मुंबई - खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची हेरगिरी होत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. मात्र, हे ट्वीट करताना त्यांनी कोणते सरकार हेरगिरी करत आहे. याबाबतचे स्पष्टीकरण दिलेले नाही नव्हते. त्यामुळे त्यांचा रोख नक्की कोणाकडे होता. याबाबतच्या चर्चेला उधान आले होते. यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फोन केल्याचा दावा खासदार संभाजी राजे यांनी केला आहे. याबाबतचे ट्वीट करून त्यांनी ही माहिती दिला आहे.
ट्वीटमध्ये काय म्हटले? -
'सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?', अशा प्रकारचे ट्विट त्यांनी केले आहे.

याबाबत संभाजीराजेंने दिले स्पष्टीकरण -
हेरगिरीच्या ट्वीटबाबत संभाजीराजेंनी पुन्हा ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. 'आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीच्या ठिकाणी आत जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे', असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गृहमंत्र्यांच्या या फोनबाबत समाधानी असून माझ्यासाठी हा विषय संपला असल्याचेही ते म्हणाले.
