ETV Bharat / state

Wankhede Stadium Security : 'एनआयए'ला मेल, नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी; 'वानखेडे'ची सुरक्षा वाढवली - पंतप्रधान मोदींची हत्या करण्याची धमकी

Wankhede Stadium Security : 'एनआयए'ला धमकीचा ईमेल प्राप्त झालाय. यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या स्टेडियमवर विश्वचषकचे पाच सामने होणार असल्याने मुंबई पोलीस सतर्क आहेत.

Wankhede Stadium Security
वानखेडे स्टेडियम सुरक्षा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 9:43 PM IST

Updated : Oct 6, 2023, 9:58 PM IST

मुंबई : Wankhede Stadium Security : सध्या देशात क्रिकेट विश्वकपला सुरुवात झाली (NIA Threat Email) आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा एजन्सीला धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. या ईमेलमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Threat to kill PM) यांची हत्या आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्फोट (Blow up Narendra Modi stadium) घडवून आणण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ईमेलमध्ये 500 कोटी रुपयांची रक्कम मागितली असून, सध्या तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्सची सुटका करण्याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी : अटकेत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या सुटकेची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तत्काळ मुंबई पोलिसांना धमकीच्या ईमेलची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे एनआयएने ईमेलमधील मजकूर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या संबंधित सुरक्षा यंत्रणांकडे पाठविला आहे. मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर आगामी पाच विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. धमकी देणाऱ्या ईमेलचा मूळ स्रोत शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सक्रियपणे काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बिश्नोई गँगरची धमकी? : महत्वाचे म्हणजे बिश्नोई 2014 पासून तिहार तुरुंगात आहे. मात्र, तो तुरुंगातून आपली टोळी चालवत असल्याचे समजते. पंजाबमध्ये त्याच्यावर पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येसह अनेक खटले प्रलंबित आहेत. बिश्नोईने यापूर्वी मूसेवालावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि काळवीट शिकार प्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला तुरुंगातून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काय दिली धमकी? : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपल्या मेलमध्ये लिहिले आहे की, आम्हाला तुमच्या सरकारकडून आणखी 500 कोटी हवे आहेत, अन्यथा आम्ही नरेंद्र मोदींसह गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देऊ. भारतात सर्व काही विकले जाते म्हणून आम्ही देखील काहीतरी विकत घेतले आहे. तुम्ही स्वतःचे कितीही रक्षण केले तरी तुम्ही आमच्यापासून सुटू शकणार नाही. बोलायचे अर्थात उत्तर द्यायचे असेल तर या मेलवरच द्या. तपास यंत्रणा या प्रकरणाच्या सखोल तपासात गुंतल्या आहेत.

कुठे आहे नरेंद्र मोदी स्टेडियम : गुजरात राज्यातील अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव २०२१ मध्ये देण्यात आलं आहे. मोटेरा स्टेडियम आता 'नरेंद्र मोदी स्टेडियम' नावाने ओळखलं जातं. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी स्टेडियम हे स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून, यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime News : आत्महत्येच्या तयारीतल्या तरुणाचा मुंबई पोलिसांनी वाचवला जीव; इंटरपोलनं दिला होता अलर्ट..
  2. Jai Shree Ram : ‘जय श्री राम’ बोलण्यास नकार दिल्यानं तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

Last Updated : Oct 6, 2023, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.