ETV Bharat / state

विनायक मेटे यांचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सत्तेत आलेल्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी वेळ नाही. यासाठी मी ३ पत्रे सरकारकडे पाठवली, पण त्यालाही सकारात्मक उत्तर न दिल्यामुळे मी आज समितीच्या अध्यक्षपादाचा राजीनामा देत असल्याचे मेटेंनी सांगितले.

vinayak mete resigns as chairman of shiv smarak committee
विनायक मेटेंनी दिला शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
author img

By

Published : Feb 5, 2020, 10:28 PM IST

Updated : Feb 5, 2020, 11:00 PM IST

मुंबई - शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धवल ठाकरे यांच्याकडे मेटे यांनी हा राजीनामा सुपूर्द केला. तसेच सत्तेत आलेल्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी वेळ नाही. यासाठी मी ३ पत्रे सरकारकडे पाठवली, पण त्यालाही सकारात्मक उत्तर न दिल्यामुळे मी आज समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे मेटेंनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभे राहावे, यासाठी ३ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात उद्घाटन झाले होते. मात्र, आतापर्यंत हे स्मारक उभे राहू शकले नाही. त्यातच सरकार बदलले असल्याने या स्मारकाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. याकडे सरकार लक्ष देत नसल्याचे मेटे म्हणाले. त्यामुळे त्यांनी आज (बुधुवार) छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजवणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

विनायक मेटेंशी बातचीत

छत्रपती शिवरायांचे स्मारक उभे राहावे, अशी राज्यातील तमाम शिवप्रेमी आणि माझी इच्छा आहे. मात्र, सरकार बदलले असल्याने यासाठी माझी अडचण होऊ नये, म्हणून मी हा निर्णय घेतल्याचे मेटे म्हणाले. मागील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी उशीर झाला, ही मला आणि शिवप्रेमीला मोठी खंत आहे. परंतू, राज्यातील आत्ताचे सरकार इतर सर्व स्मारकाच्या आढावा घेत आहे. त्यासाठी अनेक मोठे नेते जात आहेत. तेच नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी उदासीन असल्याचा आरोपही मेटेंनी केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी काही निविदांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात असेल, त्याची चौकशी व्हावी. यासाठी कोणी विरोध केला नाही. त्यामुळे चौकशीसाठी कोणाची अडचण नाही. मात्र, जे काम सुरू झाले नाही, त्याची काय चौकशी करणार असा सवालही मेटेंनी उपस्थित केला.

मागील सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज मार्गासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या होत्या. परंतू, काही लोकांनी हे स्मारक उभारण्याच्या मार्गावर आलेले असताना हा विषय न्यायालयात नेऊन त्याला आडकाठी घातली. सुप्रीम कोर्टाने स्मारकाचा विषय केवळ तोंडी सूचना देऊन काम थांबविण्यात यावे, असे सांगितले. आज सव्वा वर्षानंतरही या स्मारकासाठी काही काम पुढे जात नाही. यामुळे आपल्याला खंत वाटत असल्याचे मेटे म्हणाले.

कोणत्याही स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहावे. हे माझेच नाही तर राज्यातील सर्व शिवप्रेमीची भावना आहे. परंतु मला जर सहकार्य मिळत नसेल तर या पदावर थांबणे मला योग्य वाटत नव्हते. तर दुसरीकडे मी स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर असल्याने आणि त्यासाठीची काही अडचण सरकारला वाटत असेल तर मीच बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

शिवसंग्राम संघटनेची भाजपबरोबर युती होती. त्यामुळे अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपतींच्या स्मारकाच्या समितीचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले होते. मेटे यांची फडणवीस सरकारने 2015 मध्ये नियुक्ती केली होती. मात्र, मेटे अध्यक्षपद अद्यापही शाबूत होते. मेटे यांची नियुक्ती राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आली होती. मात्र, सरकारकडून मेटे यांची नियुक्ती रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची कुणकुण मेटेंना लागल्यानेच त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येते.

Intro:विनायक मेटे यांनी दिला छत्रपतींच्या समारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

mh-mum-01-chtrapatismrak-vinayakmete-121-7201153

यासाठीचे फिड मोजोवर पाठवले आहे.

मुंबई, ता. ६ :
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभे राहावे, यासाठी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उद्घाटन झाले होते. मात्र आता आतापर्यंत हे स्मारक उभे राहू शकले नाही. त्यातच सरकार बदलले असल्याने या स्मारकाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून त्यासाठी सरकार लक्ष देत नाही, असा दावा करत विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजवणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
मेटे यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.

राज्यात मागील तीन महिन्यापासून सत्तेत आलेल्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी वेळ नाही. यासाठी मी तब्बल तीनहून अधिक पत्रे सरकारकडे पाठवली पण त्यालाही सकारात्मक उत्तर न दिल्यामुळे मी आज समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे मेटे यांनी सांगितले. हे स्मारक उभे राहावे अशी राज्यातील तमाम शिवप्रेमी आणि माझी इच्छा आहे. मात्र सरकार बदलले असल्याने यासाठी माझी अडचण होऊ नये, म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे मेटे म्हणाले.

मागील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी उशीर झाला, ही मला आणि शिवप्रेमीला ही मोठी खंत आहे. परंतु राज्यातील आत्ताचे सरकार इतर सर्व स्मारकाच्या आढावा घेत आहे, त्यासाठीचे अनेक मोठे नेते जात आहेत. तेच नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी ज्या काही निविदांमध्ये घोटाळा झाला आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात असेल त्याची चौकशी व्हावी, यासाठी कुणी विरोध केला नाही. त्यामुळे चौकशीसाठी कोणाची अडचण नाही. मात्र जे काम सुरू झाले नाही, त्याची काय चौकशी करणार असा सवाल त्यांनी केला.

मागील सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज मार्गासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या होत्या. परंतु काही लोकांनी हे स्मारक उभारण्याच्या मार्गावर आलेला असताना हा विषय न्यायालयात नेऊन त्याला आडकाठी घातली. सुप्रीम कोर्टाने स्मारकाच्या विषय केवळ तोंडी सूचना देऊन काम थांबविण्यात यावे,असे सांगितले. आज सव्वा वर्षाच्या नंतरही या स्मारकासाठी काही काम पुढे जात नाही. यामुळे आपल्याला खंत वाटत असल्याचेही मेटे म्हणाले.
कोणत्याही स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहावे. हे माझेच नाही तर राज्यातील सर्व शिवप्रेमीची भावना आहे. परंतु मला जर सहकार्य मिळत नसेल या पदावर थांबणे मला योग्य वाटत नव्हते. तर दुसरीकडे मी स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर असल्याने आणि त्यासाठीची काही अडचण सरकारला वाटत असेल तर मीच बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाप्रमाणे आज मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांनी सांगितले.
शिवसंग्राम संघटनेचे माजी अध्यक्ष विनायक मेटे यांच्या संघटनेची भाजप बरोबर युती होती. त्यामुळे अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपतींच्या स्मारकाच्या समितीचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले होते. मेटे यांची फडणवीस सरकारने 2015 मध्ये नियुक्ती केली होती. मात्र मेटे अध्यक्षपद अद्यापही शाबूत होते. मेटे यांची नियुक्ती राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आली होती. मात्र सरकारकडून मेटे यांची नियुक्ती रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची कुणकुण मेटे यांनी लागल्याने त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येते.
Body:विनायक मेटे यांनी दिला छत्रपतींच्या समारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामाConclusion:
Last Updated : Feb 5, 2020, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.