मुंबई : करी रोड येथील विघ्न पार्क या इमारतीला आज सकाळी आग ( Fire Broke Out in Vighna Park Building at Curry Road ) लागली. २२ व्या मजल्यावर लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना दरवाजा तोडून घरात घुसावे ( Breaking Door to Control The Fire on 22nd Floor ) लागले. तसेच, शिडीच्या साहाय्याने रहिवाशांना बाहेर ( Vighn Park Building Opposite Bharatmata Cinema ) काढून २३ व्या मजल्यावरून २५ व्या मजल्यावर न्यावे लागले. अशा प्रकारे ६० ते ७० जणांना इमारती बाहेर काढल्याची माहिती ( 60 to 70 People were Evacuated From Building ) उपअग्निशमन केंद्र अधिकारी व्ही. एन. सांगळे यांनी दिली.
६० ते ७० जणांना असे काढले सुरक्षित बाहेर : मुंबईच्या करीरोड येथील भारतमाता सिनेमासमोर विघ्न पार्क ही उत्तुंग इमारत आहे. या इमारतीच्या २२ व्या मजल्यावरील एका घराला १०.४५ वाजता आग लागली. आग लागली त्यावेळी घरामध्ये कोणीही नव्हते. इमारतीमध्ये आग लागल्यावर सायरन वाजल्यावर बहुतेक रहिवासी इमारती बाहेर आले. मात्र, २३, २४ आणि त्यावरील मजल्यावरील रहिवासी अडकले होते. या इमारतीच्या २५ व्या मजल्यावर रेस्क्युसाठी मजला राखीव ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी २३ आणि २४ मजल्यावरील रहिवाशांना शिडीद्वारे आणण्यात आले. तर त्या मजल्यावर असलेल्या ६० ते ७० रहिवाशांना इमारतीमध्ये असलेल्या शिड्याद्वारे २५ व्या मजल्यावर आणून बाजूच्या विंगमध्ये सुरक्षित नेण्यात आले.
सव्वा ते दीड तासाने आगीवर नियंत्रण : आगीच्या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल पोहोचले, त्यावेळी आग लागलेल्या घराचा दरवाजा बंद होता. इमारतीच्या सुरक्षारक्षकाने दाखवलेल्या घराचा दरवाजा सात ते आठ मिनिटात तोडून अग्निशमन दल घरात घुसले. घरामध्ये मोठ्या प्रमाणात फर्निचर तसेच इतर साहित्य असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि धूर मोठ्या प्रमाणात पसरला. हवेचे प्रमाण जास्त असल्याने आगीवर नियंत्रण करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, त्यानंतर सव्वा ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती सांगळे यांनी दिली.
जबाब नोंदवण्याचे काम सुरू : इमारतीमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती. इमारतीमधील अग्निसुरक्षा यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या यंत्रणाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग लागली त्यावेळी घरामध्ये कोणी नसल्याने कोणीही जखमी झालेले नाही. आग लागलेल्या घरामध्ये सर्वसामान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे आठ नेमकी कशामुळे लागली याची माहिती नाही मात्र या घरांमध्ये राहणाऱ्या महिलेचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून त्यामधून नेमकी आत कशामुळे लागली हे पुढे येऊ शकते असे सांगळे यांनी सांगितले.