मुंबई : राज्यामध्ये मतदार नोंदणीसाठी या शासनाने महत्त्वाचा बदल करत नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी घोषणा केलेली ( Voter registration in state Maharashtra) आहे. 18 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची नोंदणी 9 नोव्हेंबर ते आठ डिसेंबर या काळामध्ये विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ नोंदणी करता ( Advance registration under special campaign ) येईल.
अनेकांचे नाव चुकलेले : दरवर्षी मतदार नोंदणीमध्ये अनेकांचे नाव चुकलेले असते. तर कुणाचे आडनाव चुकलेले असते. अन्यथा यादीमध्ये नाव आलेले नसते. या सर्व वादावर पडदा पडावा म्हणून राज्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी थोड्याच वेळापूर्वी विशेष मतदार नोंदणी घोषित केलेली आहे. नऊ नोव्हेंबर ते आठ डिसेंबर 2022 या कालावधीत राज्यातील सर्व 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी विशेष मोहीम सुरू होत असून यात आगाव नोंदणी करता येईल.
ज्यांची 18 वर्षे पूर्ण : दरवर्षी आतापर्यंत एक जानेवारी किंवा जानेवारीच्या आधी ज्यांची 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत. त्यांचीच मतदार नोंदणी होत असे मत राहता 2023 या नवीन वर्षापासून जानेवारी महिना व एप्रिल आणि जुलै तसेच ऑक्टोंबर या महिन्यात देखील मतदारांना नोंदणी करता येईल. जेणेकरून मतदारांनी आपली नोंदणी अधिकारी करावी. हा यामागे उद्देश असल्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.