ETV Bharat / state

दिशा व सुशांतचे आत्महत्येपूर्वीचे व्हॉट्सअ‌ॅप चॅट आले समोर - दिशा सॅलियन-सुशांतसिंह लेटेस्ट न्यूज

आता सुशांतची माजी व्यवस्थापक दिशा सॅलियन व सुशांत या दोघांच्या आत्महत्येपूर्वीचे व्हॉट्सअ‌ॅप चॅट समोर आले आहे. दिशा सॅलीयन हिने 9 जून रोजी आत्महत्या केली, तर सुशांतने 14 जून. दोघांमधील हे चॅट एप्रिल महिन्यातील असल्याचे समोर आले आहे. दिशा सॅलियन हिने सुशांत सोबत एका खाद्य तेलाच्या ब्रँड प्रमोशनबद्दल चर्चा केली होती.

Dhisha and Sushant
दिशा व सुशांत
author img

By

Published : Aug 18, 2020, 12:33 PM IST

Updated : Aug 18, 2020, 12:41 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ईडी व सीबीआयकडून तपास केला जात आहे. याप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता सुशांतची माजी व्यवस्थापक दिशा सॅलियन व सुशांत या दोघांच्या आत्महत्येपूर्वीचे व्हॉट्सअ‌ॅप चॅट समोर आले आहे. दिशा सॅलीयन हिने 9 जून रोजी आत्महत्या केली तर सुशांतने 14 जून. दोघांमधील हे चॅट एप्रिल महिन्यातील असल्याचे समोर आले आहे. दिशा सॅलियन हिने सुशांतसोबत एका खाद्य तेलाच्या ब्रँड प्रमोशनबद्दल चर्चा केली होती.

दिशा - खाद्य तेलाच्या एका कंपनीसाठी १ वर्षासाठी ब्रँड अ‌ॅम्बेसेडर राहायचे आहे. एका दिवसाचे शूटिंग असणार आहे व त्यानंतर टिवीसीसाठी रेकॉर्डिंग असणार आहे. वर्षातून उत्सवांच्या दिवशी डिजिटल प्लॅटफॉर्मवर खाद्य तेलाच्या संदर्भातील तीन पोस्ट कराव्या लागणार आहेत. कृपया याबद्दल सांगावे. मी त्यांना यासाठी ६० लाख रुपये सांगू का ?

सुशांत - ब्रँडचे नाव काय आहे?

दिशा - त्या लोकांना आताच त्यांच्या ब्रँडचे नाव उघड करायचे नाही. हा ब्रँड कशासंदर्भात आहे याबद्दल माहिती घेऊन आपण पुढची बोलणी करू शकतो.

सुशांत - ओके. कुल, थँक्यू.

यानंतर सुशांतसिंह व दिशा सॅलियन यांच्यात पुन्हा ७ एप्रिल रोजी व्हॉट्सअ‌ॅप संभाषण झाले होते. या दरम्यान दिशाने सुशांतला सांगितले होते की, पबजी एक डिजिटल कॅम्पेन सुरू करत असून याच्या माध्यमातून ते नागरिकांना आवाहन करू इच्छितात की, नागरिकांनी घरात बसून पबजी खेळावे व सुरक्षित राहावे. यासाठी सुशांतला इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करावा लागणार आहे.

दिशा - जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर मला सांगा, जर तुम्हाला हे ठीक वाटत असेल, तर मी त्या व्हिडिओची स्क्रिप्ट मागवून घेते.

१० एप्रिल रोजी सुशांत व दिशा या दोघांची चर्चा होते व पबजी संदर्भात डिल ही ठरवली जाते.

दिशा सॅलियन - हाय सुशांत, पबजीसोबत बोलणी पूर्ण झाली असून त्यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी १२ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे आणि याबरोबरच टॅक्स संदर्भात सुद्धा संमती त्यांनी दर्शवली आहे. पुढच्या आठवड्यात ते पबजी संदर्भातील स्क्रिप्ट पाठवत असून त्यापुढील माहिती मी तुम्हाला कळवेल.

यानंतर ११ एप्रिल रोजी सुशांतने दिशाला रिप्लाय करत पबजी स्क्रिप्ट येऊ दे त्यानंतर आपण पाहू असे कळवले होते.

सध्या सुशांत आणि दिशा यांच्या दरम्यानचे हे चॅट व्हायरल होत आहे.

Last Updated : Aug 18, 2020, 12:41 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.