मुंबई - जिल्ह्यात अनेक नवनवीन प्रयोग व कामे केली जातात त्या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) महिलांचा सहभाग वाढविला पाहिजे. तीर्थक्षेत्र ठिकाणी बचत गटांना आवश्यक काम मिळवून दिले पाहिजे व देशात कृषी पर्यटन सुरू झाले आहे. या ठिकाणी महिलांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
माविमने उद्योग विभागाचे नवीन धोरणामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे
युनोने 1 ऑक्टोबर, 2020 रोजी घेतलेल्या सभेत 2020 ते 2030 दशक हे कृती दशक म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे शाश्वत विकासासाठी शासनाला कार्यवाही करावी लागेल. यावेळी माविमने उद्योग विभागाचे नवीन धोरणामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विकास समितीच्या बैठकीवेळी हजर राहून आपले चांगले काम पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांना सादर करावे व त्यांच्या सुचनांचा आपल्या कामात अंतर्भाव करावा, असे विधानपरिषदेचे उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
1.43 लाख बचतगट
माविमचे 1.43 लाख बचतगट आहेत. या बचत गटामार्फत 3 हजार 800 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होऊन कर्ज परतफेड ही 99 टक्के असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांनी दिली.
हेही वाचा - कृषी संजीवनी प्रकल्पात मृद व जलसंधारणची प्रक्रिया होणार ऑनलाईन