ETV Bharat / state

आरक्षणासाठीच आम्ही सत्तेत बसवले होते, आता खाली खेचू - प्रकाश शेंडगे - विधानपरिषद

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वाट्टेल ते प्रयत्न केले. मात्र, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने समाजाची फसवणूक केली.

ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना माजी आमदार प्रकाश शेडगे
author img

By

Published : Jun 27, 2019, 8:46 PM IST

मुंबई - राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळेल यासाठीच आम्ही फडणवीस सरकारला साडेचार वर्षांपूर्वी राज्यात सत्तेत आणून बसवले होते. मात्र, या सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. यामुळे येत्या विधानसभेत आम्ही या सरकारला सत्तेतून खेचून खाली आणू, असा इशारा धनगर समाजाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिला.

आरक्षणासाठीच आम्ही सत्तेत बसवले होते, आता खाली खेचू - प्रकाश शेंडगे

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वाट्टेल ते प्रयत्न केले. मात्र, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने समाजाची फसवणूक केली. आरक्षणासाठी काहीही ठोस पावले उचलली नाहीत. यामुळे धनगर समाजाची सरकारने घोर निराशा केली आहे आणि त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

आम्ही सरकारला कधीही निधी मागितला नाही. आमची मुख्य मागणी आरक्षणाची होती, सरकारने निधी दिला. मात्र, याचा आम्हाला काहीही उपयोग होणार नाही. आरक्षणासाठी सरकारने केवळ टाटा सामाजिक संस्थेचा अहवाल आला असल्याचे सांगितले. तरीही तो अहवाल नेमका काय आहे, हे मात्र सांगितलेले नाही.

आज विधानपरिषदेत आमच्या आमदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला. परंतु, सरकारची नाचक्की होईल म्हणून त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी चर्चा होऊ दिली नाही. यामुळे या सरकारची धनगर समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही, हे स्पष्ट झाले आहे. म्हणून या सरकारला येत्या निवडणुकीत सत्तेतून खेचून आणू असा इशाराही शेंडगे यांनी दिला.

Intro:आरक्षणासाठीच आम्ही सत्तेत बसवलो होतो, आता खाली खेचू- प्रकाश शेंडगे
Body:आरक्षणासाठीच आम्ही सत्तेत बसवलो होतो, आता खाली खेचू- प्रकाश शेंडगे
(यासाठी शेंडगे यांच्यासोबत १२१ केला असून तो कॅमेरामन अनिल निर्मळ यांनी 3g live 07 वरून फिड पाठवले आहे ते घ्यावे)
मुंबई, ता. २७ :
राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळेल यासाठीची आम्ही फडणवीस सरकारला साडेचार वर्षांपूर्वी राज्यात सत्तेत आणून बसवलो, परंतु या सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली.यामुळे येत्या विधानसभेत आम्ही या सरकारला सत्तेतून खेचून खाली आणू असा इशारा धनगर समाजाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वाट्टेल ते प्रयत्न केले, परंतु धनगर समाजाच्या आरक्षणसाठी सरकारने समाजाची फसवणूक केली. आरक्षणासाठी काहीही ठोस पावले उचचली नाहीत. यामुळे धनगर समाजाची सरकारने घोर निराशा केली असून त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही सरकारला कधीही निधी मागितला नव्हता आम्हाला आरक्षणाचा प्रश्न मुख्य होता. परंतु सरकारने निधी दिला. परंतु याचा आम्हाला काहीही उपयोग होणार नाही. आरक्षणासाठी सरकारने केवळ टाटा सामाजिक संस्थेचा अहवाल आला असल्याचे सांगितले तरीही तो अहवाल नेमका काय आहे हे मात्र सांगितले नाही. आज विधानपरिषदेत आमच्या आमदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला होता, परंतु सरकारची नाचक्की होईल म्हणून त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी चर्चा होऊ दिली नाही.त्या दरम्यान गोंधळ घातला. यामुळे या सरकारची धनगर समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही हे स्पष्ट झाले असल्याने या सरकारला येत्या निवडणुकीत सत्तेतून खेचून आणू असा इशाराही शेंडगे यांनी दिला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.