ETV Bharat / state

Malayalam Writer Attack : मल्ल्याळी लेखिकेवर हल्ला करणारी महिला फरार, दुबईला पलायन केल्याची माहिती - मल्ल्याळी लेखिकेवर हल्ला करणारी महिला फरार

मल्ल्याळी लेखिकेवर प्राणघातक हल्ला करणारी महिला फरार झाली (woman attacked Malayalam writer ) आहे. आरोपी महिलेची सुटका झाल्यानंतर तीने दुबईला पलायन केल्याची माहिती समोर येत ( woman attacked Malayali writer absconded to Dubai ) आहे. चार वर्षांपूर्वी हा हल्ला झाला होता. यात लेखिका थंकम कृष्णन यांचा एक डोळा निकामी झाला ( Thankam Krishnan One Eye Injured ) होता.

Malayali writer attacked
मल्ल्याळी लेखिकेवर हल्ला
author img

By

Published : Dec 30, 2022, 4:42 PM IST

मल्ल्याळी लेखिकेवर हल्ला

मुंबई : मालाड येथे राहणाऱ्या वयोवृद्ध प्रसिद्ध मल्ल्याळी लेखिका थंकम कृष्णन यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात (woman attacked Malayalam writer ) आला. त्या आरोपी महिलेची जामीनावर सुटका झाल्यानंतर फरार झाली आहे. तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावूनही ती हजर न झाल्यामुळे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तिला फरार घोषित केले ( woman attacked Malayalam writer absconded to Dubai ) आहे.

थंकम कृष्णन गंभीररित्या जखमी : चार वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यात थंकम कृष्णन या गंभीररित्या जखमी झाल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या हल्ल्यात थंकम कृष्णन यांचा एक डोळा निकामी झाला ( Thankam Krishnan One Eye Injured ) होता. आपल्या तक्रारीत थंकम कृष्णन यांनी 7 ऑगस्ट 2018 ला त्यांची सून मालविका तळमजल्यावरील त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीत मोबाईलचे नेटवर्क मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना शेजारी राहणारी स्मिता पांचाळ ही इमारती बाहेर उभी होती. मालविका मोबाईल वरून छायाचित्रे काढत असल्याचे संशय स्मिताला आला आणि तिने घरावर दगडफेक केली. त्यात बाल्कनीच्या काचा फुटल्या आणि मालविकासह आपण गंभीर रित्या जखमी झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी स्मिता पांचाळ हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, त्याच वेळी स्मिता पांचाळने थंकम कृष्णन यांचा मुलगा मोहन कृष्णन यांच्यावर आपली छेड काढण्याची तक्रार केल्याने त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामीन मिळाल्यावर फरार : न्यायालयाने स्मिता पांचाळची जामीनावर सुटका केली होती. मात्र, काही महिन्यांपासून खटल्याच्या कामकाजासाठी हजर राहत नसल्याने बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले. पोलीस हे वॉरंट बजावण्यासाठी तिच्या घरी केला असता ती आढळली नाही.

कोण आहेत थंकम कृष्णन? : थंकम कृष्णन या 81 वर्षीय स्क्रिप्ट राईटर असून त्यांचे 100 हून अधिक लेख मालयळम मनोरमा, मंगलम, मामामघम, मनोराजम, मकर ज्योती आणि ज्वाला या मासिकांमध्ये तसेच माध्यमातून छापून आले आहेत.

काय घडले होते? : थंकम यांना संजीवनी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हृदयाच्या उपचाराकरीता दाखल केले होते. मी घरी आल्यानंतर सुध्दा डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला होता. 8 ऑगस्ट 2018ला अंदाजे दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मी आराम करीत होते. माझी सुन मालविका ही बालकनीमध्ये उभी होती. त्यावेळी आमच्या शेजारी राहणारी महिला स्मीता पांचाळ हिने पुर्ववैमान्यस्यातून मोठ मोठयाने आरडाओरडा करीत अश्लिल शब्दात शिवीगाळी देत होती. Ha आवाज ऐकून मी पाहण्याकरीता बालकनीत येत असताना, स्मीता पांचाळ हिने आमच्या बालकनीच्या दिशेने दगड फेकून मारले. दगड आमच्या बालकनीच्या काचेवर लागून काचा फुटल्या आणि काचेचे काही तुकडे माझी सून मालवीका हिच्या हातात व पायात घूसल्या. यापैकी एक दगड माझ्या डोळयाशेजारी लागून डोळयाला दुखापत झाली. तेव्हा मी श स्मिता पांचाळ हिच्यावर गुन्हा नोंद करण्याची विनंती पोलिस प्रशासनास तसेच शासनास अनेक वेळा लेखी अर्जाद्वारे केली आहे. यावर दिंडोशी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक यांनी माझा जबाब नोंदवून गुन्हा नोंद केला, अशी माहिती थंकम कृष्णन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली.

भारताबाहेर पळाली आरोपी महिला : स्मिता पांचाळ हिच्या विरूध्द न्यायालयामार्फत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. परंतू स्मिता पांचाळ ही महिला भारताच्या बाहेर पळून गेली आहे. याबाबतची संपूर्ण माहीती दिंडोशी पोलिसांना आहे. आरोपी महिलेस जामीन राहिलेला तिचा पती नितीन पांचाळ याची सुध्दा पोलिसांनद्वारे चौकशी केलेली नाही किंवा तपास करण्याकरीता त्यास अटक केलेली नाही असा आरोप थंकम यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.