण झालेली मुलगी आणि देवनार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रागिणी भागावत

देवनार येथून पळवून आणलेल्या एका चिमुरडीने दाखविलेल्या धाडसाने आणि समयसूचकतेने या महिलेला अटक तर झालीच. त्याचबरोबर, चिमुरडी तिच्या मावस बहिणीसह सुखरूप घरी परतली. गोवंडीतील पाटीलवाडीमध्ये आपल्या आजारी आजोबांना पाहण्यासाठी शुक्रवारी सकाळी मावशीकडे संध्या संदीप गंगावणे ही 12 वर्षाची चिमुरडी तिच्या आईसह साताऱ्यावरून भेटण्यास आली होती. सकाळी संध्याला तिच्या आईने बाजूच्या दुकानावर साबण आणण्यास पाठविले होते. ती जेव्हा दुकानावर आली तेव्हा तिला आरोपी महिला संजना हिच्यासोबत तिची चार वर्षाची मावस बहीण दिव्या मारुती माने ही दिसली.

संध्याने दिव्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता आरोपी महिलेने त्यांना आपल्याला मंदिरात जायचे आहे. आणि मी दिव्याच्या आईची मैत्रीण असल्याचे त्यांना सांगितले. आणि रिक्षात बसवून त्यांना घाटकोपर बस आगारच्या दिशेने आणले. त्यांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या उद्देशाने तिने या मुलींचे अपहरण केले होते. परंतु, घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीनगर घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर येताच या मुली जोरात रडू लागल्याने आरोपी महिला त्यांना तिथेच सोडून निघून गेली. परंतु, संध्याने त्वरित तिच्या मावस बहिणीला काही अंतरावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडे नेवून त्यांना आपल्या वडिलांना फोन लावण्यास सांगितले.

संध्याचे तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचा फोन नंबर पाठ असल्याने तिने दिलेल्या क्रमांकावर वाहतूक पोलिसांनी फोन लावला. तसेच, पंतनगर पोलिसांना देखील याची माहिती दिली. याच दरम्यान या आरोपी महिलेने पंतनगर पोलीस ठाण्याचा हद्दीतूनही चार मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करून त्यांचे दागीने काढून घेतल्याची तक्रार आली. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने या महिला आरोपीचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांची तत्परता आणि चिमुरडीने दाखविलेली समयसूचकता यामुळे ही महिला आरोपी गजाआड झाली आहे.

हेही वाचा- केमिकल कारखाने रहिवासी वस्तीतून हद्दपार करण्याची गरज - महापौर

Intro:मुलाना लांबवून अंगावरील सोने लुटणाऱ्या महिलेस अटक

देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुलींना आणि घाटकोपर मधून चार मुलांना पळवून नेवून त्यांचा अंगावरील दागिने चोरणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगाराला देवनार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजना देविदास बारिया असे या आरोपी महिलेचे नाव आहेBody:मुलाना लांबवून अंगावरील सोने लुटणाऱ्या महिलेस अटक

देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुलींना आणि घाटकोपर मधून चार मुलांना पळवून नेवून त्यांचा अंगावरील दागिने चोरणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगाराला देवनार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजना देविदास बारिया असे या आरोपी महिलेचे नाव आहे.

देवनार येथून पळवून आणलेल्या एका चिमुरडीने दाखविलेल्या धाडसाने आणि समयसूचकतेने या महिलेला अटक तर झालीच परंतु तिच्यासह तिच्या मावस बहिणीसह ती सुखरूप घरी परतली आहे. गोवंडी येथील पाटीलवाडी मध्ये आपल्या आजारी आजोबाना पाहण्यासाठी शुक्रवारी सकाळी  मावशीकडे संध्या संदीप गंगावणे हि बारा वर्षाची चिमुरडी तिच्या आईसह साताऱ्यावरून भेटण्यास आली होती. सकाळी संध्याला तिच्या आईने बाजूच्या दुकानावर साबण आणण्यास पाठविले होते. ती जेव्हा दुकानावर आली तेव्हा तिला आरोपी महिला संजना हिच्या सोबत तिची चार वर्षाची मावस बहीण दिव्या मारुती माने हि दिसली. तेव्हा तिने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता आरोपी महिलेने त्यांना आपल्याला मंदिरात जायचे आहे. आणि मी दिव्या च्या आईची मैत्रीण असल्याचे त्यांना सांगितले आणि रिक्षात बसवून त्यांना घाटकोपर बस आगारच्या दिशेने आणले. त्यांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा उद्देशाने तिने या मुलींचे अपहरण केले होते. परंतु घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीनगर घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर येताच या मुली जोरात रडू लागल्याने त्या महिलेने त्यांना तिथेच सोडून निघून गेली. परंतु संध्या ने त्वरित तिच्या मावस बहिणीला काही अंतरावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडे नेवून त्यांना आपल्या वडिलांना फोन लावण्यास सांगितले. संध्याचे तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचा फोन नंबर पाठ असल्याने तिने दिलेल्या क्रमांकावर वाहतूक पोलिसांनी फोन लावला तसेच पंतनगर पोलिसांना देखील याची माहिती दिली.याच दरम्यान या आरोपी महिलेने पंतनगर पोलीस ठाण्याचा हद्दीतून हि चार मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करून त्यांचे दागीने काढून घेतल्याची तक्रार आली. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज च्या सहाय्याने या आरोपीचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांची तत्परता आणि चिमुरडीने दाखविलेली समयसूचकता यामुळे हि आरोपी गजाआड झाली आहे. 
byte : संध्या गंगावणे(अपहरण झालेली मुलगी )
byte : रागिणी भागावत(वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवनार पोलीस ठाणे ) 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.