मुंबई : महाराष्ट्राकडे कोरोना लसीचा साठा पुरेसा नाही. त्यामुळे 1 मे पासून राज्यात लसीकरण मोहीम सुरू करता येणार नाही. कमीत कमी 20 ते 25 लाख लसीचा साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोविशिल्ड या लस उत्पादक कंपनीने आपल्या लसीचा दर 100 रुपयाने कमी केला आहे. 400 रुपयाला मिळणारी कोविशिल्डची लस आता 300 रुपयाला राज्य सरकारला मिळेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचेही पैसे वाचणार आहेत. यामुळे राज्य सरकारलाही काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच कोवॅक्सिन लस उत्पादक कंपनीने देखील लसीचे दर कमी केले आहेत. कोवॅक्सिनच्या लसीचे दर आधी 600 रुपये होते, आता 200 रुपयांनी कमी करून 400 रुपये करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई : २२७ नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सुरू होणार लसीकरण केंद्र
हेही वाचा - IPL २०२१ : कौतुकास्पद!, राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर