ETV Bharat / state

गुड न्यूज...! उद्यापासून मुंबईतील पाणी कपात रद्द, नियमित पाणीपुरवठा होणार - water supply mumbai news

गेल्‍या काही दिवसांत झालेल्‍या दमदार पावसामुळे बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे ५ ऑगस्‍टपासून लागू करण्‍यात आलेली पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार शनिवारपासून महानगरपालिका क्षेत्राला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

मुंबईतील पाणी कपात रद्द
मुंबईतील पाणी कपात रद्द
author img

By

Published : Aug 28, 2020, 4:43 PM IST

Updated : Aug 28, 2020, 6:57 PM IST

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात कमी पाऊस पडल्याने मुंबईत २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. पुढे ही पाणी कपात १० टक्क्यांवर आणली होती. मात्र, आता सातही धरणक्षेत्रातील एकूण जलसाठा ९५.१९ टक्के जमा झाला आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील पाणीकपात २९ ऑगस्‍टपासून मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे उद्या(शनिवार)पासून नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये पाणलोट क्षेत्रात गेल्‍या काही दिवसांत झालेल्‍या दमदार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. आज(शुक्रवार) सकाळी ६ वाजता करण्‍यात आलेल्‍या मोजणीनुसार सातही धरणांतील एकूण जलसाठा हा ९५.१९ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. यामुळे ५ ऑगस्‍टपासून लागू करण्‍यात आलेली पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार उद्या २९ ऑगस्‍ट पासून महानगरपालिका क्षेत्राला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्‍याचबरोबर बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्‍या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर संबंधित गावांचा पाणीपुरवठा नियमित करण्‍याचेही ठरविण्‍यात आले आहे, अशी माहिती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

यंदाच्‍या पावसाळ्यादरम्‍यान जून व जुलै महिन्‍यात तलाव क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परिणामी, जुलै अखेरीस धरणांमधील एकूण जलसाठा हा केवळ ३४ टक्‍के उपलब्‍ध असल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ ऑगस्‍टपासून २० टक्‍के पाणीकपात लागू केली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात झालेल्‍या दमदार पावसामुळे २१ ऑगस्‍टपासून पाणीकपात २० टक्‍क्‍यांवरुन १० टक्‍के करण्‍यात आली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात सातत्‍याने पावसाने हजेरी लावल्‍याने जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. तर, आज सकाळी सातही धरणक्षेत्रात एकूण १३ लाख ७७ हजार ६९० दशलक्ष लिटर अर्थात ९५.१९ टक्‍के एवढा नोंदविण्‍यात आला आहे. दरम्यान, आजच्‍याच दिवशी गेल्‍यावर्षी म्‍हणजेच २८ ऑगस्‍ट २०१९ रोजी तलाव क्षेत्रातील एकूण पाणीसाठा हा ९६.४३ टक्‍के इतका होता. तर २८ ऑगस्‍ट २०१८ रोजी एकूण जलसाठा हा ९४.८९ टक्‍के इतका होता.

हेही वाचा - '1962 एवढीच गंभीर परिस्थिती सध्या लडाखमध्ये असून हेच वास्तव'

Last Updated : Aug 28, 2020, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.