ETV Bharat / state

Amruta Fadnavis Bribe and Blackmail : महाविकास आघाड़ी सरकारच्या काळात माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न - फडणवीस - Who is she

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणणारी ती महिला कोण आहे असा प्रश्न उपस्थित करीत अजित पवार यांनी विधानसभेत खळबळ उडवून दिली. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला अडचणीत आणण्याचा कसा प्रयत्न केला जातो आहे याची माहिती सभागृहात दिली. याप्रकरणी संबंधितांवर लवकरच कारवाई होईल मात्र खरा सूत्रधार कोण हेही शोधले जाईल असे ते म्हणाले.

Who is  she  who is putting the DCM in trouble
उपमुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणारी 'ती' कोण?
author img

By

Published : Mar 16, 2023, 2:00 PM IST

Updated : Mar 16, 2023, 3:59 PM IST

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने आज एका प्रकरणात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे हे नेमके काय प्रकरण आहे. तुमच्यावर आलेले संकट काय आहे अशी विचारणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा गृहात उत्तर देताना सर्व घटनाक्रम सांगितला.

वडिलांना सोडवण्यासाठी कारस्थान : अनिल जयसिंग नावाच्या एका व्यक्तीची मुलगी गेल्या दोन वर्षांपासून माझी पत्नी अमृता फडणवीस हिच्या संपर्कात होती. माझ्या पत्नी सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे अनेकांच्या संपर्कात असते. एक ड्रेस डिझायनर म्हणून ही मुलगी संपर्कात आली. सुरुवातीला माझ्या पत्नीचा विश्वास संपादन करण्यासाठी सदर मुलीने विविध डिझाईन ड्रेस आणि त्याला अनुसरून असलेली ज्वेलरी वापरण्यास दिली. माझ्या पत्नीने परतही केली. मात्र त्यानंतर सदर मुलीने वडीलांच्या विरोधात अनेक केसेस दाखल असून त्या मागे घेण्यात याव्या त्यासाठी आपण मदत करा असा लकडा माझ्या पत्नीकडे लावला. मात्र जर काही अयोग्य असेल तर मदत करणार नाही असे माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितले.

अनेक बडया नेत्यांशी संबंध : आपला अनेक बड्या व्यक्तींची संबंध असल्याचे तिने फोन रेकॉर्ड वरून दाखवले. तसेच माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी गेल्या सरकारमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती मात्र त्यानंतर सरकार बदलले त्यामुळे त्यांच्यावरील केसेस मागे घेतल्या गेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि मोठ्या व्यक्तींची नावे आहेत ती मी आता सांगणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले.

बुकिंग वर धाड टाकण्याचे विनती : अनेक बुकी आपल्या संपर्कात असून त्यांच्यावर धाड टाकण्याची आणि त्यांची माहिती देण्याचे काम करतो यामध्ये दोन्हीकडून आपल्याला पैसे मिळतात तुम्ही मदत केली तर आपण धाड टाकून चांगले पैसे मिळवू शकतो अशी ऑफरही तिने आपल्या पत्नीला दिली होती. मात्र तिने ती धुडकावली. त्यानंतर तिने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देते असेही सांगितले. तेही माझ्या पत्नीने धुडकावून लावत तिला ब्लॉक केले.

ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न : दरम्यानच्या काळात जेव्हा जेव्हा ती आमच्या घरी आली तेव्हा तेव्हा तिने काही व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती माझ्या पत्नीशी बोलते आहे असे दाखवते आणि दुसरी कडे डॉलर हातात असल्याचे दाखवते. दुसऱ्या व्हिडिओ ती पैशाने भरलेली बँक दाखवते आणि तशीच बॅग एका कामवाल्या बाईला दिल्याचा व्हिडिओ दाखवते. मात्र याबाबतची फॉरेन्सीक तपासणी केली असता या दोन्ही बँग वेगळ्या असल्याचे तसेच कामवालीला दिलेल्या जागेत कपडे असल्याचे निदर्शनास आले.

अडचणीत आणण्याचा प्रयत्न : वास्तविक मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची मला माहिती होती तर माझ्या कुटुंबालाही लक्षय करण्यात येत असल्याची माहिती मिळाली अशाप्रकारे हीन पातळीचे राजकारण करण्यात येऊ नये. या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तिच्या फरार वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस आपली कारवाई करत आहेत. मात्र या सर्वांमागे कोण आहे याचाही शोध घेतला जाईल, असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

हेही वाचा : Amruta Fadnavis News : अमृता फडणवीस यांना १ कोटींची ऑफर देणाऱ्या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

Last Updated : Mar 16, 2023, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.