ETV Bharat / state

लोकलसेवा सुरू झाल्यास आम्हीही सेवा देऊ - मुंबई डबेवाला असोसिएशन

author img

By

Published : Jun 9, 2020, 7:18 AM IST

Updated : Jun 9, 2020, 7:37 AM IST

मुंबईतील कार्यालये सोमवारपासून (दि. 8 जून) सुरु झाली आहेत. मात्र या कार्यालयात डबे पोहोचविणारे डबेवाले लोकल रेल्वे सेवा बंद असल्याने ते पोहोचवू शकत नाहीत. जर लोकल सेवा पूर्ववत झाली तर आम्हीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करत सेवा देऊ, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे म्हणणे आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र

मुंबई - 'मिशन बिगिन अगेन'मध्ये मुंबई काही प्रमाणात सुरू झाली आहे. कार्यालय देखील उघडण्यात आली आहेत. लोकलसेवा सुरू न झाल्यामुळे मुंबईचा डब्बेवाला कर्मचाऱ्यांना सेवा देऊ शकणार नाही. काही जवळच्या ठिकाणी आम्ही योग्य सुरक्षा घेऊन डब्बे देण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे लोकल सेवा सुरु झाल्यास आम्हीही आमची सेवा देऊ, असे मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

बोलताना मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर

टाळेबंदीमुळे मुंबईच्या डबेवाल्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. मार्च महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही. अशा वेळी मुंबई डबेवाला असोसिएशनने डबेवाल्यांना मोफत रेशन वाटपाचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाला काही समाजसेवक, सामाजिक संस्था यांनी उत्तम प्रतीसाद दिला.

मुंबई काही अंशी खुली झाली आहे. मात्र, उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल रेल्वे) जोपर्यंत सुरु होत नाही तोपर्यंत आम्ही आमची सेवा देऊ शकत नाही, असे सुभाष तळेकरांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'शेतकऱ्यांना लवकर पिककर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा'

हेही वाचा - सैफ-करीनाचा तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका; पोलिसांनी हटकले तेव्हा घेतला काढता पाय

Last Updated : Jun 9, 2020, 7:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.