ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस दावा करणार का? - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे (Split in NCP) त्यांची विधिमंडळातील संख्या कमी झाली असून काँग्रेस हा 45 आमदार असलेला मोठा पक्ष झाला आहे. (Maharashtra Political Crisis) त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळ विरोधी पक्षनेता दावा करण्याचे संकेत मिळत आहे. (Assembly Opposition Leader) पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विरोधी पक्ष नेत्याचे नाव घोषित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Political Crisis
कॉंग्रेस नेते
author img

By

Published : Jul 3, 2023, 4:33 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे विधिमंडळातील विरोधी पक्षनेता कोण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Split in NCP) वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यातील तात्कालीन महाविकास आघाडी सरकार पडले होते. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे संख्याबळानुसार विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद (Assembly Opposition Leader) राष्ट्रवादीकडे तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद ठाकरे गटाकडे होते. आता राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर गणित बदललेली आहे. 45 आमदार असलेला काँग्रेस पक्ष विधानसभेतील मोठा पक्ष झाला आहे.

संख्या जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता : कालची घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाही देशांमध्ये सत्ताधारी जशी मान्य केले तसे विरोधी देखील मान्य केला आहे. लोकशाहीला काळिमा फासणारी कालची घटना आहे. मात्र सर्व जनता बघत आहे. आताच्या घडीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सर्वांत जास्त आमदार असलेला पक्ष कॉंग्रेस आहे. गटनेता करण्याचा अधिकार त्यांना आहे. विरोधी पक्षानेतेबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत उद्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा देखील होणार आहे. आमची महाविकास आघाडी भक्कम असल्याचा देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

या नेत्यांची नावे आघाडीवर: विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस कोणाची वर्णी लागेल. यासंदर्भात अंदाज बांधले जात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नावे आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.

विरोधी पक्षासाठी राकॉं दावा मागे घेणार का? शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेतून खाली खेचायचे असेल तर महाविकास आघाडी भक्कम ठेवावी लागणार आहे. त्यामुळे वेळ पडल्यास विरोधी पक्ष नेते पदावर राष्ट्रवादी काँग्रेस आपला दावा मागे घेण्याची शक्यता बोलली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडाळीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच विरोधी पक्ष नेत्याचे नाव समोर येणार आहे. याआधी राकॉंतर्फे जितेंद्र आव्हाड यांचे नाव विरोधी पक्षनेत्यासाठी काल समोर करण्यात आले होते.

हेही वाचा:

  1. Sanjay raut on maharashtra politics crisis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना हटविण्यात येणार, 16 आमदार ठरणार अपात्र : संजय राऊत
  2. Maharashtra Political Crisis : मंत्री पदासाठी इच्छुकांची कोंडी, दोन्ही पक्षातील 'हे' इच्छुक नाराज
  3. Sharad Pawar on Satara Visit: शरद पवार यांचे कराडला मोठं शक्ती प्रदर्शन; जातीय तेढ निर्माण करण्याऱ्या शक्तींशी लढण्याची गरज- शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.