ETV Bharat / state

माणुसकी संपली की काय? अपघातातील जखमी तरुणाला रुग्णालयात नेण्याऐवजी नागरिकांची बघ्याची भूमिका

author img

By

Published : Aug 14, 2021, 7:29 AM IST

Updated : Aug 14, 2021, 10:35 AM IST

विरार पूर्व नारिंगी फाटकाजवळ गुरुवारी दुपारी एका ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. कुणाल तांडेल (२३) असे या जखमी तरुणाचे नाव असून तो नवापूर परिसरात राहणारा आहे. सुदैवाने या अपघातात त्याचा जीव वाचला. मात्र, त्याच्या कंबरेच्या खालच्या भागावर ट्रकचा टायर गेल्याने त्याचा चुराडा झाला होता. या गंभीर जखमी अवस्थेत हा तरुण आपल्या यातना सहन करत २० ते २५ मिनिटे ट्रकखालीच पडून होता.

virar truck accident news
ट्रक अपघातात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेण्याऐवजी नागरिकांची बघ्याची भूमिका

विरार (पालघर) - शहरात एका अपघातात जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात न घेऊन जाता उपस्थित नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. विरारमधल्या या विदारक दृश्याने माणुसकी उरली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अपघातातील जखमी तरुणाला रुग्णालयात नेण्याऐवजी नागरिकांची बघ्याची भूमिका

तरुण 20 मिनिटे ट्रकखाली पडून -

विरार पूर्व नारिंगी इथल्या फाटकाजवळ गुरुवारी दुपारी एका ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. कुणाल तांडेल (२३) असे या जखमी तरुणाचे नाव असून तो नवापूर परिसरात राहणारा आहे. सुदैवाने या अपघातात त्याचा जीव वाचला. मात्र, त्याच्या कंबरेच्या खालच्या भागावर ट्रकचा टायर गेल्याने त्याच्या कंबरेच्या खालच्या भागाचा चुराडा झाला होता. मात्र या जखमी तरुणाच्या मदतीसाठी एकही नागरिक किंवा रुग्णालयात त्याला नेण्यासाठी एकही रिक्षावाला पुढे आला नाही. गंभीर अवस्थेत जखमी झालेला हा तरुण आपल्या यातना सहन करत २० ते २५ मिनिटे ट्रकखालीच पडून होता. अनेक जण हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते. मात्र, या जखमी तरुणाची मदत करण्यासाठी एकही नागरिक पुढे आला नाही. अखेर याच रस्त्यावरून प्रवास करणारे चिकन विक्रेते असलेल्या नावेद खान या नागरिकाने पुढाकार घेत आपल्या राहत्या परिसरातून रिक्षा बोलावून जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव बचावला आहे. मात्र, विरारमधील या घटनेवरून माणुसकी उरली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - प्रियकर तुझा की माझा? एका प्रियकरासाठी दोन प्रेयसिंची फ्रिस्टाईल हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल

Last Updated : Aug 14, 2021, 10:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.