मुंबई - डोंगरी भागातील कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. डोंगरी दुर्घटनेत जवळपास १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, असे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
शहरातील डोंगरी परिसरातील ४ मजली इमारत कोसळून त्यात ४०-५० जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. ही इमारत म्हाडाची असून जुनी होती. सध्या बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.
विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.
राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
बचावकार्य पथक घटनास्थळी पोहोचले असून कार्य सुरु आहे. इमारत जिथे कोसळली ती गल्ली अरुंद असल्याने त्यात रुग्णवाहिकेला पोहोचण्यास त्रास होत आहे. ही इमारत म्हाडाची असून अतिधोकादायक वर्गामध्ये समाविष्ट करण्यात आली नव्हती. ती समाविष्ट करण्यात आली नाही याचा पाठपुरावा करण्यात यावा - भाई जगताप
बचतकार्य पथक घटनास्थळी पोहोचले आहे, कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मलब्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या दोन लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. - अमीन पटेल
ही १०० वर्षांपूर्वीची इमारत असून पुनर्विकासामध्ये आलेली इमारत होती. ती आज कोसळली. अर्ध्यातासापूर्वी स्थानिक नागरीकच मलबा काढत होते. घटनास्थळी इतक्या उशीरा एनडीआरएफ आणि महापालीकेचे कर्मचारी इथे पोहचले आहेत. यावरूनच सरकारचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. - धनंजय मुंडे (विरोधी पक्ष नेते, विधानपरिषद)