ETV Bharat / state

लॉकडाऊन हवा की, नको हा निर्णय मुंबईकरांच्या हाती - महापौर पेडणेकर

मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. गेल्या अकरा महिन्यात आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे कोरोना काही प्रमाणात कमी झाला. मात्र, लोकांची गर्दी वाढल्याने, तसेच फेब्रुवारी महिन्यात लोकल ट्रेन सुरू झाल्यावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

Kishori Pednekar awareness Mumbai
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Feb 17, 2021, 8:39 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. गेल्या अकरा महिन्यात आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे कोरोना काही प्रमाणात कमी झाला. मात्र, लोकांची गर्दी वाढल्याने, तसेच फेब्रुवारी महिन्यात लोकल ट्रेन सुरू झाल्यावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे मुंबई पुन्हा लॉकडाऊन दोनच्या दिशेने जात आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईकर बेफिकीर झाले असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. लॉकडाऊन हवा की, नको हा सर्वस्वी निर्णय मुंबईकरांच्या हाती असल्याचे महापौरांनी म्हटले.

माहिती देताना महापौर किशोरी पेडणेकर

हेही वाचा - सोमाटण्यातील टोलनाका बंद करावा; स्थानिकांची मागणी, घेतली राज ठाकरे यांची भेट

कोरोना आकडेवारी -

मुंबईत ११ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाचे ३ लाख १५ हजार रुग्ण आढळून आले आहेत. ११ हजार ४२३ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख ९७ हजार १०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५ हजार ६४९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के इतके आहे. रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३० लाख ३९ हजार ४६१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या केल्या उपाययोजना -

मुंबईत गेल्यावर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरोघरी सर्व्हेक्षण, आरोग्य शिबीरे, नियमित तपासण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तत्काळ शोध घेऊन क्वारंटाईन, कंटेन्मेंट झोन, इमारती सील करून कठोर अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून प्रभावी उपाययोजना आदींमुळे कोरोना आटोक्यात आणण्यास पालिकेला यश आले.

रुग्णसंख्या वाढली -

डिसेंबर नंतर नवीन वर्षाच्या प्रारंभापासून कोरोना उतरणीला लागला. रोज दोन ते अडीच हजारापर्यंत सापडणारे कोरोना रुग्ण २ फेब्रुवारीला ३३४ वर आले. कोरोना आटोक्यात आल्यानंतर टप्प्या-टप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत लोकल सेवा सुरू केली. मात्र, गर्दी वाढल्याने आठवड्याभरातच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ३३४ वर असलेली रुग्णसंख्या दुपटीने वाढून सहाशेवर पोहचली आहे.

या विभागात वाढत आहे रुग्णांची संख्या -

मुंबईतील बोरीवली भागात सर्वाधिक रुग्ण संख्या असून ती ४०८ पर्यंत पोहचली आहे. अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या ३७८ वर पोहचली आहे. त्यात या परिसरातील १०० इमारती सील करण्यात आल्या आहेत. कांदिवली, चारकोपमध्ये ३४५ कोरोना रुग्ण आहेत. या ठिकाणी आतापर्यंत ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड, मनोरी, मारवे, अक्सा, मढ इथे ३३८ कोरोना रुग्ण आहेत.

मुलुंडमध्ये २९२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून इथे २०२ इमारती सील करण्यात आल्या आहेत. घाटकोपर, विद्याविहार आणि पंतनगर या भागातील १६२ इमारती सील करण्यात आल्या. १४ झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. इथे २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर येथील १० झोपडपट्ट्या आणि चाळी कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. या वॉर्डमध्ये २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सोसायट्यांना नोटीस -

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना वाढत असून मुंबईतील बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी भाग पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ८५ कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. तर, ९९२ इमारती सील केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. सरकारच्या नियमांचे पालन न करणाऱ्या काही सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मार्शल द्वारे कारवाई केली जाणार -

कोरोनाचा धोका कायम असताना लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे कोरोनाचा घोका वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे, आता लोकलमध्ये विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पालिका आता मार्शल नेमणार आहे. एजन्सीच्या माध्यमातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे लाईनवर प्रत्येकी १०० जणांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. या कारवाईदरम्यान मास्क नसल्यास प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

महापौर रस्त्यावर -

मुंबईकर बेफिकीर झाल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढल्यास मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन लागू नये म्हणून नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठी महापौर आज रस्त्यावर उतरल्या. ट्रेनमधूनही प्रवास करत नागरिकांनी नियमांचे पालन करावे, लॉकडाऊन हवा की, नको हे तुम्हीच ठरवा, असे सांगत मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी पालिकेला साथ द्या, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

रेल्वेतील साडेचार हजार प्रवाशांवर कारवाई -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. लोकल प्रवाशांना नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, काही प्रवासी विना मास्क प्रवास करत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. विना मास्क प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार मध्य मार्गावर गेल्या 14 दिवसांत 2 हजार 60 प्रवाशांवर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 2 हजार 558 प्रवाशांवर कारवाई करून 4 लाख 50 हजार 100 रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.

रुग्णसंख्या वाढली होती -

मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. रविवारी 14 फेब्रुवारीला 645, काल 15 फेब्रुवारीला 493 रुग्ण आढळून आले होते.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - उत्तर मुंबईतील नागरिकांसाठी अत्याधुनिक रूग्णालय बनवण्यासाठी खासदर गोपाळ शेट्टींचे अनोखे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.