मुंबई - संयुक्त पुरोगामी महाआघाडीत ५६ काय १०० पक्ष संघटना आल्या तरी पंतप्रधान मोदींचा पराभव करू शकत नसल्याचे भाजप नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
दलित आदिवासी, पीडित आणि कामगारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फसवणूक केली. त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पुरोगामी विचारसरणीचे ५६ पक्ष आणि संघटना एकत्र आल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले. यावर तावडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
संयुक्त पुरोगामी महाआघाडीची स्तिथी डामडौल झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे कुणी ऐकत नाही. राधाकृष्ण विखे-पाटील यांचेही कुणी ऐकत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे बोलतात ते कधीही करत नाहीत. अशा नेतृत्त्वावर जनता विश्वास दाखवणार नाही. त्यामुळे या लोकसभेत भाजपचाच विजय निश्चित असल्याचे तावडे यांनी म्हटले आहे.