ETV Bharat / state

आता स्मार्टफोनने काढता येतील एटीएम मशीनमधून पैसे, देशात लवकरच सुरुवात - टचलेस सोल्युशन मुंबई

ग्राहकांना एटीएम मशीनच्या स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर संबंधित बँकेच्या मोबाइल एप्लिकेशनमध्ये येणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागेल. यामध्ये तुम्हाला काढायची असेल ती अमाऊंट, एम-पिन यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. क्यूआर कोडद्वारे पैसे काढणे हे अधिक सुरक्षित असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

business news  touchless solution  withdraw cash using touchless solution  latest business news  टचलेस सोलुशुन मुंबई  लेटेस्ट बिझिनेस न्यूज
आता एटीएम मशीनला स्पर्श न करताही काढता येतील पैसे, देशात लवकरच सुरुवात
author img

By

Published : Jun 8, 2020, 2:30 PM IST

मुंबई - सध्या कोरोनामुळे वस्तू अथवा व्यक्तीला स्पर्श करणे हे जोखमीचे आहे. त्यामुळे संसर्ग होण्याची भीती असते. मात्र, स्मार्टफोनच्या सहाय्याने एटीएम मशीनला स्पर्श न करताही पैसे काढता येणार आहे. कारण, कॅश आणि डिजिटल पेमेंट सोल्युशन आणि ऑटोमेशन टेक्नॉलॉजी पुरवणारी 'एजीएस ट्रॅन्झॅक्ट टेक्नॉलॉजी' या कंपनीने हे नवे तंत्रज्ञान तयार केले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग लवकरच भारतात केला जाणार आहे.

ग्राहकांना एटीएम मशीनच्या स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर संबंधित बँकेच्या मोबाइल एप्लिकेशनमध्ये येणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागेल. यामध्ये तुम्हाला काढायची असेल ती अमाऊंट, एम-पिन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. क्यूआर कोडद्वारे पैसे काढणे हे अधिक सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हे टचलेस एटीएम सोल्युशन क्यूआर कॅश सोल्युशनचा विस्तार आहे. यामध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेचा पूर्ण विचार केला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष रवी. बी. गोयल यांनी सांगितले. कमीतकमी गुंतवणूक करून बँक त्यांच्या एटीएम नेटवर्कसाठी हे तंत्रज्ञान खरेदी करू शकतात, असेही ते म्हणाले.

'असे' काम करते सोलुशन -

  1. स्मार्टफोनवर बँक अ‌ॅप्लीकेशन सुरू करून क्यूआर कोड निवडणे. त्यानंतर अमाऊंट टाकून एटीएम मशीनच्या स्क्रीनवर आलेला क्यूआर कोड स्कॅन करणे.
  2. 'प्रोसीड'वर क्लिक करून अमाऊंट बरोबर आहे की नाही, हे तपासणे. त्यानंतर एम-पिन टाकून ट्रॅन्झॅक्शन करणे. त्यानंतर कॅशसोबत पावती घेणे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.