ETV Bharat / state

..तरच कस्तुरबा रुग्णालयात प्रवेश करा, प्रशासनाकडूनच वाढवली जातेय भीती - corona kasturba hospital mumbai news

मुंबईत कोरोना विषाणूंच्या रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयात प्रश्नासनाचे धाबे दणाणले आहेत. धास्तावलेल्या या प्रशासनाने आता रुग्णालयात येणाऱ्या सर्वांनाचा मास्क लावण्याची सक्ती केली आहे.

मास्क घाला मगच कस्तुरबा रुग्णालयात प्रवेश करा

author img

By

Published : Mar 12, 2020, 5:40 PM IST

Updated : Mar 12, 2020, 5:59 PM IST

मुंबई - देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे. हजारो लोकांच्या मृत्यूनंतर हा विषाणू आता मुंबईत दाखल झाला आहे. हा आजार देशाबाहेरून प्रवास करून आलेल्या लोकांकडून पसरत आहे. यामुळे मुंबईकरांनी भीती बाळगू नये गरज नसल्यास उगाच मास्क वापरू नये, असे राज्य सरकार आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, मुंबईत कोरोना विषाणूंच्या रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयात प्रश्नासनाचे धाबे दणाणले आहेत. धास्तावलेल्या या प्रशासनाने आता रुग्णालयात येणाऱ्या सर्वांनाचा मास्क लावण्याची सक्ती केली आहे.

मास्क घाला मगच कस्तुरबा रुग्णालयात प्रवेश करा

चीनच्या वुहान प्रातांत कोरोना विषाणू आढळून आला होता. हा विषाणू काही दिवसातच जगभरात पसरला आहे. भारतातही या विषाणूचे ६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी राज्यात ११ रुग्ण असून त्यातील २ रुग्ण मुंबईमध्ये उपचार घेत आहेत. मुंबईमध्ये महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये ६० खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या उपचारासाठी आयसोलेशनचा विशेष कक्षही उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय या व्यतिरिक्त कोणालाच प्रवेश दिला जात नाही. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असले तरी संपूर्ण रुग्णालय परिसरात कर्मचारी आणि डॉक्टरांमध्ये भीतीचे वातारण पसरल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा - कोरोनाचा धसका..! 'उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी करा'

राज्य सरकारच्या आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, हात स्वच्छ धुवा. खोकताना आणि शिंकताना स्वच्छ रुमालाचा वापर करा. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या सानिध्यात आलेल्या लोकांनाच याची लागण होण्याची भीती आहे. यामुळे अशा लोकांच्या सहवासात असलेल्या लोकांनीच मास्कचा वापर करा, इतरांनी मास्कचा वापर करण्याची गरज नाही असे सांगण्यात आले आहे. मात्र, या सूचनांचे उल्लंघन करत कस्तुरबा रुग्णालयात इतर आजारांवर उपचार करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मास्क लावण्याची सक्ती केली जात आहे. मास्कची सक्ती केली जात असल्याने रुग्णालयाबाहेर असलेल्या मेडिकल दुकानांमध्ये मास्कसाठी गर्दी वाढली आहे.

हेही वाचा - नाथाभाऊंसाठी पक्षाने वेगळा प्लॅन आखला असेल - पंकजा मुंडे

Last Updated : Mar 12, 2020, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.