ETV Bharat / state

''फोन टॅपिंगचे कोणतेही आदेश दिलेले नव्हते, सरकारने चौकशी करावी'' - sanjay raut

भाजप-सेनेची सत्ता असताना तत्कालीन विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह खासदार संजय राऊत यांचाही फोन टॅप झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, असा कुठलाही प्रकार झाला नसून राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 24, 2020, 4:34 PM IST

मुंबई - भाजप-शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह खासदार संजय राऊत यांचाही फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. मात्र, तत्कालीन सरकारच्या काळात असा कोणताही प्रकार झालेला नाही, सरकारने याची चौकशी करावी असे सांगत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याने इस्रायल येथून आणलेल्या यंत्राद्वारे ही फोन टॅपिंग होत असल्याची तक्रार गृहमंत्रालयाकडे केली. या प्रकरणाची चौकशी करू असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तत्कालीन राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते. या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठाऊक आहे असेही फडणवीस यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकार नमूद केले. तसेच राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर, तीही करावी असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - 'ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचे कवच त्याला भय कोणाचे'

हेही वाचा - 'राज्यात झालेले सत्तापरिवर्तन भाजपच्या जिव्हारी'

Intro:फोन टॅपिंगचे कोणतेही आदेश दिलेले नव्हते, सरकारने चौकशी करावी- देवेंद्र फडणवीस

मुंबई 24

भाजप- शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह खासदार संजय राऊत यांचेही फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. मात्र तत्कालीन सरकारच्या काळात असा कोणताही प्रकार झालेला नाही, सरकारने याची चौकशी करावी असे सांगत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याने इस्रायल इथून आणलेल्या यंत्रा द्वारे ही फोन टॅपिंग होत असल्याची तक्रार गृहमंत्रालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करू असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तत्कालीन
राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते. या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठावूक आहे असेही फडणवीस यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकार नमूद केले. तसेच राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठावूक आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.