ETV Bharat / state

मोलकरीण बनून हात साफ करायची, 50 चोरीचे गुन्हे करणाऱ्या महिलेला अखेर अटक

मोलकरीण बनून घर लुटणाऱ्या सराईत चोर महिलेला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. ही महिला मुंबई शहरातील उच्चभ्रू वस्तीत मोलकरीण बनून घरातील लोकांचा विश्वास जिंकायची. त्यानंतर मालकाच्या घरातील महागड्या वस्तू , देशी-परदेशी चलन, दागिण्यांवर हात साफ करून फरार व्हायची. गुजरातमध्येही तिने हात साफ केल्याचे समोर आले आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jun 17, 2021, 10:07 PM IST

मुंबई - मोलकरीण बनून घर लुटणाऱ्या सराईत चोर महिलेला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. ही महिला मुंबई शहरातील उच्चभ्रू वस्तीत मोलकरीण बनून घरातील लोकांचा विश्वास जिंकायची. त्यानंतर मालकाच्या घरातील महागड्या वस्तू , देशी-परदेशी चलन, दागिण्यांवर हात साफ करून फरार व्हायची. अखेर पोलिसांनी तिला अटक केली.

जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलमोहर रोड विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी ही चोर मोलकरीण घर कामाच्या नावाने दीपिका आशीषकुमार गांगुली या महिलेच्या घरात काम करत होती. घर काम करण्याच्या बहाण्याने तिने घरात असलेले 10 हजार रुपये, 2500 अमेरिकन डॉलर यासह इतर मौल्यवान वस्तू चोरून जागेवरून पोबारा केला होता. ती नावही बनावट सांगत होती. अशी तक्रार दीपिका आशीषकुमार गांगुली यांनी पोलिसांकडे केली.

सीसीटीव्हीतून महिला सराईत चोर असल्याचे झाले उघड

दीपिका गांगुलींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला. ही चोर महिला तिचे संपूर्ण नाव पत्ता व कोणतेही कागदपत्र घर मालकांना देत नसल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी इमारतीच्या आवारात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून ही महिला पोलीस रेकॉर्डवरील सराईत चोर असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी या चोर महिलेचा शोध घेण्यासाठी मानखुर्द, वाशी नाका, चेंबूर, शिवाजीनगर, देवनार या भागात पाळत ठेवली. महिला पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर तिच्यावर मुंबई शहरात विविध पोलीस ठाण्यामध्ये 2003 ते 2020 पर्यंत 50 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

गुजरातमध्येही केली चोरी

दरम्यान, ही महिला वनिता उर्फ सुनिता, संगीता उर्फ आशा, मनिषा उर्फ उषा गायकवाड, अशा वेगवेगळ्या नावाने मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातील उच्चभ्रू वस्तीत मोलकरणीचे काम करायची. दरवेळी गुन्हा केल्यानंतर आपल्या राहण्याचा पत्ता बदलत होती. या महिलेने वनिता गायकवाड या नावाने सुरत, गुजरात येथे अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन मुलीशी ओळख करून शारीरिक संबंध; मुलगी गर्भवती राहिल्याने मुलावर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.