ETV Bharat / state

माझ्या पतीला शोधा - बेपत्ता राध्येशाम ठाकूर यांच्या पत्नीची प्रशासनाला विनंती - woman urges to find her husband who was stuck at Barge P305

आतापर्यंत बार्जवरील 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचविण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 37 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही काही कर्मचाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. बार्जवरील राध्येशाम ठाकूर या कर्मचाऱ्याच्या पत्नीने माझ्या पतीला शोधा अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे. तसेच आणखी एका व्यक्तीने आपल्या भावाशी संपर्क होत नसल्याचे म्हटले आहे.

woman urges to find her husband who was stuck at Barge P305
माझा पतीला शोधा - बेपत्ता राध्येशाम ठाकूर या कर्मचाऱ्यांच्या पत्नीची प्रशासनाकडे विनंती
author img

By

Published : May 20, 2021, 4:28 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या बार्ज पी-३०५ वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत बार्जवरील 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचविण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 37 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काही कर्मचाऱ्यांशी अजूनही संपर्क होऊ शकला नाही आहे. बार्जवरील राध्येशाम ठाकूर या कर्मचाऱ्याच्या पत्नीने माझ्या पतीला शोधा अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे. तसेच आणखी एका व्यक्तीने आपल्या भावाशी संपर्क होत नसल्याचे म्हटले आहे.

माझ्या पतीला शोधा - बेपत्ता राध्येशाम ठाकूर यांच्या पत्नीची प्रशासनाला विनंती

बार्ज पी ३०५-वर अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा आपल्या आप्तांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नातेवाईकांबाबत माहिती कळवावी अशी विनंती केली आहे. त्यांनी सांगितले, की अ‌ॅफकॉन आणि ओएनजीसीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधूनही कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

आतापर्यंत ११ जणांची ओळख पटली -

आयएनएस कोची ही पुन्हा एकदा अरबी समुद्रातील बार्जवर मदतकार्यासाठी गेली असून; आयएनएस कोलकाता ही बुधवारी रात्री उशिरा नेव्हल डॉक मध्ये परतली आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांना २२ मृतदेह मिळाले आहेत. त्यापैकी ११ जणांची ओळख पटली आहे.

  1. निलेश पिटले
  2. जोमिश जोसेफ
  3. अमल राज
  4. विशाल घाटघारे ( नातेवाईकांना मृतदेह दिला)
  5. नवीन कुमार
  6. गोले चंद्रा साहु
  7. सबीर इस्माइल
  8. सुशिल कुमार
  9. प्रमोद पाठक
  10. मनप्रीत बलवान सिंग
  11. पपूराम बुधाराम

हेही वाचा - डीएपी खतांवरील अनुदानात 140% वाढ; मोदी सरकारचा मोठा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.