ETV Bharat / state

मुंबईत लसीकरण मोहीम जोरात, 33 लाख 24 हजार 428 लाभार्थ्यांना मिळाली लस

मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

मुंबईत लसीकरण मोहीम जोरात, 33 लाख 24 हजार 428 लाभार्थ्यांना मिळाली लस
मुंबईत लसीकरण मोहीम जोरात, 33 लाख 24 हजार 428 लाभार्थ्यांना मिळाली लस
author img

By

Published : Jun 2, 2021, 2:19 AM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज मंगळवारी 48 हजार 387 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 33 लाख 24 हजार 428 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत (१ जून)ला 48 हजार 387 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 45 हजार 746 लाभार्थ्यांना पहिला, तर 2 हजार 641 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 33 लाख 24 हजार 428 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यामध्ये 25 लाख 71 हजार 678 लाभार्थ्यांना पहिला, तर 7 लाख 52 हजार 750 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 4 हजार 24, फ्रंटलाईन वर्करना 3 लाख 61 हजार 937, जेष्ठ नागरिकांना 12 लाख 23 हजार 972, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 11 लाख 60 हजार 862 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 2 लाख 70 हजार 482, 1 हजार 276 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 1875 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरण मोहीम

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर, गुरुवार ते शनिवार पर्यंत कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल, तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.

एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी - 3,04,024
फ्रंटलाईन वर्कर - 3,61,937
जेष्ठ नागरिक - 12,23,972
45 ते 59 वय - 11,60,862
18 तर 44 वय - 2,70,482
स्तनदा माता - 1,276
परदेशी शिक्षण विद्यार्थी - 1,875
एकूण - 33,24,428

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.