मुंबई : महाराजा भोग थाळी फक्त 200 रुपयांना (Maharaja Bhog Thali offer in Mumbai) मिळत असल्याच्या लोभपायी एका महिलेने चक्क 8 लाख 40 रुपये गमावले (Woman loses 8 lakhs) आहेत. ती सायबर गुन्हेगाराच्या तावडीत सापडला. याबाबत महिलेने वांद्रे पोलिस ठाण्यात (Vandre Police Station) तक्रार दाखल केली आहे. (Mumbai Crime) (latest news from Mumbai)
महाराजा थाळी पडली 8 लाखात - 1200 ते 1500 रुपयांची महाराजा भोग थाळी अवघ्या २०० रुपयांमध्ये मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडल्याने महिलेची तब्बल ८ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ५४ वर्षीय महिलेने सोशल मीडियावर २०० रुपयांची १+१ ऑफर पाहिल्यानंतर लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २७ वेळा व्यवहार झाले आणि बँक खत्यातून ८ लाखांहून अधिक रुपये ट्रान्सफर झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.Conclusion:फसवणूक करणार्याने नंतर झोहो असिस्ट हे रिमोट ऍक्सेस अॅप डाउनलोड केले आणि इंस्टॉल केले, ज्याचा वापर त्यांच्या फोनवर पाठवलेल्या वन-टाइम पासवर्ड वाचण्यासाठी केला गेला. फसवणूक करणाऱ्याने २७ व्यवहारांमध्ये त्यांच्या खात्यातून ८ लाख ४६ हजार रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खात्यातून वेगाने पैसे ट्रान्सफर - खात्यातून वेगाने पैसे ट्रान्सफर होत असल्याचे पाहून महिलेने लगेच बँक गाठली. गुरुवारी सुमारे २४ व्यवहार झाले. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ आणि ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ सी आणि ६६ डी अंतर्गतही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.