ETV Bharat / state

किरीट सोमैयांच्या आरोपांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ - अनिल परब - किरीट सोमैया लेटेस्ट न्यूज

किरीट सोमैयांची आरोपांची मालिका संपल्यानंतर आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

anil parab
अनिल परब
author img

By

Published : Nov 13, 2020, 5:46 PM IST

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैया हे वारंवार मुख्यमंत्री, शिवसेना व शिवसेना नेत्यांवर आरोप करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना त्यांची आरोपांची मालिका संपली की, आम्ही त्या आरोपांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे परिवहनमंत्री व शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी म्हटले आहे.

त्यांच्या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध झाला नाहीत -
किरीट सोमैया यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपाबाबत अनिल परब बोलत होते. त्यांना आरोप करण्याचे काम दिलेले आहे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितल्यास आतापर्यंत केलेल्या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाहीत. त्यांच्या आरोपाची मालिका पूर्ण होऊ दे, मग आम्ही उत्तर देऊ. ते जे काही आरोप करत आहेत, त्याला कोणताही आधार नाही. जे आरोप केले, त्याची उत्तरे आधीच दिलेली आहेत. ते सर्व आरोप बिनबुडाचे ठरलेले आहेत. शिळ्या कडीला ऊत देण्याचे काम सुरू आहे. दिवाळीचे दोन चार दिवस जाऊ देत, त्यानंतर आम्ही त्या आरोपांची शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे परब यांनी म्हटले आहे.

शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ..अनिल परबांचा इशारा
काय आहेत सोमैया यांचे आरोप -
अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी मुद्दाम अटक केली. नाईक परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यात आर्थिक संबंध आहेत, हे अप्रत्यक्ष गैरव्यवहार आहेत, असा सोमैयांचा आरोप आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाईक व ठाकरे तसेच वायकर यांच्याशी झालेल्या जमीन व्यवहाराबाबत खुलासा करावा, अशी मागणी सोमैया यांनी केली आहे. ठाकरे व वायकर यांचे आर्थिक व व्यावसायिक संबंध कसे?, रश्मी ठाकरे व मनीषा वायकर कुटुंबीयांचे एका जागेमध्ये नाव समोर आले आहे. रवींद्र वायकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्रीही होते. मनिषा या रवींद्र वायकरांच्या पत्नी आहेत. रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा वायकर यांचे जागा घेण्यापर्यंत संबंध कधी आले. जर संबंध असतील तर आर्थिक आहेत की, व्यावसायिक आहेत, असा प्रश्न सोमैया यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा -ठाकरे कुटुंबीयांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी... किरीट सोमय्यांची जनहित याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.