ETV Bharat / state

Navneet Rana जात पडताळणी प्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात वॉरंट राहणार कायम

खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana Cast Certificate Case ) यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी मुलूंड पोलीस ठाण्यात ( Mulund Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायालयाने या प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केलेले आहे. याप्रकरणाची आज शिवडी न्यायालयात ( Shivdi Metropolitan Magistrate Court ) सुनावणी पार पडली, मात्र संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने नवनीत राणा न्यायालयात गैरहजर राहिल्या. मात्र नवनीत राणा यांच्याविरोधातील वॉरंट कायम राहणार असल्याचे आज न्यायालयाने स्पष्ट केले.

MP Navneet Rana
खासदार नवनीत राणा
author img

By

Published : Dec 15, 2022, 6:51 PM IST

मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana Cast Certificate Case ) यांच्या जात पडताळणी प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट ( Non Bailable Warrant Against Navneet Rana) जारी करण्यात आले होते. या प्रकरणात आज सुनावणी दरम्यान नवनीत राणा दिल्लीत सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनामुळे ( Parliamentary Session ) कोर्टात हजर राहू शकल्या नाही. या संदर्भातील अर्ज राणा यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सादर केला होता. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 22 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. मात्र तरी देखील नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट अस्तित्वात असणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कारवाई करण्यास पोलिसांची असमर्थता खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांच्या विरोधात जात पडताळणी प्रकरणी याचिका दाखल केली होती. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ( Shivdi Metropolitan Magistrate Court ) नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. दरम्यान आज सुनावणी दरम्यान पोलिसांनी या आदेशावर कारवाई करण्यास असमर्थता दाखवल्याविरोधात न्यायालयात कारण सांगितल्याने न्यायालयाने पोलिसांना प्रश्न विचारला होता.

शिवडी कोर्टाने विचारले प्रश्न खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana Cast Certificate Case ) जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात शिवडी कोर्टाने नवनीत राणा विरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वारंटवर कारवाई संदर्भात पोलिसांनी असमर्थता दाखवली आहे. सदर प्रकरण मुंबई सत्र न्यायालयात प्रलंबित असून सरकारी पक्षाने राणा विरोधात कुठलीही कारवाई न करण्याबाबत दिलेल्या हमीमुळे पोलीस पुढील कारवाई करण्यास असमर्थ आहेत, असे पोलिसांनी कोर्टात सांगितले. महानगर दंडाधिकारी न्यायालयाचा ( Shivdi Metropolitan Magistrate Court ) आदेश असताना सरकारी वकिलांनी त्यावर कारवाई न करण्याबाबत भाष्य करण्याचा अधिकार आहे का ? असे प्रश्न शिवडी कोर्टाने यावेळी विचारला आहे.

शाळा सोडल्याचा खोटा दाखला बनवल्याचा आरोप खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्याविरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत आणि हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस त्यांचे वडील देखील या प्रकरणात आरोपी आहेत. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा खोटा दाखला केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्याकडून ( Mulund Police Station ) नवनीत राणा उर्फ ​​नवनीत कौर हरभजन सिंग कुंडलेस आणि तिचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.