ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यानी कणा दाखवून एमपीएससी परीक्षा घ्याव्यात - प्रकाश आंबेडकर - महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा रद्द

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारी 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. 'राज्य सरकारने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड आहे. राज्य सरकार श्रीमंत मराठ्यांना बळी पडत आहे. मुख्यमंत्र्यानी कणा दाखवला आहे, तो दिसत नाही. ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याचा आम्ही निषेध करतोय. मुख्यमंत्र्यांनी कणा दाखवून एमपीएससी परीक्षा घ्याव्यात,' असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

Mumbai Prakash Ambedkar News
मुंबई प्रकाश आंबेडकर न्यूज
author img

By

Published : Mar 11, 2021, 6:54 PM IST

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारी 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने त्यांच्यामध्ये चीड आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कणा दाखवून एमपीएससी परीक्षा घ्याव्यात, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यानी कणा दाखवून एमपीएससी परीक्षा घ्याव्यात - प्रकाश आंबेडकर

कणा दाखवून परीक्षा घ्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारी 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. यावरून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना राज्य सरकारने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड आहे. राज्य सरकार श्रीमंत मराठ्यांना बळी पडत आहे. मुख्यमंत्र्यानी कणा दाखवला आहे, तो दिसत नाही. ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याचा आम्ही निषेध करतोय. मुख्यमंत्र्यांनी कणा दाखवून एमपीएससी परीक्षा घ्याव्यात, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

हेही वाचा - एमपीएससी परीक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला - पंकजा मुंडे

परीक्षा पुढे ढकलण्याचे सत्र सुरू

गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भावमुळे २२ मार्च २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक २६ एप्रिल २०२० आणि १० मे २०२० ला नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन्ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर सतत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा होऊ शकली नाही. अनलॉक अंतर्गत शाळा महाविद्यालयात सुरू झाले होते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवार १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित केलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलली

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून जिल्ह्यानुसार लॉकडाऊन आणि प्रवासावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ ला पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

हेही वाचा - एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा : नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.