ETV Bharat / state

Vande Bharat Express : गोव्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; लवकरच धावणार मुंबई-गोवा मार्गावर 'वंदे भारत एक्स्प्रेस' - Mumbai Goa route

मुंबई-गोवा मार्गावर 'सेमी-हाय स्पीड' 'वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन'ची चाचणी मंगळवारी सुरू झाली, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 180 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम असलेली ही ट्रेन मुंबईतील 'सीएसएमटी'च्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून सकाळी 5:30 वाजता निघाली आणि दुपारी 12.50 वाजता गोव्यातील मडगाव स्थानकात पोहोचली.

Vande Bharat Express Trial:
'वंदे भारत एक्स्प्रेस' ट्रेनची चाचणी सुरू
author img

By

Published : May 16, 2023, 7:14 PM IST

Updated : May 16, 2023, 8:54 PM IST

मुंबई: 'वंदे भारत ट्रेन'ची दुसरी फेरी आज (मंगळवारी) मध्यरात्री 1.15 च्या सुमारास रेक मडाऊन येथून निघेल आणि संध्याकाळी उशिरा 'सीएसएमटी'ला पोहोचणे अपेक्षित आहे. सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसच्या रेकचा वापर करून चाचणी घेतली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

'इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन': सध्या आर्थिक राजधानी अहमदाबाद, सोलापूर आणि शिर्डी दरम्यान तीन 'वंदे भारत एक्सप्रेस' गाड्या धावतात. वरिष्ठ रेल्वे अधिकारी ही एक्स्प्रेस मुंबई-गोवा मार्गावर चालवण्याच्या शक्यतेचा शोध घेत आहेत. ज्यात वर्षभर प्रचंड गर्दी असते. 'वंदे भारत एक्सप्रेस' ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी 'इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन' आहे.

वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन: पंतप्रधान मोदींनी 8 एप्रिल, 2023 रोजी तेलंगणा तसेच तामिळनाडूला प्रत्येकी एक वंदे भारत ट्रेन भेट दिली. दक्षिण भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या 6 राज्यांपैकी कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार आहे, तर पुद्दुचेरीमध्ये भाजप युतीसह सत्तेत आहे. यामुळेच कर्नाटक आणि तेलंगणातील निवडणुका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन दक्षिण भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यात अनेक योजनांचा सुभारंभ आज केला.

वंदे भारत ट्रेनला हिरवा झेडा: चेन्नई ते कोईम्बतूरपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथे तेराव्य वंदे भारत ट्रेनला कोईम्बतूर येथे हिरवी झेंडी दाखवली. त्याचप्रमाणे या ट्रेनच्या लोको पायलट केबिनमधून वंदे भारतचा वेग वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ट्रेनच्या लोको पायलटने सांगितले की ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते, परंतु या मार्गाची क्षमता 130 किमी प्रतितास आहे, त्यामुळे ते या वेगाने धावत आहेत.

हेही वाचा:

  1. Thane Crime: बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्या आठ ट्रकवर कारवाई, वनविभागाकडून गुन्हा दाखल
  2. Temperature Affect : उष्ण तापमानाचा फळबागांना मोठा फटका; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
  3. White Purple Farm: अहो ऐकले का! जांभळ्या रंगाचे जांभूळ झाले आता पांढरे, आयटी इंजिनियरची कमाल

Last Updated : May 16, 2023, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.