ETV Bharat / state

खासदार डेलकरांच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करणार- गृहमंत्री - मोहन डेलकर लेटेस्ट न्यूज

भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. खासदार डेलकर यांचा मृत्यू हा मुंबईत झाला आहे त्यामुळे त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र पोलिसांची असून यासंबंधी चौकशी झाली पाहिजे असे निवेदन सचिन सावंत यांनी गृहमंत्र्यांकडे केले.

अनिल देशमुख
अनिल देशमुख
author img

By

Published : Feb 24, 2021, 5:55 PM IST

Updated : Feb 24, 2021, 7:31 PM IST

मुंबई- दादरा नगर हवेली चे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्याला भाजप जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तर डेलकर यांच्ाय आत्महत्या प्रकरणात भाजपच्या भुमिकेची चौकशी करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

खासदार डेलकरांच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करणार- गृहमंत्री

डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा
दादरा नगर हवेली चे खासदार मोहन डेलकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. आत्महत्येनंतर त्यांच्याकडे गुजराती भाषेत एक पत्र देखील मिळाले आहे. या पत्रात भाजपाच्या नेत्यांची आणि काही अधिकाऱ्यांचे नावे असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यासंबंधी लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. त्यानंतर डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला ऑनलाईन मिटींगमध्ये दिले आहे.

भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांनी आत्महत्या केली

सात वेळा खासदार असलेल्या मोहन डेलकर यांना एवढे विवश का व्हावे लागले? त्यांना आत्महत्या का करावी लागली? हे सत्य समोर यायलाच पाहिजे. गेल्या दीड वर्षापासून डेलकर हे मोठ्या दबावाखाली होते. हे स्वतः त्यांनी शूट केलेल्या व्हिडिओद्वारे, तसेच संसदेच्या भाषणामध्ये वेळोवेळी नमूद केले आहे. आत्महत्या करण्याआधी आपल्यावर प्रचंड दबाव असून यामागे गुजरातमधील भाजपचे नेते आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासन प्रफुल पटेल आहेत, असे पत्रात नमूद असल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले. भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. खासदार डेलकर यांचा मृत्यू हा मुंबईत झाला आहे त्यामुळे त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र पोलिसांची असून यासंबंधी चौकशी झाली पाहिजे असे निवेदन सचिन सावंत यांनी गृहमंत्र्यांकडे केले. तर यासंबंधी पूर्ण चौकशी केली जाईल असे आश्वासन ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन सावंत यांना दिले. केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून देशभरातील विरोधी पक्षांमध्ये असलेले खासदार नेतेमंडळींना अशा प्रकारे त्रास देण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

Last Updated : Feb 24, 2021, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.