ETV Bharat / state

'नेस्को'त आवाजावरून स्क्रिनिंग पद्धतीचा अभ्यास 1 सप्टेंबरपासून सुरू

1 सप्टेंबरपासून 'नेस्को'त आवाजावरुन स्क्रिनिंग करण्याच्या अभ्यासाला सुरुवात होणार आहे. 3 महिने 2000 रुग्णांवर प्रयोग करत हा अभ्यास करण्यात येणार आहे.तीन महिन्यांनंतर याचा अहवाल सादर झाल्यानंतर ही पद्धती योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच याचा वापर मुंबईत स्क्रिनिंगसाठी केला जाणार असल्याचेही डॉ.आंद्राडे यांनी सांगितले आहे.

voice screening
आवाजावरुन स्क्रिनिंग
author img

By

Published : Aug 24, 2020, 10:08 PM IST

मुंबई- कोरोना संशयित रुग्णांना शोधण्यासाठी विविध स्क्रिनिंग पध्दतींचा वापर केला जात आहे. यामध्ये ताप मोजणे, ऑक्सिजनची पातळी तपासणी याचा समावेश आहे. मात्र, येत्या तीन महिन्यात आणखी एका अत्याधुनिक पध्दतीची भर पडणार आहे. ती म्हणजे व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स अर्थात आवाजावरून स्क्रिनिंग पद्धती होय. ही पद्धती योग्य आणि गुणवत्तापूर्ण आहे का याचा गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरमध्ये तीन महिने अभ्यास केला जाणार आहे. 1 सप्टेंबरपासून या अभ्यासाला (रिसर्च) सुरुवात होणार असल्याची माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. नेस्कोतील 2000 पॉझिटिव्ह रुग्णांवर प्रयोग करत हा अभ्यास केला जाणार आहे. तीन महिन्यांनंतर याचा अहवाल सादर झाल्यानंतर ही पद्धती योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच याचा वापर मुंबईत स्क्रिनिंगसाठी केला जाणार असल्याचेही डॉ.आंद्राडे यांनी सांगितले आहे.

अमेरिका आणि इस्त्राईलमध्ये ही पद्धती स्क्रिनिंग साठी वापरण्यात येते. नागरिकांच्या आवाजावरून केवळ 30 सेकेंदात कोरोनाची लक्षणे आहेत की नाहीत हे समजते. त्यानंतर लक्षणे असलेल्या रुग्णांची अँटिजेन वा आरटीपीसीआर कोरोना टेस्ट केली जाते. खूपच कमी वेळात संशयित रुग्ण शोधता येत असल्याने मुंबईतही हे शक्य आहे का असा विचार पुढे आला. यानंतर मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेत 'व्होकोलिस हेल्थ' या इस्रायली कंपनीबरोबर मिळून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर पालिका आणि इस्त्रायली कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे आता 1 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात होईल, असे डॉ.आंद्राडे यांनी सांगितले आहे.

...'असा' होईल अभ्यास

नेस्कोमधील 2000 रुग्णांवर अभ्यास केला जाणार आहे. त्यानूसार 500 रुग्णांच्या आवाजाचे नमुने संबंधित कंपनीच्या अ‌ॅपचा वापर करत मोबाईलवरुन घेतले जातील. हे नमुने आणि रुग्णांची सर्व माहिती, त्यांचे कोरोना टेस्ट अहवाल, एक्सरे इतर अहवाल ही इस्रायला पाठवले जातील. तर इतर 1500 रुग्णांचे केवळ आवाजाचे नमुनेच पाठवले जातील. या सर्व नमुन्याचा अभ्यास करुन कंपनी आपला अहवाल देईल. कंपनीच्या अहवालानंतरच ही पद्धती योग्य आहे की नाही, याचा वापर करणे व्यवहार्य आहे की नाही हे स्पष्ट होईल. त्यानंतरचा याचा वापर करण्यासाठीचा अंतिम निर्णय पालिका घेईल. पण या सर्व प्रक्रियेला तीन महिने लागतील असेही डॉ. आंद्राडे यांनी स्पष्ट केले आहे.

चार भाषांमध्ये घेतले जाणार नमुने

डॉ.आंद्राडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चार भाषांमध्ये रुग्णांच्या आवाजाचे नुमने घेण्याची सोय कंपनीच्या अ‌ॅपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात हिंदी, मराठी, इंग्रजी आणि गुजराती या भाषेचा समावेश आहे. तर रुग्णाला यात या चारपैकी कोणत्याही एका भाषेत 1 ते 20 पर्यंतचे आकडे मोजावे लागतील. तर पाच वेळेस खोकायचे आहे. या दोन्ही आवाजाच्या नमुन्यावरून कोरोनाची लक्षणे आहेत का असतील तर ती सौम्य, मध्यम वा गंभीर आहेत हे तपासत त्याचा अंतिम निष्कर्ष दिला जाणार आहे. पण ही कोरोना चाचणी नसेल तर हे केवळ स्क्रिनिंग असणार आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.