ETV Bharat / state

Woman Murder Case: जळालेल्या मृतदेहावरील सोन्याच्या दागिन्यांवरून 'त्या' महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू

Woman Murder Case: मुंबईत वडाळा रेल्वे बीपीटी गेट नंबर चार आणि पाचच्या मध्ये चिंदी गल्ली जवळील एका क्लिनिकच्या मागे गुरुवारी एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत (Burnt body of woman) तीन तुकड्यांमध्ये गोणीत मृतदेह आढळून आला होता. जळालेल्या मृतदेहावरील सोन्याच्या दागिन्यांवरून महिलेची ओळख पटवण्याचे काम वडाळा पोलिसांनी सुरू केले आहे.

Woman Murder Case
महिलेचा मृतदेह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 9:34 PM IST

मुंबई Woman Murder Case: महिलेच्या हत्येप्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (gold ornaments on burnt body) मात्र, या मृतदेहावर पोलिसांना आढळून आलेल्या दागिन्यांवरून चार दिवसांनी वडाळा पोलिसांनी एका मुल्ला नावाच्या कुटुंबीयांचा माग काढला आहे. वडाळ्यातील संगम नगर परिसरात राहणाऱ्या मुल्ला कुटुंबीयांनी देखील सोन्याच्या दागिन्यांवरून मृत ७१ वर्षीय महिला आपली आई असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मात्र, 'डीएनए' जुळल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात देणार नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. (identification of dead woman)

'तो' मृतदेह घरकाम करणाऱ्या महिलेचा? वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आम्हाला वडाळा बीपीटी ट्रॅक परिसरात एक जळालेल्या अवस्थेत आणि तीन तुकड्यांमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या अस्पष्ट दिसत असलेल्या चेहऱ्यावरून वडाळा परिसरात पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना संगम नगर परिसरातील एक वयस्कर महिला घरकाम करणारी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वडाळा पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेची माहिती काढून तिच्या कुटुंबीयांचा पत्ता शोधून काढला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. त्यावेळी मुलाने मृतदेहावरील दागिने आईचे असल्याचे सांगितले. तसेच ती काही दिवसांपासून नवी मुंबईत मामाकडे राहायला गेली होती. ती बऱ्याच वेळा घरी येत नाही. त्यामुळे आम्ही तिची मिसिंग तक्रार दिली नसल्याची माहिती मुल्ला कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.

'डीएनए' चाचणीवरून महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न: मुल्ला कुटुंबीयांच्या केवळ बोलण्यावर विश्वास न ठेवता पोलीस केईएम रुग्णालयात असलेल्या वयोवृद्ध महिलेचे आणि मुल्ला कुटुंबातील एकाच्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेणार आहे. यानंतर ते कालीन लॅब येथे 'डीएनए' चाचणीसाठी पाठवणार असल्याची माहिती पोलीस उपयुक्त संजय लाटकर यांनी दिली आहे. तसेच या महिलेची हत्या करून कापून तिचा मृतदेह जाळणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने दिवस पाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक म्हामुणकर आणि ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक अमृता गारुळे, गुन्हे प्रकटीकरण पथक कोकणी खाटमोडे व पथक या महिलेच्या खुन्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा:

  1. Gujarat Mass Suicide : धक्कादायक! एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण
  2. Drug Seized In Pune : पुण्यात 14 कोटींचे ड्रग्ज जप्त; 504 आरोपींना अटक
  3. Minor Girl Rape Case : बाप लेकीच्या नात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बापाची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.