ETV Bharat / state

SBI Money Withdraw Rule : आता ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे निघणार नाहीत, पाहा नवीन नियम - SBI Customer

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे एसबीआयने नवीन पाऊल उचलले ( SBI Money Withdraw Rule ) आहे. तुम्ही देखील एटीएममधून पैसे काढत असाल तर आता एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.

SBI Money Withdraw Rule
SBI Money Withdraw Rule
author img

By

Published : Oct 23, 2022, 10:08 AM IST

मुंबई : ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे एसबीआयने नवीन पाऊल उचलले ( SBI Money Withdraw Rule ) आहे. तुम्ही देखील एटीएममधून पैसे काढत असाल तर आता एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.

पैसे काढणे: एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. ते जाणून घ्या नाहीतर तुमचे पैसे अडकल्याशिवाय राहणार नाहीत. एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. आता तुम्हाला एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागणार आहे. बदलत्या नियमानुसार, ग्राहक ओटीपीशिवाय पैसे काढू शकत ( Without OTP Money Cannot Withdraw ) नाहीत. रोख पैसे काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळतो, तो एटीएमच्या स्किनवर टाकल्यानंतरच एटीएममधून रोख रक्कम काढली जाते.

बँकेने दिलेली माहिती : एका ट्विटच्या माध्यमातून बँकेने ही माहिती दिली. माहिती देताना बँकेने म्हटले आहे की, 'एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख काढण्याची प्रणाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध आळा घालण्यासाठी आहे. फसवणुकीपासून ग्राहकांचे ( SBI Customer ) संरक्षण करणे ही आमची नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता असेल. एसबीआय ग्राहकांनी ओटीपी ( OTP ) आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली कशी कार्य करेल याची जाणीव ठेवली पाहिजे.

आताचे नियम माहित आहेत? : बँकेने पुढे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, हे नियम 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढणाऱ्यांना लागू होतात. एसबीआय ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि डेबिट कार्ड पिनवर पाठवलेल्या ओटीपी सह 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी देते.

पैसे काढताना ओटीपी महत्त्वाचा : एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ओटीपी टाकावा ( OTP important in withdrawing money ) लागेल. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. एका व्यवहारासाठी चार अंकी क्रमांक असलेला ओटीपी ग्राहकाला दिला जाईल. रोख पैसे काढण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी टाकावा लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.