ETV Bharat / state

मुस्लिम आरक्षणाबाबत मोर्चा काढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतले ताब्यात - mumbai political news

मुस्लिम समाजाच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमीच्या वतीने सोमवारी (दि. 5 जुलै) मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढला.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Jul 5, 2021, 7:38 PM IST

Updated : Jul 5, 2021, 10:16 PM IST

मुंबई - राज्यात मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण यासाठी उग्र आंदोलने केली जात आहेत. आता मुस्लिम समाजाच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमीच्या वतीने सोमवारी (दि. 5 जुलै) मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे आझाद मैदानात आलेल्या कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातचित करताना प्रतिनिधी

धार्मिक दंगलीबाबत कायदा

मुस्लिम समाजाने आमच्या 5 टक्के शैक्षणिक आरक्षण द्यावे तसेच धार्मिक दंगे पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी कायदा करावा या मागण्यांसाठी रजा अकादमी आणि वंचित बहुजन आघाडीने आज (सोमवार) आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या रेखा ठाकूर आणि फारुख अहमद यांच्या उपस्थित काढण्यात आला. यावेळी बोलताना, संविधानिक अधिकारानुसार सोमवारी आंदोलन करण्यात आले आहे. सर्वधर्म आणि धर्माच्या हक्काचे रक्षण करण्याचे आश्वासन बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला असताना धार्मिक प्रतीकांचा गैरवापर करून दंगली पेटवण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून होत आहे. या विरोधामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी 17 जून रोजी कायद्याच्या मसुदा जाहीर केला आहे. तो कायद्याचा मसुदा शिक्षक आमदार कपील पाटील हे विधानसभेमध्ये सादर करणार आहेत. सरकारने हा कायदा मंजूर करावा अशी आमची मागणी आहे, असे फारुख अहमद यांनी सांगितले.

मुस्लिम आरक्षण

2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकार मराठा आरक्षणाच्या अध्यादेश काढला होता. त्यातील मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पण, मुस्लिमांच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता आणि ते लागू करण्याच्या सूचना सरकारला दिल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली असता सर्वोच्च न्यायालयानेही पाच टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाला कायम ठेवले होते. फडणवीस सरकारने राजकारण करण्यासाठी मुस्लिम आरक्षण बाजूला ठेवले. त्याचप्रमाणे सध्याच्या आघाडी सरकारनेही गेले दोन वर्षे सत्ता असताना हे आरक्षण दिलेले नाही. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबात एक शब्दसुद्धा आघाडी सरकार काढत नाही. त्यासाठी महाविका आघाडी सरकारलाही आव्हान करण्यासाठी सोमवारी (दि. 5 जुलै) विधान भवनावर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती फारुख अहमद यांनी दिली.

पोलिसांनी घेतले ताब्यात

मुस्लिम आरक्षण व धार्मिक भावना दुखवणे याबाबत कायदा करावा यासाठी विधान भवनावर आज मोर्चा काढला. हा मोर्चा आझाद मैदान येथे आला असता सरकारने पोलिसांच्या गैरवापर करून मुस्कटदाबी करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती अहमद यांनी दिली.

हेही वाचा - निलंबित 'बारा' आमदारांचा वाद राज्यपालांच्या दरबारी

Last Updated : Jul 5, 2021, 10:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.