ETV Bharat / state

विशाखापट्टणम पाकस्तान हेरगिरी प्रकरण ; एनआयएनं मुंबईतून एका आरोपीला केलं अटक - अमन सलीम शेखला मुंबईतून अटक

Visakhapatnam Espionage Case : एनआयएनं विशाखापट्टणम पाकिस्तान हेरगिरीप्रकरणी मुंबईत सोमवारी छापेमारी केली. या छापेमारीत एनआयएनं अमन सलीम शेख या आरोपीला अटक केली आहे.

Visakhapatnam Espionage Case
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 7:59 AM IST

Updated : Nov 21, 2023, 12:43 PM IST

मुंबई Visakhapatnam Espionage Case : विशाखापट्टणम पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA ) मुंबईतून तिसरी अटक केली आहे. अमन सलीम शेख असं एनआयएनं मुंबईतून अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) सोमवारी विशाखापट्टणम हेरगिरी प्रकरणातील आरोपीला पाकिस्तानी ISI हेरगिरी नेटवर्कला संरक्षण माहिती लीक केल्याप्रकरणी ही अटक केली.

एनआयएचे मुंबईत छापे : एनआयएनं सोमवारी मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली. त्यासह एनआयएनं याच प्रकरणात आसामच्या नागाव जिल्ह्यातील होजई इथंही एका ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर अमन सलीम शेखला मुंबईतून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनं या प्रकरणातील आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. या प्रकरणी एनआयएनं यापूर्वीच दोन फरार पाकिस्तानी गुंडांसह एकूण चार जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं सीमकार्ड केलं अ‍ॅक्टीवेट : रॅकेटमध्ये सहभागी असलेले पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी वापरत असलेलं सिमकार्ड सक्रिय करण्यात अमनचा सहभाग असल्याचं आढळून आलं. ही बाब 2021 मध्ये पहिल्यांदा उघडकीस आल्यानंतर आंध्र प्रदेशच्या काउंटर इंटेलिजन्स सेलनं गुन्हा नोंदवला होता. भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 120B आणि 121A आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा, 1967 कलम 17 आणि 18 आणि अधिकृत गुप्तता कायदा, 1923 कलम 3 अंतर्गत 12 जानेवारी 2021 ला याची नोंद करण्यात आली. जून महिन्यात एनआयएनं हे प्रकरण हातात घेतलं होतं.

दोन मोबाईलसह संवेदनशील कागदपत्रं जप्त : एनआयएच्या पथकांनं अमनला अटक केलेल्या ठिकाणावरुन तपास यंत्रणेला दोन मोबाईल फोनही सापडले आहेत. त्यासह एनआयएनं टाकलेल्या छाप्यांमध्ये इतर ठिकाणांहून आणखी दोन मोबाईल फोन आणि अनेक संवेदनशील कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.

दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल : एनआयएनं यावर्षी 19 जुलैला फरार पाकिस्तानी नागरिक मीर बालाज खानसह दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. अटक आरोपी आकाश सोलंकीसह मीर बलाझ खान हे हेरगिरी मॉड्यूलचा भाग असल्याचं तपासात उघड झालं आहे. ते भारतीय नौदलाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवून ती पाकिस्तानस्थित हस्तकांना लीक करत होते. 6 नोव्हेंबरला एनआयएनं गुन्हा दाखल केला होता. मनमोहन सुरेंद्र पांडा आणि अल्वेन या दोन अन्य आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. पांडा अटकेत असताना पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी अल्वेन फरार असून तो पाकिस्तानमध्ये असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अमनच्या कोठडीतील चौकशीतून देशभरातील संरक्षण संस्थांशी संबंधित संवेदनशील आणि गोपनीय माहिती मिळवण्यासाठी केलेल्या कटाची आणखी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. NIA Crackdown On PFI : एनआयएची विक्रोळीत छापेमारी; मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीच्या घरावर धाडसत्र
  2. Kerala Blast : केरळमधील बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण भारतात हाय अलर्ट; NSG, NIA च्या टीम तपासासाठी पोहचल्या

Last Updated : Nov 21, 2023, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.