ETV Bharat / state

होय आम्ही पवारांच्या संपर्कात; संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे सत्तेची समीकरण बदलणार का?

शरद पवार हे देशाचे नेते आहे. त्यांची भेट घेणे किंवा बोलणे हा काय गुन्हा आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिवाय पवार मुख्यमंत्रीपदी येतील, ही अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Nov 5, 2019, 12:07 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असून राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत आहे. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी मुंबईत केले. तसेच आम्ही शरद पवारांच्या संपर्कात आहोत, पवारांशी बोललो तर तो अपराध झाला का? राजकारणामध्ये काहीही होत असते, असे ते म्हणाले. त्यामुळे भविष्यात सत्तास्थापनेचे समीकरण कसे असेल याची उत्सुकता ताणली गेली आहे.

शरद पवार हे देशाचे नेते आहे. ते मुख्यमंत्री पदी येतील, ही अफवा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार येणार नाहीत. शिवसेनेने प्रस्ताव पाठविला नाही या शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेने 'वेट अ‌ॅण्ड वॉच' अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांशी मी बोललो त्यांना भेटलो, तर हा गुन्हा आहे का? आम्ही (शिवसेना) पवारांशी बोलल्यामुळे ज्यांच्या पोटात दुखतंय, तेही कसे पवारांच्या संपर्कात आहेत, हे चागंल माहीत आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण बसणार? जागांची बेरीज वजाबाकी करून कोणाची सत्ता स्थापन होणार, हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण होऊन महाराष्ट्रातील ग्रहण सुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात स्थिर सरकार यावे ही शिवसेनेची इच्छा आहे, असे ते म्हणाले. शिवसेना- भाजप युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून लागलेल्या भांडणामुळे शरद पवार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांनी काल (सोमवारी) दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करु शकतात, त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.