ETV Bharat / state

महाराष्ट्रातील विजय आयोध्येत दिवे लावून साजरा करू - योगी आदित्यनाथ - Maharashtra Assembly Elections 2019

जनतेच्या हितासाठी कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्याचा विकास सुरू ठेवण्यासाठी मुंबईतील युतीच्या सर्व उमेदवारांना जिंकून आणा, असे आवाहन योगी यांनी मुंबईकरांना केले. कांदिवली येथे युतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत आदित्यनाथ बोलत होते.

कांदिवलीतील प्रचार सभेत बोलताना योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Oct 11, 2019, 4:52 AM IST

मुंबई - राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे. हा विजयोत्सव आम्ही आयोध्येत लाखो दिवे लावून साजरा करू, असा संकल्प उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील प्रचार सभेत केला.

कांदिवली येथे युतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत आदित्यनाथ बोलत होते. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते खूप जुने आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकासाठी उत्तर प्रदेशातूनच गागाभट्ट यांना बोलावले होते. 24 ऑक्टोबरला आयोध्येत आम्ही 5 लाख 51 हजार दिवे लावणार असून त्याच दिवशी हरियाणा आणि महाराष्ट्रामधील विजय आम्ही साजरा करू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

हेही वाचा - राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर योगी यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात पूर आला त्यावेळी राहुल गांधी आले नाहीत. आता निवडणुका आहेत, तर प्रचाराला येतील. त्यांच्या खोटारडेपणाला बळी पडू नका, असे आवाहन योगी यांनी केले.

हेही वाचा - प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या - राज ठाकरे

मोदी सरकारने राष्ट्रवाद आणला, आतंकवाद आणि नक्षलवाद संपवणे हेच आमचे ध्येय आहे. काँग्रेसच्या काळात मुंबईत हल्ले झाले. मोदी-फडणवीस यांच्या कार्यकाळात हल्ले झाले नाहीत. भाजप सरकार जिथे आहे, तिथे दंगे होत नाहीत. जनतेच्या हितासाठी कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्याचा विकास सुरू ठेवण्यासाठी मुंबईतील युतीच्या सर्व उमेदवारांना जिंकून आणा, असे आवाहन योगी यांनी मुंबईकरांना केले.

Intro:महाराष्ट्रातील विजय आयोध्येत दीपोत्सव लावून साजरा करू - योगी आदित्यनाथ

mh-mum-01-bjp-yogi-aditynath-7201153

( यासाठी लाईव्ह वरून फीड घ्यावे)

मुंबई, ता. १० :
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील नाते हे खूप जुने आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेकासाठी उत्तर प्रदेशातूनच गागाभट्ट यांना आणले होते. आता या राज्यात पुन्हा भाजपाचेच सरकार येणार असून त्यासाठी विजय हा अायोध्येत लाखो दीपोत्सव लावून साजरा करू असा संकल्प उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबईत प्रचार सभेत केला.
कांदिवली येथे सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
योगी म्हणाले की, २४ ऑक्टोबर आयोध्येत आम्ही पाच लाख ५१ हजार दीप लावणार असून त्याच दिवशी हरियाणा आणि महाराष्ट्र मधील विजय आम्ही साजरा करून हा दीपोत्सव साजरा करण्याचा संकल्प करत असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर योगी यांनी जोरदार टीका करत महाराष्ट्रात पूर आला त्यावेळी राहुल गांधी आले नाहीत.आता निवडणुका आल्या तर ते ईटली कडे गेले आहेत.आणि आता ते प्रचाराला येतील, त्यामुळे त्यांच्या खोटारडे पणाला बळी पडू नका असे आवाहन योगी यांनी केले. तसेच आमच्या समोर विकास हा अजेंडा गरीब, गाव, शेतकरी, बहीण बेटी त्यांच्या हितासाठी आहे. त्यात दृष्टीने आम्ही कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत. असेही योगी म्हणाले.
मोदी सरकारने ३७० कलम रद्द केल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. देशातील १९४७ पासून जे अजेंडे चालू होते,ते मोदींनी बदलले आम्ही आता राष्ट्रवाद आणला, आतंकवाद आणि नक्षलावाद संपवणे हाच आमचा राष्ट्रवाद आहे. आम्ही यातून पाकिस्तान ला चेतावणी दिलीय. यामुळे हल्ले होत नाहीत. काँग्रेसच्या काळात मुंबईत हल्ले झाले, लोकांचे जीव गेले, आयोध्या, काशी येथे हलले होत गेले, आता मोदी. फडणवीस यांचा कार्यकाळ एकही हल्ला झाला नाही.
मागील काँग्रेसच्या कुशासन काळात देशात रोज घोटाळे व्हायचे, दंगे व्हायचे, सरकारी खजाना. लुटला जायचा, परंतु त्यावेळी काँग्रेस काही बोलत नव्हते.. देशात मोदी सरकार आल्यानंतर ते सर्व थांबले.
भाजप सरकार जिथे आहे, तिथे दंगे होत नाहीत, याचा संकल्प मोदी यांनी घेतला आहे.मोदी ज्यावेळी परदेशात जातात, त्यांचा सन्मान होतो, तो सन्मान देशाचा असतो. हा सन्मान कायम ठेवण्यासाठी मुंबईतील सर्व उमेदवारांना जिंकून आणा. असे आवाहन योगी यांनी केले.

छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्याभिषेक साठी उत्तर प्रदेश मधून गागा भट्ट यांना आणले होते, काशीत जे घाट आहेत, त्या ठिकाणी मराठी नाव आणि त्यांचे संबंध दिसून येतील.
१९१६ मध्ये लोकमान्य टिळक यांनी केलेला स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या घोषणेचा कार्यक्रम आम्ही उत्तर प्रदेशात साजरा केला.उत्तर प्रदेशात अनेक शाळांमध्ये गीत रामायण आणि मराठी भाषा शिकवली जात आहेत हे दोन्ही राज्याचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे, राज्यात पुन्हा भाजप सेनेची सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले असून सर्वांनी युतीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
Body:महाराष्ट्रातील विजय आयोध्येत दीपोत्सव लावून साजरा करू - योगी आदित्यनाथConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.