ETV Bharat / state

सचिन सावंतांनी पियुष गोयल यांच्या भावावर केलेले आरोप बिनबुडाचे - विनोद तावडे - काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

युनायटेड फॉस्फरस लिमिटेड याच कंपनीत मोदी यांचा आवाज असलेले आणि सर्जिकल स्ट्राइकच्या नावाने मते मागणारे कार्ड बनवली जात होती. त्यामुळे या कंपनीचे भाजपशी थेट लागेबांधे असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला होते. त्यांना आज विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना विनोद तावडेंसह केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल
author img

By

Published : Apr 10, 2019, 11:08 PM IST

मुंबई - युनायटेड फॉस्फरस प्रकरणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या भावावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. प्रदीप गोयल हे संबंधित कंपनीत स्वतंत्र संचालक आहेत. स्वतंत्र संचालक असलेल्या कंपनीच्या रोजच्या कारभारात त्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना विनोद तावडेंसह केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल यांची युनायटेड फॉस्फरस लिमिटेड ही कंपनी आहे. याच कंपनीत मोदी यांचा आवाज असलेले आणि सर्जिकल स्ट्राइकच्या नावाने मते मागणारे कार्ड बनवली जात होती. त्यामुळे या कंपनीचे भाजपशी थेट लागेबांधे असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला होते.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि राहुल शेवाळे यांनी देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडच्या साडेचार हजार कोटी रुपयांच्या कंत्राटावर एकमेकांवर आरोप केले होते. एवढे मोठे कंत्राट पियुष गोयल यांच्या बंधूच्या याच कंपनीला देण्यात आले होते. त्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. याचा उल्लेखही सावंत यांनी केला होता.

कंपनीला देवनार डम्पिंग ग्राऊंडचे काम दिले आहे. त्यासाठी आवश्यक असणारी जागा राज्य सरकारकडून मिळणे अपेक्षित होते. मात्र, ती जमीन मिळालीच नाही. त्यामुळे त्याचे काम सुरू झालेच नाही. कोणताही व्यवहार न झाल्याने पालिकेला ते कंत्राट रद्द करावे लागले असल्याचे तावडे म्हणाले.

दरम्यान, माझा भाऊ या कंपनीत स्वतंत्र संचालक आहे. मला हे प्रकरण अधिक माहित नाही. काँग्रेस केवळ आरोप करते त्यांनी पुरावे दाखवावेत, असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

Intro:युनायटेड फॉस्फरस प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे भाऊ प्रदीप गोयल यांच्यावर आज पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. सचिन सावंत यांनी अर्धवट माहिती घेतली आहे. प्रदिप गोयल हे संबंधित कंपनीवर स्वतंत्र संचालक आहेत. स्वतंत्र संचालक असलेल्या कंपनीच्या रोजच्या कारभारात हस्तक्षेप घेण्याचा काहीही अधिकार नाही. सचिन सावंत यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले.

Body:ज्या कंपनीला देवनार डम्पिंग ग्राऊंडच काम दिले, त्यासाठी आवश्यक असणारी जागा राज्य सरकारकडून मिळणे अपेक्षित होते, मात्र ती जमीन मिळालीच नाही. त्यामुळे त्याचं काम सुरू झालेच नाही आणि कोणताही व्यवहार न झाल्याने पालिकेला ते कंत्राट रद्द करावे लागले अशी माहिती तावडे यांनी दिली.

Conclusion:माझा भाऊ या कंपनीत स्वतंत्र संचालक आहे. मला हे प्रकरण अधिक माहित नाही. काँग्रेस केवळ आरोप करते त्यांनी पुरावे दाखवावेत असे पियुष गोयल यांनी म्हटले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.