ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांचा 'एकला चलो'चा नारा, काँग्रेस-राष्ट्रवादीचे किती उमेदवार राहणार विजयापासून 'वंचित'? - वंचित स्वबळावर विधानसभा लढवणार

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १० उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने यावेळी 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वंचितचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

प्रकाश आंबेडकरांचा 'एकला चलो'चा नारा
author img

By

Published : Sep 22, 2019, 5:23 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १० उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने यावेळी 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वंचितचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आंबेडकरांची ५० टक्के जागांची मागणी काँग्रेसला अमान्य
अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारिप बहुजन महासंघ व बॅ. असुदुद्दीन औवेसी यांच्या नेतृत्वाखालील 'एमआयएम'च्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मते मिळवली होती. औरंगाबादमध्ये आघाडीचा खासदारही निवडून आला. लोकसभेत एमआयएम आणि वंचित फॅक्टरने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना-भाजपच्याही काही उमेदवारांचे धाबे दणाणून सोडले होते. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत 'वंचित'ला विशेषत: प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरू केले होते. मात्र, राष्ट्रवादीला वगळून काँग्रेससोबत युती करण्यात आंबेडकरांना रस होता. त्यासाठी त्यांनी थेट ५० टक्के जागांची मागणी काँग्रेसकडं केली होती. त्याला काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तर दुसरीकडे सन्मानजनक जागा मिळाल्या नसल्याचा आरोप करत एमआयएमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितमधून बाहेर पडल्याची घोषणा केली. त्यामुळं आंबेडकरांनी 'एकला चालो रे'चा नारा देत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली.

अॅड. प्रकाश आंबेडकरांनी मागील १५ ते २० वर्षांपासून अकोल्यात सर्व समाजातील लोकांना उमेदवारी देऊन तेथील महापालिका व जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते. त्यांचा तोच अकोला पॅटर्न त्यांनी या लोकसभेतही वंचितच्या माध्यमातून राबविला. आता विधानसभेलाही त्यांनी राज्यातील धनगर व मुस्लीम मतदारांची जास्तीची संख्या लक्षात घेता त्यांना उमेदावरी देण्याचे सुतोवाच केले आहे.

हेही वाचा - भाजपला शिवसेना 'नकोशी' झालीये का?

हेही वाचा - पवारांचे 'युवा शिलेदार' राष्ट्रवादीला संजीवनी देतील काय?

निवडणुकीनंतर 'वंचित'चा विरोधीपक्ष नेता - मुख्यमंत्री फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महाजनादेश यात्रेत बोलताना म्हटले, की आजची काँग्रेस राष्ट्रवादीची परिस्थीती पाहता निवडणुकीनंतर वंचित हाच राज्यातील प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येणार आहे. त्यांचा नेता हा विधानसभेतील विरोधीपक्ष नेता असणार आहे. याचाच मतितार्थ काढत असताना विधानसभेच्या निवडणुकीत वंचितला चांगले यश मिळेल असे सुचित केल्याची चर्चा आहे.

वंचित समाजाच्या अस्मितेवर विधानसभेच्या निवडणुकीतही आंबेडकरांची मायेची फुंकर

प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत वंचित समाजातील उमेदवारांना संधी दिल्याने त्यांची राजकीय महत्वकांक्षा वाढल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीतही वंचित मुस्लीम, बौद्ध, माळी, साळी, कोळी, धनगर आणि इतर सर्व आलुतेदार -बलुतेदार समाजातील उमेदवार देणार आहे. त्याचा परिणाम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर पडणार आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकनिष्ठ घराण्यांपैकी बरीच घराणे भाजपवासी झाल्याने त्यांना उमेदवारांची वानवा जाणवत आहे. त्यामुळे वंचितचे नवे चेहरे व जातीनिहाय समीकरण पाहता विधानसभेत वंचितचा प्रभाव दिसण्याची चर्चा राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

काँग्रेस - राष्ट्रवादीला वंचितच्या उमेदवारांचा बसणार फटका

लोकसभा निवडणुकीत एमआयएमने वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. दलित-बहुजन आणि मुस्लिम मतांच्या जोरावर 'वंचित-एमआयएम' आघाडीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले होते. २०१९ लोकसभा निवडणुकीत या आघाडीला एका खासदारपदासह ४० लाख मते मिळाली होती. तसेच काँग्रेसचे दिग्गज सुशीलकुमार शिंदे व अशोक चव्हाण, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह १० उमेदवारांना वंचितच्या उमेदवारांनी लाखांपेक्षा जास्त मते घेतल्याने लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत ही युती काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी जड जाणार असे कयास लावले जात असतानाच जागा वाटपावरुन वंचित-एमआयएमची युती तुटली. तसेच राज्यातील २५ ते ३० मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी लोकसभेत ३० ते ४० हजारांची मते घेतली होती. यामुळे या मतदारसंघात विधानसभेला वंचितकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे.

विधानसभेत वंचित, एमआयएम स्वबळावर
लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्रपणे लढणारे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित आणि औवेसी यांचा एमआयएम पक्ष आता विधानसभेत वेगवेगळे लढणार आहेत. विधानसभेला फक्त 8 जागा एमआयएमला देणार असल्याचे सांगून प्रकाश आंबेडकरांनी एकप्रकारे एमआयएमची चेष्टाच केली असल्याच्या बोलले गेले. त्यामुळेच विधानसभेत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत असून याचा कोणाला फायदा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुस्लीम मते मिळाली नसल्याचा आंबेडकरांचा आरोप
एमआयएमने आंबेडकरांसोबत युती करुन बहुजन मतांच्या जोरावर लोकसभेत एक खासदार निवडून आणला, मात्र वंचित आघाडीला मुस्लिम मते मिळाली नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर स्वतः अकोला आणि सोलापूर येथून लोकसभा लढले. या दोन्ही मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर एमआयएम प्रमुख ओवेसींनी म्हटले होते की काँग्रेसने मुंबईहून मौलवींना बोलावून मुस्लिम मते आपल्या पारड्यात पाडून घेतली. येथूनच या युतीला घरघर लागल्याचे पाहायला मिळते.

Intro:Body:

nnnee

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.