ETV Bharat / state

Darshan Solanki Suicide Case : दर्शन सोळंकींच्या खोलीमध्ये सापडलेल्या चिठ्ठीमधील हस्ताक्षरात तफावत; आई-वडीलांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Darshan Solanki room

आयआयटीमधील मृत दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या खोलीमध्ये एक चिठ्ठी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, दर्शनच्या आई-वडिलांनी त्या चिठ्ठी बाबत महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे. चिठ्ठीमधील हस्ताक्षर दर्शन सारखे नाही. ही बाब 16 मार्च रोजीच सांगितले असल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Ramesh Bhai Solanki
रमेश भाई सोळंकी
author img

By

Published : Mar 29, 2023, 11:06 PM IST

मुंबई : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट हस्तलेखन तज्ञांना पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी दर्शन सोळंकी यांच्या काही हस्तलिखित नोट्सच्या प्रती हस्तलेखन तज्ञांनाही पाठवल्या आहेत. आतापर्यंत 25 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यात आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वीच दर्शनच्या सहकारी विद्यार्थ्यांसोबत वाद झाल्याचे समोर आले आहे असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

Ramesh Bhai Solanki's statement to the Chief Minister
रमेश भाई सोळंकी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सोळुंकी वडीलांचे आरोप : मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये मृत दर्शन सोळंकी यांचे आई-वडील लिहितात की, 'आमचा अठरा वर्षाचा मुलगा दर्शन सोळंकी याचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत आम्ही मुंबईत 16 मार्च 2023 रोजी एफआयआर नोंदवण्यासाठी पवई पोलीस स्टेशनला गेलो. आम्ही पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याची विनंती केली होती मात्र, त्यांनी आमचा तक्रार नोंदवून घेतली नाही असा अरोप सोळंकीच्या आई-वडीलांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, विशेष तपास पथकामार्फत तपास सुरू आहे. विशेष पथकाचा तपास सुरू असताना अशी तक्रार नोंदवता येत नसल्याचे कारण पोलिसांनी आम्हाला दिल्याचे सोळुंकी म्हणाले. तुमची तक्रार आवश्यक कारवाईसाठी पुढे पाठवण्यात येईल असे पोलिसांनी आम्हला सांगितल्याचे सोळुंकीचे म्हणणे आहे.

Darshan Solanki
दर्शन सोळंकी

तक्रार नोंदवण्यास पोलिसांचा नकार : पुढे दर्शनचे वडील आपल्या निवेदनात नमूद करतात, जेव्हा एसआयटी पथकाकडे आम्ही गेलो त्यावेळेला तिथे डीसीपी महेश्वरी रेड्डी उपस्थित होते. त्यांनी कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार दखलपात्र गुन्ह्याबाबत एफआयआर नोंदवण्याची आमची विनंती त्यांनी अमान्य केल्याचे सोळुंकींनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीचा व्यवहाराचा तपशील देखील ते मुख्यमंत्र्यांना लिहिलेला निवेदनात अधोरेखित करतात, 16 मार्च 2023 रोजी ही घटना घडल्यावर आम्ही विशेष तपास पथक यांना पत्र लिहिले.

IIT मुंबई
IIT मुंबई

गुन्हा नोंदवण्याची पोलिसांना विनंती : एफआयआर नोंदवण्याबाबत आम्ही त्यांना विनंती केली. तसेच डीसीपी उपाध्याय, एसीबी भोसले या अधिकाऱ्यांची भेट घेतली. विशेष तपास पथकाच्या कार्यालयात विशेष तपास पथकाने केवळ कुटुंबातील सदस्यांना त्या कार्यालयात प्रवेश दिला. मात्र, ॲट्रॉसिटी संदर्भात जाणकार व्यक्तीला त्यांनी प्रवेश नाकारल्याचे दर्शनच्या आई- वडीलांनी निवेदनात नमुद केले आहे. विशेषत तपास पथकातील अधिकाऱ्यांबाबत देखील त्यांचा पुढील प्रमाणे आरोप आहे. उपस्थित पोलीस अधिकारी उपाध्याय यांच्याकडे वारंवार विनंती केल्यानंतरही त्यांनी एफआयआर नोंदवला नाही. त्याचे कारण या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे त्यांनी नमूद करून कोणतेही पत्र किंवा एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. तसेच हे तक्रार न घेता आम्हालाच उलटे व्याख्यान त्यांनी दिले.

दर्शनचे हस्ताक्षर ओळखण्यास सांगितले : 16 मार्च 2023 रोजी संध्याकाळी जेव्हा दर्शनचे पालक विशेष तपास पथकाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांना कसे प्रश्न विचारण्यात आले. त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शंका आणि नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'एसआयटीने आम्हाला दर्शनच्या खोलीतून एक कागद जप्त केल्याचे सांगितले. दर्शनाच्या स्वाक्षरीने त्याची ओळख पटवण्याची विनंती केली. पोलिसांनी दर्शनची आई, दर्शनची बहीण, दर्शनचे आजोबा, काकू यांनाही दर्शनचे हस्ताक्षर ओळखण्यास सांगितले.'

हस्ताक्षरांमध्ये बदल : दर्शनच्या काकूने कोणत्याही प्रकारचे विधान केलेले नाही. दर्शनची बहिण म्हणजे माझी मुलगी जाणवी इंग्रजी चांगले जाणते. मी हे देखील साक्षर आहे. त्यामुळे पोलिसांना आम्ही सांगितले की, खोलीमध्ये सापडलेली चिठ्ठीतले अक्षर दर्शनच्या हस्ताक्षरांसारखे नाही. त्यानंतर त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांनी मराठीत टाईप केलेल्या कागदावर आमच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. मात्र त्याची प्रत आम्हालादिलेली नाही.' असा आरोप दर्शनच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये केलेला आहे.

हेही वाचा - Funeral of Girish Bapat: खासदार गिरीश बापट अनंतात विलिन! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.