मुंबई - उद्या विधानसभेच्या पटलावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंल्पाकडून राज्यातील जनतेला काय अपेक्षा आहेत, यासदंर्भात ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
राज्याचे आर्थिक गणित ढासळले -
कोरोना काळातील हे राज्याचे दुसरे अधिवेशन आहे. यावर्षी महसुली उत्पन्नात घट झाल्यामुळे राज्याचे आर्थिक गणित ढासळले आहे. ही बाब अर्थमंत्र्यांनी सभागृहात सांगितली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये खूप काही आशा ठेवू नये, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे या वर्षीचा अर्थसंकल्पामध्ये वेगळे काही होणार आहे का, काही वेगळ्या तरतुदी या राज्यातल्या लोकांना मिळणार आहेत का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सर्वसामान्य नागरिक जगणार कसे; सर्वसामान्यांच्या भावना -
या सगळ्या संदर्भात आपण सामान्य नागरिकांना विविध भावना व्यक्त केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव सरकारने पहिल्यांदा कमी केले पाहिजे. पेट्रोल आणि डिझेल हे वाढल्यामुळे महागाई वाढत आहे. दरम्यान, या कोरोना काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जगणार कसे, हा प्रश्नदेखील सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांदेखील अपेक्षा -
सोमवारी येणाऱ्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांदेखील खूप अपेक्षा आहेत. मुंबईच्या आसपासच्या परिसरातील शेतकरी हे मुंबईमध्ये भाजीपाला विकण्यासाठी येत असतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विकण्यासाठी एक हक्काची जागा सरकारने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - महिला दिन विशेष : गोंदियात गृहिणींचा 'एक दिन सायकल के नाम' उपक्रम