मुंबई Wife Lover Murder Case : ठाण्यात राहात असलेल्या एका व्यक्तीनं 2017 मध्ये एकाचा खून केला. कारण काय तर त्याच्या बायकोचे त्या व्यक्तीबरोबर प्रेम संबंध होते. मात्र ठाणे आणि बेलापूर जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे झाली तरी आरोपांची निश्चिती केलीच नाही. त्यामुळे पाच वर्षांपासून आरोपी तुरुंगात खितपत पडलेला आहे, अशी बाजू या प्रकरणी वकिलांनी हायकोर्टात मांडली. त्यावर कोर्टानं जामिन मंजूर केला. (Mumbai High Court)
आरोप निश्चित नसल्यामुळे आरोपी तुरुंगात : ठाण्यातील रबाळे या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घटना घडली होती. आरोपीवर आरोप होता, की त्याच्या बायकोच्या कथित प्रियकराचा त्याने खून केला. खून केल्यानंतर तो तेथून फरार झाला. एका महिन्यामध्ये त्याला अटक करण्यात आली. त्याचा खटला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल झाला. परंतु न्यायालयात प्रचंड कामकाज असल्यामुळे तेथे त्याच्यावर आरोपपत्र निश्चित झालेलं नाही.
सरकारी पक्षाची बाजू : हा खटला आधी ठाणे त्यानंतर बेलापूर येथील न्यायालयामध्ये वर्ग झाला होता. तेथील कामांचा प्रचंड व्याप असल्यामुळे तेथे देखील याचे आरोपपत्र निश्चित होऊ शकले नाही. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, अशी बाजू सरकारी पक्षाच्या वकीलांनी मांडली.
पाच वर्षांपासून आरोपपत्र नाही : मुंबई उच्च न्यायालयात आरोपीचे वकील आसिफ नकवी, मोहम्मद जावेद सलमानी अमरीन शरीफ यांनी बाजू मांडली की, पाच वर्षे झाली त्याच्यावर कोणतेही आरोप पत्र दाखल नाही. केवळ त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. परंतु ते सिद्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळेच आरोपीला जामीन मिळायला हवा. हा त्याचा हक्क आहे. सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आरोपीला जामीर मंजूर केला. तसंच दर आठवड्याला त्याने संबंधित पोलीस ठाण्यामध्ये 15 मिनिटे हजेरी लावावी असं सांगण्यात आलं. त्याचबरोबर 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर होईल अशी अट देखील घातली.
हेही वाचा: